ZP Ratnagiri Teacher – रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेमध्ये १ हजार ३०० पदं रिक्त
ZP Ratnagiri Teacher Bharti 2023
ZP Ratnagiri Teacher Recruitment 2023- As Ratnagiri Zilla Parishad could not recruit teachers, the number of vacant posts is increasing. At present, 1 thousand 300 posts are vacant, out of which 700 teachers have been ordered to leave the government. There are currently 6 thousand teachers working in the district. So 1 thousand 300 posts are vacant. Now if these 700 teachers are released, 2000 posts will be vacant. Due to this, nearly 30 percent of the posts will be vacant. Read More details are given below.
Shikshak Bharti: एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे
ZP Ratnagiri Shikshak Bharti 2023: जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा हा राज्यात सर्वोत्तम मानला जातो. मात्र अनेक वर्षे जिल्हा परिषदेची शिक्षक भरती न होवू शकल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच निघाली आहे. सध्या १ हजार ३०० पदे रिक्त त्यात आता ७०० शिक्षकांना परजिल्ह्यात सोडण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. एप्रिल ते १५ एप्रिल या दरम्यान त्यांना सोडावे असे म्हटले आहे.
ZP Teacher Bharti-मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये करणार भरती
यामुळे आता जिल्ह्यातील मुलांना शिक्षण द्यायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांचा विषय गाजत आहे. या प्रक्रियेत राजकीय पुढाऱ्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून
प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. हा विषय जिल्हा परिषदच्या अनेक सर्वसाधारण सभेतही गाजला आहे. जिल्हा बदलून जाणाऱ्यांची संख्या बघता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणजे हाताच्या बोटावर माजण्याइतकी आहे.
गेल्या दहा वर्षात जिल्हा बदलून जाणाऱ्या शिक्षकांना अगदी कोणत्याही अडथळा न आणता मुक्तहस्ते जि.प. प्रशासन सोडत आहे. राज्य शासनाने या बदलीत पारदर्शकता यावी म्हणून सन २०१८-१९ मध्ये एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. पण त्यामध्ये त्रूटी होत्या. ही प्रक्रिया सुरू असतानाच २०१९ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे २०२०- २१, २०२०-२२ या वर्षात शाळा बंद असल्यामुळे बदली प्रक्रिया झाली नव्हती.
जवळपास ३० टक्के पदे आहेत रिक्त…
जिल्ह्यात सध्या ६ हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर १ हजार ३०० पदं रिक्त आहेत. त्यात आता या ७०० शिक्षकांना कार्यमुक्त केलं तर २००० पदं रिक्त होणार आहेत. यामुळे जवळपास ३० टक्के पदं रिक्त होणार आहेत. यामुळे शैक्षणिक कारभार कसा चालवायचा असा प्रश्न जि.प. समोर उभा राहिला आहे. सध्यातरी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.