विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात

CEI Maharashtra Examination 2020

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात

Electrical and Wireman Exam 2020 : विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी व तोंडी परीक्षा 29 सप्टेंबर 2020 रोजी मुंबई/ पुणे/ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणच्या केंद्रांतून घेण्यात येतील. तसेच तारतंत्री परीक्षा दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून मुंबई/ पुणे/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ नाशिक/ नागपूर व अमरावती या केंद्रांतून घेण्यात येतील. दोन्ही परीक्षेकरिता अर्ज नमुना “12 म”, “सी” व “ई” यामध्ये तसेच दोन्ही परीक्षेच्या पुनःप्रवेशाकरिता अर्ज नमुना “१२म” व “डी” यामध्ये सुवाच्च अक्षरात/ टंकलिखित पूर्ण भरून संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर करावेत.

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेचा अर्ज भरणाऱ्यांसाठी आवश्यक सुचना

  • ऑनलाईन अर्ज भरताना काही आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्या आधी परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून मूळ पावती प्रत अपलोड करणे.
  • नमुना ई व नोंदवही प्रत विद्युत निरीक्षक कार्यालय येथून पडताळणी करून मगच अपलोड करायचे आहे. – विद्युत निरीक्षक कार्यालाय येथे पडताळणी साठी मूळ प्रत सोबत घेऊन जावे.
  • ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर पूर्ण अर्जाची प्रत कागदपत्रांसहित विद्युत निरीक्षक कार्यालय येथे जमा करणे आवश्यक आहे.

विद्युत तारतंत्री सुचना

  • ५००/- परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून त्याची मूळ पावती अर्ज भरताना अपलोड करवी.
  • महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  • किमान एक (०१) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  • निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ) असणे आवश्यक आहे .
  • २ * २. ५ इंच आकाराचे अलीकडच्या काळातले ०२ रंगीत फोटो असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा पत्त्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ सेमी * १२ सेमी आकाराचे २ लिहाफे जोडण्यात यावे (अपलोड नाही करायचे).
  • अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ४०/- किमतीचे रजिस्टर पोस्टाचे स्टॅम्प लावलेले ३० सेमी * २५ सेमी आकाराचा एक लिफाफा व सोबत पोच पावती जोडण्यात यावी (अपलोड नाही करायचे).
  • अर्जदारास त्याच्या रहिवासी जिल्ह्याचा समावेश असलेल्या मंडळ कार्यालय अंतर्गत निश्चित केलेल्या केंद्रातूनच परीक्षेस बसता येईल .

विद्युत पर्यवेक्षक सुचना

  • विद्युत पर्यवेक्षक परीक्षेकरिता अर्ज करणारा अर्जदार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे.
  • ५००/- परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून त्याची मूळ पावती अर्ज भरताना अपलोड करवी.
  • महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  • तारतंत्री परिक्षेनंतर किमान तीन (०३) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  • तारतंत्री परीक्षेतून सूट मिळालेल्या उमेदवारास किमान दोन (२) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  • निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ) असणे आवश्यक आहे .
  • २ * २. ५ इंच आकाराचे अलीकडच्या काळातले ०२ रंगीत फोटो असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा पत्त्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ सेमी * १२ सेमी आकाराचे २ लिहाफे जोडण्यात यावे (अपलोड नाही करायचे).
  • अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ४०/- किमतीचे रजिस्टर पोस्टाचे स्टॅम्प लावलेले ३० सेमी * २५ सेमी आकाराचा एक लिफाफा व सोबत पोच पावती जोडण्यात यावी (अपलोड नाही करायचे).
  • तारतंत्री प्रमाणपत्र व परवानाची छायाप्रत असणे आवश्यक आहे.
  • विद्युत अभियांत्रिकी पदवी / पदविका याखेरीज इतर शाखेमध्ये पदवी / पदविका प्राप्त उमेदवाराकरिता
    अ) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची / मंडळाची / संस्थेची पदवी / पदविका असणे आवश्यक आहे.
    ब) वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्युत अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारास त्याच्या रहिवासी जिल्ह्याचा समावेश असलेल्या मंडळ कार्यालय अंतर्गत निश्चित केलेल्या केंद्रातूनच परीक्षेस बसता येईल .

महत्त्वाच्या तारखा:

सीईआय महाराष्ट्र परीक्षा २०२० साठी महत्त्वाच्या लिंक्स:

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!