ZP Sindhudurg Bharti -सिंधुदुर्गात आठही तालुक्यांची गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त

ZP Sindhudurg Bharti 2022- Sindhudurg Zilla Parishad Primary Education Department Class B and Class C posts are vacant. Sindhudurg Zilla Parishad primary education total 18 posts are vacant. In Sindhudurga, which is the district of School Education Minister, the posts of Group Education Officer of all eight taluks are vacant. Read More details about ZP Sindhudurg Bharti 2022 are given below.

शालेय शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात आठही तालुक्यांची गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. याचा शिक्षण विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. सर्व तालुक्यांचा कारभार प्रभारींच्या हाती आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा दहावी, बारावी निकालात गेली आठ वर्षे राज्यात अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे राज्यात एक प्रकारे सिंधुदुर्ग पॅटर्न तयार झाला आहे. जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. या आठही पंचायत समित्यांना स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी ही पदे मंजूर आहेत; मात्र सध्या या पदांचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. कारण आठही तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी पदे भरलेली नाहीत. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खच्चीकरण करणारी आहे; मात्र यावर जिल्ह्यातील आमदार, खासदार आवाज उठविताना दिसत नाहीत. ही पदे भरली जावीत यासाठी साधा प्रयत्न होताना दिसत नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला अ वर्गातील प्राथमिक शिक्षणाधिकारी हे एक पद मंजूर आहे. ते पद सध्या भरलेले आहे; परंतु ‘ब’ वर्गातील दोन उपशिक्षणाधिकारी, एक अधीक्षक, लेखाधिकारी एक, आठ गटविकास अधिकारी आणि शालेय पोषण आहारसाठी अधीक्षक ही सात पदे मंजूर आहेत. एकूण ‘ब’ वर्गामध्ये १९ पदे मंजूर आहेत. यातील लेखाधिकारी हे एकमेव पद भरलेले आहे. उर्वरित १८ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे यातील आठही तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी ही पदे भरलेली नाहीत. तालुक्याच्या शिक्षण विभागाला कॅप्टन नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा गाढा हाकताना तारेवरची कसरत सुरू आहे.

प्राथमिक शिक्षण व्यवस्था खिळखिळी

एकीकडे जिल्हा शिक्षणात अग्रेसर असल्याचे आपण छाती ठोकपणे सांगत आहोत. गेली आठ वर्षे सातत्याने दहावी, बारावी निकालात सिंधुदुर्ग राज्यात अग्रेसर असल्याचे आपण म्हणत आहोत; मात्र याचा पाया तयार करणारी प्राथमिक शिक्षण व्यवस्था खिळखिळी बनलेली आहे. त्याबाबत ब्र सुद्धा काढला जात नाही. बरे ही पदे अलीकडे रिक्त झालेली नाहीत. काही ठिकाणी २०१५ पासून गटशिक्षणाधिकारी नाहीत. याच्यावरून अंदाज येतो की राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदे भरण्याबाबत संवेदशीलता नाही.

.तरच मंत्रिपदाचा जिल्ह्याला फायदा

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल, असे वक्तव्य केले आहे; मात्र ते ज्या जिल्ह्याचे आमदार आहेत, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबत त्यांनी प्रथम संवेदनशील राहिले पाहिजे. धोरण बदलले तरी त्याची अंमबजावणी करणारी यंत्रणा नसेल तर त्यांचे हे नवीन धोरण त्यांच्याच जिल्ह्यात अयशस्वी ठरण्याची भीती आहे. त्यामुळे मंत्री केसरकरांनी जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. तरच त्यांच्या मंत्रीपदाचा खरा फायदा जिल्ह्याला होण्यास सुरुवात झाली, असे म्हणता येईल.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील वर्ग ब आणि वर्ग क रिक्त असलेल्या पदांची माहिती प्रत्येक महिन्याला शासनाला कळविली जाते. ही भरती थेट शासनाकडून होत असते. शासनाने पदे भरली नसल्याने ही पदे रिक्त आहेत.

गटशिक्षणाधिकारी रिक्त पदे

तालुका रिक्त पद कालावधी

  • कणकवली १ जानेवारी २०१६ पासून
  • सावंतवाडी ५ ऑगस्ट २०१७ पासून
  • मालवण १ डिसेंबर २०१८ पासून
  • देवगड १७ मार्च २०१९ पासून
  • कुडाळ २३ मार्च २०१८ पासून
  • वेंगुर्ले ३० जून २०१५ पासून
  • वैभववाडी १ जून २०२० पासून
  • दोडामार्ग १९ जून २०१५ पासून

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Priyanka Gawade says

    I need job.I am B.A.Graduation.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!