राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये २८८ जागा रिक्त

Maharashtra Excise Department Bharti 2021

As per the latest news, As many as 288 posts of secondary inspectors are vacant in the state excise department. Hundreds of constables are waiting to be promoted to these posts. The post of Deputy Inspector in Excise is equivalent to that of Sub-Inspector in the Police Force. With 288 vacancies, the workload on the available secondary inspectors is increasing.

राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये २८८ जागा रिक्त

 राज्य उत्पादन शुल्क विभागात (एक्साइज) दुय्यम निरीक्षकांच्या तब्बल २८८ जागा रिक्त आहेत. या जागांवर पदाेन्नती मिळण्याची शेकडाे काॅन्स्टेबलला प्रतीक्षा आहे. एक्साइजमध्ये गेल्या काही वर्षांपासून पदाेन्नतीच झालेली नाही.

२१ वर्षे सेवा हाेऊनही काॅन्स्टेबलच्या पदाेन्नतीचा मुहूर्त आयुक्तालयाला साधता आलेला नाही. पाेलीस दलातील उपनिरीक्षकाच्या बराेबरीचे एक्साइजमध्ये दुय्यम निरीक्षक हे पद आहे. तब्बल २८८ जागा रिक्त असल्याने उपलब्ध दुय्यम निरीक्षकांवर कामाचा ताण वाढताे आहे. इकडे एक्साइजमधील काॅन्स्टेबलची या पदावरील बढतीसाठी धडपड सुरू आहे. रिक्त जागांचा अंदाज घेऊन १६० व १२८ अशी एकूण २८८ सेवा ज्येष्ठ काॅन्स्टेबलची पदाेन्नती पात्रता यादी तयार करण्यात आली आहे; परंतु त्यातील आधी १६० ची यादी काढली जाणार आहे. तसे झाल्यास १२८ च्या यादीला पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दाेनही याद्या एकत्रच काढल्या जाव्यात, असा एक्साइजच्या काॅन्स्टेबलमधील सूर आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप हे २८८ जागांवरील बढतीची एकत्र यादी काढतात का, याकडे नजरा लागल्या आहेत.

अशा आहेत रिक्त जागा-Maharashtra Excise Department Vacancy 2021

  • २८८ पैकी दुय्यम निरीक्षकांच्या सर्वाधिक रिक्त जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत.
  • पुणे ५०, सांगली ११, सातारा २२, काेल्हापूर १९, नगर ३३, साेलापूर २९, औरंगाबाद विभाग २३, बीड ४, उस्मानाबाद ५, परभणी ४, लातूर ३, हिंगाेली १, जालना २, नांदेड १०, ठाणे २०, रायगड ६, रत्नागिरी ४, नंदुरबार ५, धुळे २, जळगाव ११, नाशिक २९, सिंधुदुर्ग ३, आयुक्तालय १, मुंबई शहर १३, मुंबई उपनगरी २८, नागपूर २७, चंद्रपूर ६, यवतमाळ ४, अमरावती ४, अकाेला ७, वाशिम १, भंडारा ४, बुलडाणा १, गाेंदिया ३, वर्धा ३, तर गडचिराेली जिल्ह्यात २ जागा रिक्त आहेत.
  • पूर्वी ४०० ची असलेल्या रिक्त पदांच्या या यादीत काही पदे भरली गेली आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!