UPSC CSE 2022- यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा या तारखेला होणार

UPSC CSE Exam Date Declared

UPSC CSE Prelims Exam Date: The UPSC Civil Services Prelims Examination will be conducted on 5th June by the Union Public Service Commission. UPSC also told the candidates how to fill the OMR sheet for this exam. Read More details as given below.

UPSC CSE Prelims Exam 2022 : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा 5 जून रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार असून सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी UPSC द्वारे महत्त्वाची सूचना जारी करण्यात आलीय. या परीक्षेसाठी UPSC ने उमेदवारांना OMR शीट कशी भरायची तेही सांगितलंय.

  • यूपीएससीनं OMR शीटच्या प्रतिमा (फोटो) शेअर करून उमेदवारांना अर्ज भरण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय.
  • दरम्यान, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्यावी आणि संपूर्ण तपशील तपासावा, असंही आवाहन त्यांनी केलंय.
  • परीक्षेदरम्यान OMR शीटमधील प्रत्येक वर्तुळ कसं भरायचं हे जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आलंय.
  • यासोबतच हजेरी पत्रक भरण्याची योग्य पद्धतही आयोगानं सांगितलीय.
  • आयोगानं चुकीचे आणि योग्य मार्ग समजावून सांगण्यासाठी ही प्रतिमा शेअर केलीय.
  • परीक्षेदरम्यान उमेदवारांकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून आयोगानं ही फोटोही शेअर केली आहेत.

यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार 

UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल. तर, मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. शिवाय, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी स्वतंत्र तारखाही जाहीर केल्या जातील. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांना नियमितपणे अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. UPSC नागरी सेवा 2022 ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात.


UPSC CSE Merit List

The Central Public Service Commission has announced the marks of all the candidates appearing in the Civil Service Main Examination 2020. The Commission has declared the marks separately for the successful and unsuccessful candidates in CSE Main 2021

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० मध्ये उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांचे गुण जाहीर केले आहेत. CSE 2021 Main मधील यशस्वी आणि अयशस्वी उमेदवारांसाठी आयोगाने स्वतंत्रपणे गुण जाहीर केले आहेत. नागरी सेवा परीक्षा २०२० मध्ये उपस्थित झालेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून त्यांचे गुण तपासू शकतात.

नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० चे गुण पाहण्यासाठी येथे क्लिक करा


UPSC CSE Prelims 2021

The Union Public Service Commission (UPSC) has opened the window for CSE Prelims 2021 examination from July 12 to change the examination center. Candidates who want to make changes in their examination center can do so by visiting the official website

UPSC केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (ACS) परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध

UPSC CSE Prelims 2021 exam: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने CSE Prelims 2021 परीक्षेसाठी १२ जुलै पासून परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी विंडो खुली केली आहे. ज्या उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करुन घ्यायचा आहे ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन बदल करु शकतात. उमेदवारांना ३० जुलैपर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची संधी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी ज्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात बदल करायचे असतील, त्यांच्यासाठी विंडो ओपन झाली आहे. अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन हे बदल करु शकता.

LINK FOR ONLINE REQUEST FOR CHANGE OF EXAMINATION CENTRE/


UPSC CSE Prelims Exam 2021: The pre-examination for the post of Chartered Officer to be conducted by the Central Public Service Commission will be held on June 27. According to the commission, the pre-examination will be held on June 27 as scheduled. A detailed notification in this regard will be published on the official website of UPSC soon.

कोरोनामुळे UPSC परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी

 UPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट

 UPSC CSE Prelims 2021: पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा येत्या २७ जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निर्धारीत केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येईल. आणि याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 नेहमीप्रमाणे पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतील. हे दोन्ही पेपर वैकल्पिक असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड उमेदवाराला करावी लागेल. एकूण ४०० गुणांची ही परीक्षा असेल. उमेदवाराचे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.

 पेपर-१ मध्ये विविध ७ विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास आणि संस्कृती, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण, चालू घडामोडींचा समावेश असेल. पूर्व परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर कटऑफ लिस्ट प्रसिद्ध केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये स्थान मिळते, ते मुख्य परीक्षेस पात्र ठरू शकतात.

 त्यानंतर मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीची फेरी गाठतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींच्या आधारे अंतिम पात्र उमेदवारांची निवड केली जाते.

 दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या वर्षी यूपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकात बदल झाला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याबाबत चर्चा सुरू होती, पण यूपीएससीने पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

  UPSCच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!