NEET Registration -NEET PG परीक्षेसंदर्भातील ‘ते’ परिपत्रक Fake

NEET Exam 2022

A fake circular in the name of National Testing Agency is going viral on social media. The forged document that was circulated states that the exam, which will be held on May 21, 2022, will now be held on July 9, 2022. However, PIB has made a big revelation about this fake circular (NEET PG 2022 fake circular). Read More details as given below.

सोशल मीडियावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (National Testing Agency) नावाने एक बनावट परिपत्रक व्हायरल होत आहे. राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा- पदव्युत्तर (NEET-PG 2022) साठी 15,000 हून अधिक विद्यार्थी बसतील. विद्यार्थ्यांनी 5 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अपील केले. प्रसारित करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजात 21 मे 2022 रोजी होणारी परीक्षा आता 9 जुलै 2022 रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या बनावट परिपत्रकाबाबत PIB नं मोठा (NEET PG 2022 fake Circular) खुलासा केला आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने म्हटले आहे की यावर्षी NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही आणि ती 9 मे च्या नियोजित तारखेला घेतली जाईल. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या नावाने जारी करण्यात आलेली नोटीस ‘बनावट’ असून ही परीक्षा आता 9 जुलै रोजी होणार असल्याचे त्यात म्हटले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने देखील त्यांच्या नावाने जारी केल्या जाणार्‍या “बनावट माहिती” बद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या वर्षीची NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 9 जुलै रोजी होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या एका भागानंतर आले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या ‘फॅक्ट चेक’ हँडलवरील ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या नावाने जारी केलेल्या बनावट नोटीसमध्ये दावा केला आहे की NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 9 जुलै रोजी होणार आहे. 2022.” होईल. परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही. हे फक्त 21 मे 2022 रोजी होईल.
जारी केलेल्या नोटीसमध्ये, NBEMS ने म्हटले आहे की ते त्यांच्या क्रियाकलापांशी संबंधित विविध सूचना त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित करते. NBEMS बद्दल अस्सल माहितीसाठी संबंधित वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. NBEMS ने म्हटले आहे की त्याच्या नावाने खोट्या नोटिसांचा वापर करून खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, सावध रहा.


NEET 2022 Exam – Application Process: The process of filling up the application for the National Eligibility cum Entrance Test (NEET) 2022 at the national level for admission to medical degree courses is underway. The online application process has been extended by the National Testing Agency (NTA) at the end of the term. Accordingly, students will now be able to apply till 15th May 2022.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (NEET) २०२२ परीक्षेकरीता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुदत संपत असतांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी (NTA) यांच्‍यातर्फे मुतदवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना १५ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS) या अभ्यासक्रमांसोबत बीएएमएस (BAMS), बीयुएमएस (BUMS), बीएचएमएस (BHMS), फिजिओथेरेपी (Physiotherapy) व अन्‍य शिक्षणक्रमांसह बी.एस्सी (Nursing) या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. नीट २०२२ करीताच्‍या प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्याची मुदत संपत असतांना, एनटीएच्‍या वतीने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना १५ मेच्‍या रात्री नऊपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. तर याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनीटांपर्यंत निर्धारीत शुल्‍क भरण्याची मुदत असणार आहे.


NEET 2022 Exam: The National Testing Agency (NTA) conducts both NEET UG Exam and NEET PG Exam. Meanwhile, major changes have been made in the rules of NEET UG Exam 2022. The examination time has been extended as per the demand of the candidates who are sitting for the examination properly.

NEET 2022: दरवर्षी देशात अनेक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतल्या जातात. एनटीएद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय (Medical), इंजिनीअरिंग (Engineering) अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार नीट परीक्षेला (NEET Exam 2022) बसतात. ही परीक्षा खूप कठीण असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी (Medical Course) या परीक्षेसाठी अनेक उमेदवारांना अनेक प्रयत्न करावे लागतात. एनटीएकडून (National Testing Agency, NTA) नीट यूजी परीक्षा (NEET UG Exam) आणि नीट पीजी (NEET PG Exam) अशा दोन्ही परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान नीट यूजी २०२२ (NEET UG Exam 2022) परीक्षेच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नीट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या मागणीनुसार परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना २० मिनिटे अतिरिक्त वेळ

नीट यूजी २०२२ च्या परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना २० मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत. त्यानुसार, यावर्षी विद्यार्थ्यांना नीट यूजी परीक्षेसाठी एकूण ३ तास २० मिनिटांचा वेळ दिला जाईल. २०२१ मध्ये नीट परीक्षेत २०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी १८० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची होती. दरम्यान विद्यार्थ्यांनी एनटीएला पत्र लिहून वगळलेल्या प्रश्नांचाही अभ्यास करावा लागतो, असा युक्तिवाद केला होता.

जुलैमध्ये होणार परीक्षा

नीट यूजी परीक्षा (NEET UG 2022) १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. नीट २०२२ साठी ६ मे २०२२ रोजी रात्री ११.५० पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच ७ मे रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज शुल्क जमा करता येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमधून वैद्यकीय अभ्यासक्रम म्हणजेच एमबीबीएस करण्याची संधी मिळणार आहे. परीक्षेची वेळ वाढवल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ते सर्व प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यांची उत्तरे लिहू शकतील.

