Important For Viewers

प्रिय वाचकांसाठी उपयुक्त दोन शब्द…

Dear-Viewers

मित्रांनो सध्या अनेक वेबसाईट वर बोगस नोकरी जाहिरातीचा सुळसुळाट सुरु आहे. काही वेबसाईटवर सामान्य जनतेची दिशाभूल होईल अश्या नोकरी विषयक जाहिराती जास्त शहानिशा न करता लगेच प्रसिद्ध करतात त्यामुळे आमची आपणास विनंती आहे कि योग्य खात्री करूनच अर्ज दाखल करावा करावा. GovNokri.in वाचकांची फसवणूक होऊ नये या करिता सदैव प्रयत्नशील आहे. आपणांस माहीतच असेल “अमरावती येथील समाजकल्याण भरती हि बोगस भरती आहे” हि माहिती सर्वप्रथम Govnokri नि प्रसिद्ध केली होती. तसेच आम्हास शंका असल्यास आम्ही ती जाहिराती बद्दल शहानिशा करावी अशी नोट टाकत असतो तसेच सदैव शहानिशा करूनच जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, तरी एखाद्या जाहिरातीबद्दल शंका असल्यास कृपया आम्हाला [email protected], WhatsApp, TeleGram मधून जरूर कळवा.
तसेंच मित्रांनो, कधी एखादी जाहिरात उशिरा प्रसिद्ध होण्यामागचे कारण सुद्धा हेच आहे, कि त्या जाहिरातीची पूर्ण शहानिशा करण्यास वेळ लागतो. कारण आपला आमच्यावरच विश्वास हीच आमची संपत्ती आहे.

अजून एक महत्त्वाचे म्हणजे, ज्या नोकरींच्या जाहिरातीचा सर्व प्रकारच्या वाचकांना उपयोगी असतील अश्याच जाहिराती आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जातात. यात आम्ही अगदी ४ थी पासून तर शास्त्रज्ञ पर्यंत सर्व प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करतो. तेव्हा आपल्या महाराष्ट्रातील आपल्या आवडत्या GovNokri.in ला रोज भेट देत राहा आणि अपडेटेड रहा.

आपण दिलेल्या मोठ्या प्रतिसादासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहो.. आणि आपणास सदैव तत्पर आणि अचूक माहिती देण्याचा मनापासून प्रयत्न सदैव करू…

नमस्कार… जय महाराष्ट्र !!

 

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!