UPSC IFS Main 2020 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

UPSC IFS Main 2020

UPSC IFS Main 2020 Time table 

UPSC IFS Main 2020: The Central Public Service Commission (UPSC) has announced the dates for the Indian Forest Service Main Exam 2020. The detailed schedule of this examination can be seen on the official website www.upsc.gov.in. UPSC IFS 2020 exam will be held on 28th February 2021. The papers for the first-day examination will be General English and General Knowledge. The examination will be held in two sessions from 9 am to 2 pm and from 2 pm to 5 pm. The last paper will be on Sunday, March 7, 2021.

UPSC IFS Main 2020 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

यूपीएससीने आयएफएस मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे…

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२० (Indian Forest Service Main Exam 2020) च्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
UPSC IFS 2020 परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी असणार आहे. पहिल्या दिवशीच्या परीक्षेत जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे पेपर्स असतील. सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. अखेरचा पेपर रविवार ७ मार्च २०२१ रोजी असेल.

UPSC IFS 2020-21 परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

तारीख — सकाळचे सत्र — दुपारचे सत्र

२८ फेब्रुवारी २०२१ — जनरल इंग्लिश — जनरल नॉलेज

२ मार्च २०२१ — मॅथेमॅटिक्स पेपर १ / स्टॅटेस्टिक्स पेपर १ — मॅथेमॅटिक्स पेपर २ / स्टॅटेस्टिक्स पेपर २

३ मार्च २०२१ — फिजिक्स पेपर १ / झुऑलॉजी पेपर १ — फिजिक्स पेपर २ / झुऑलॉजी पेपर २

४ मार्च २०२१ — केमिस्ट्री पेपर १ / जिऑलॉजी पेपर १ — केमिस्ट्री पेपर २ / जिऑलॉजी पेपर २

५ मार्च २०२१ — अॅग्रीकल्चर पेपर १ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर १ –अॅग्रीकल्चर पेपर २ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर २

६ मार्च २०२१ – फॉरेस्ट्री पेपर १ / फॉरेस्ट्री पेपर २

७ मार्च २०२१ — अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर १ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर १ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर १ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर १ / बॉटनी पेपर १ — अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर २ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर २ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर २ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर २/ बॉटनी पेपर २

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

UPSC IFS Main Exam चे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

The Union Public Service Commission has released the Detailed Application Form DAF-1 for the Indian Forest Service (IFS) Main Examination on the official website. Candidates can fill DAF-1 on upsc.gov.in. The last date for filing this application is November 27, 2020.

भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी

UPSC IFS Main 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म DAF – 1 अधिकृत संकेतस्थळावर जारी केला आहे. upsc.gov.in वर उमेदवारांना DAF-1 भरता येईल. हा अर्ज भरण्याची अखेरची मुदत २७ नोव्हेंबर २०२० आहे.

शेड्युलनुसार यूपीएससी २८ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ पर्यंत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा (IFS Main Exam 2020) देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करणार आहे. IFS मेन परीक्षेद्वारे भारतीय वन सेवेतील भरतीसाठी विविध रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे अंतिम उमेदवार निवडले जातील.

UPSC IFS main 2020: असा भरा DAF-I अॅप्लिकेशन फॉर्म

– सर्वात आधी अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा.
– यानंतर होम पेजवर ‘DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ च्या लिंक पर क्लिक करा.
– यानंतर ‘Click here’ च्या लिंक वर क्लिक करा.
– आता इंडियन फॉरेस्ट सर्विस मुख्य परीक्षा 2020 च्या लिंक वर क्लिक करा.
– आता आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
– UPSC IFS मुख्य 2020 साठी DAF भरा.
– यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अर्ज शुल्क

भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत कॅश पैसे जमा करावे लागतील किंवा एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून व्हिसा / मास्टर कार्ड / Rupay क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाचा वापर करून २०० रुपये शुल्क जमा करावयाचे आहे.

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आणि वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधी किमान सुमारे ३ आठवडे आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!