NEET UG २०२२ परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती

नीट यूजी २०२२ परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) मधील २०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयातील ५० प्रश्न अ आणि ब अशा दोन विभागामध्ये विभागले जातील. परीक्षेचा कालावधी २०० मिनिटे म्हणजेच ३.२० तासांचा असेल. दुपारी २ ते ५.२० या वेळेत परीक्षा होणार आहे.


 

Maha NEET PG Registration 2022

NEET PG exam Registration 2022- The registration process for the NEET PG exam has started. The National Board of Examinations in Medical Sciences has opened the registration window for the National Eligibility Cum Entrance Examination i.e. Neat PG Exam. All the candidates who want to apply for this exam can go online by visiting the official website nbe.edu.in.

NEET PG exam Registration: नीट पीजी प्रवेश परीक्षेसाठी (NEET PG exam) नोंदणी प्रक्रिया सुरू आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस तर्फे  राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेसाठी नोंदणी विंडो खुली केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहील. या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NEET PG 2022 Exam: महत्त्वाच्या तारखा- Important Date 

 • नीट पीजी २०२२ अर्ज प्रक्रिया सुरु – १५ जानेवारी २०२२
 • नीट पीजी २०२२ अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२२ (रात्री ११:५५पर्यंत)
 • अर्ज दुरुस्ती प्रक्रिया – ८ फेब्रुवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२२
 • चुकीचा फोटो दुरुस्त करण्यासाठी करेक्शन विंडो खुली- २४ फेब्रुवारी २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२२
 • नीट पीजी प्रवेशपत्र – ७ मार्च २०२२
 • नीट पीजी २०२२ परीक्षेची तारीख – १२ मार्च २०२२
 • नीट पीजी २०२२ च्या निकालाची तारीख – ३१ मार्च २०२२

NEET PG 2022: असा करा अर्ज- How to Apply For NEET PG Registration 2022

 • नीट पीजी प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवारांना प्रथम NBEMS ची अधिकृत साइट natboard.edu.in वर जा.
 • होमपेजवर असलेल्या नीट पीजी २०२२ लिंकवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज खुले होईल.
 • तिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.
 • अर्ज भरा आणि आवश्यक तपशील अपलोड करा. अर्ज फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
 • अर्जाची प्रिंट डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट स्वत:कडे ठेवा.

Maharashtra NEET Counseling 2022

The dates of UG Counseling 2021 for Medical UG Admission 2021 have been announced. Neet UG’s counseling will start on January 19, 2022. The Medical Counseling Committee (MCC) will provide online counseling for 15 per cent All India quota (AIQ) seats for admission to degree medical courses. Applicants can check the details by visiting the official website of MCC. Read More details as given below.

NEET UG Counseling 2021: वैद्यकीय यूजी प्रवेश २०२१ साठी नीट  यूजी काऊन्सेलिंग २०२१ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. नीट यूजीचे काऊन्सेलिंग १९ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. मेडिकल काऊन्सेलिंग कमेटी (MCC) पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ टक्के ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी ऑनलाइन ऑनलाइन काऊन्सेलिंग करेल. अर्जदार एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात. चॉइस फिलिंग आणि सीट अलॉकेशन संबंधित माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

नीट यूजीमध्ये राज्य कोट्याअंतर्गत एकूण १९२ वैद्यकीय महाविद्यालये २३,३७८ एमबीबीएसच्या जागा दिल्या जात आहेत. त्याचवेळी २७२ सरकारी महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या एमबीबीएसच्या एकूण जागांची संख्या ४१,३८८ इतकी आहे. एमबीबीएससाठी ८३,०७५, बीडीएससाठी २६,९४९, आयुषसाठी ५२,७२०, बीवीएससी आणि एएचसाठी ६०३, एम्ससाठी १,८९९ आणि जिपमरसाठी २४९ आहे. काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती एमसीसीच्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर दिली जाणार आहे.

नीट काऊन्सेलिंग २०२१ ला विलंब

नीट काऊन्सेलिंग २०२१ ला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर काऊन्सेलिंगमधील अडथळे जवळपास दूर झाले आहेत. नंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नीट पीजी काऊन्सेलिंगच्या तारखेची घोषणा केल्याने अर्जदारांना दिलासा मिळाला.


For admission to professional courses like MD, MS, Diploma in Health Sciences, students have to take a national level PG entrance test. Students are admitted for the respective courses on the basis of their marks in this examination. The process has been started and online registration of students for these admissions has been started. Students will be able to register till 17th Jan 2022

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञानाच्या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १७ जानेवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. आरोग्यशास्त्राच्या एमडी, एमएस, डिप्लोमा या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील नीट पीजी ही प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे संबंधित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.

NEET प्रवेश परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना MBBS मध्ये १५ टक्के जागा आणि MS, MD अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ५० टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जातात. नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगलाठी १२ ते १७ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. १८ जानेवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. २० ते २१ जानेवारी दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. २२ जानेवारी रोजी निकाल लागणार असून २३ ते २८ जानेवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे.

नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगच्या राऊंड २ साठी ३ ते ७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. १० ते ११ दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. राऊंड २ चा निकाल १२ फेब्रुवारी २०२२ रोजी लागणार असून उमेदवारांना १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे.

अशी करा नोंदणी- Registation 

 •  नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंग अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा.
 • नाव, जन्मतारीख, रोल नंबर, नीट पीजी २०२१ नोंदणीकृत कोड, सिक्युरीटी कोड यासारखे तपशील सबमिट करा.
 • नीट पीजी काऊन्सेलिंग लॉगिन क्रिडेन्शियल भरुन लॉगिन करा.
 • लॉगिन केल्यानंतर पालकांचा तपशील, संपर्क, ग्रेड आणि राष्ट्रीयत्व आदि माहिती भरा.
 • नीट पीजी २०२१ अर्ज क्रमांक आणि रोल नंबर भरा.
 • श्रेणीनिहाय नोंदणी शुल्क भरा.
 • फी भरल्यानंतर त्याची नोंदणी स्लिप तयार होईल.
 • नोंदणी स्लिप डाउनलोड करा आणि स्लिपची प्रिंटआउट घ्या.

सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी २०२१ मध्ये ओबीसी आरक्षण आणि इडब्ल्यूएस कोट्यावर निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १० टक्के आरक्षणाची वैधता कायम ठेवली. याचिकेत इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोट्यातील जागांवर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.


A provisional merit list for admission to health sciences courses will be published on Thursday, January 13 through the State Common Entrance Examination Cell. Read More details as given below.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुरुवारी, १३ जानेवारी रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सीईटी सेलमार्फत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ‘नीट’ पात्र विद्यार्थ्यांसाठी ११ जानेवारीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

 • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात असून, सीईटी सेलमार्फत या प्रवेशास नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान मुदत दिली होती.
 • परंतु, या दरम्यान अनेक विद्यार्थी ऑनलाइन नोंदणीपासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नोंदणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ७ ते ११ जानेवारीदरम्यान नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
 • सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी १३ जानेवारीला सायंकाळी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे.
 • देशभरातील आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’मधील (नीट) गुणांआधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस यासह आरोग्यशास्त्राच्या अन्य पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे

The apex court had upheld the decision regarding reservation of OBC and EWS categories in PG admissions. During the hearing, the bench said that counseling should be started in the national interest. During the hearing, a bench of the apex court had ruled that the demand for resident doctors was real. The bench had agreed to consider the matter positively. The verdict was handed down on Friday.

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये (PG Admission) आर्थिक दुर्बल गट (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC)प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवले आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कोर्टाने सांगितले की OBC आरक्षणाची वैधता कायम ठेवली आहे. EWS मध्ये वर्तमान निकष कायम ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशांमध्ये अडचण येऊ नये. कोर्टाने पांडेय समितीच्या शिफारशी पुढील वर्षापासून लागू करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अंतिम सुनावणी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी पांडेय समितीने दिलेली EWS निकषांची वैधता ठरवली जाईल.

याचिकेवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण करत सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी प्रवेशांमधील ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या आरक्षणासंबंधीचा निर्णय राखून ठेवला होता. सुनावणी वेळी खंडपीठाने सांगितले की राष्ट्रहितासाठी काऊन्सेलिंग सुरू व्हायला हवी. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवासी डॉक्टरांची मागणी वास्तविक असल्याचे मत नोंदवले होते. पीठाने या प्रकरणाचा सकारात्मक रुपाने विचार करण्यासाठी सहमती व्यक्त केली होती. त्यानुसार शुक्रवारी निकाल देण्यात आला.

दरम्यान, ही याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने नीट पीजी काऊन्सेलिंग प्रक्रियेला एक महिन्याहून अधिक विलंब झाला होता. या विलंबामुळे दिल्लीसह देशभरातील अनेक भागांत वेगवेगळ्या रुग्णालयांत आणि निवासी डॉक्टरांच्या महासंघातर्फे (फोर्डा) आंदोलन सुरू होते.


The process for admission on State Quota Seats of various degree courses in Medical and Dental Colleges in the State of Maharashtra has been started from Thursday 30th December 2021. The merit list for these courses will be announced on January 8. After that, the next entry rounds will be planned.

Maharashtra NEET Counseling 2021: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) द्वारे अद्याप नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी विविध राज्यांनी स्टेट कोट्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. इडब्लूएस कोट्याच्या उत्पन्न मर्यादेबाबतचा एका याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने ही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. महाराष्ट्र राज्यातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजांमधील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या स्टेट कोटा सीट्सवर प्रवेशासाटी गुरुवार ३० डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या ८ जानेवारी रोजी या अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रवेश फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएसल बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीएससी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आवश्यक कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहे. यासाठी ५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली आहे. ८ जानेवारीला या सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य कोट्यांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ८५ टक्के जागा आणि खासगी मेडिकल कॉलेजांमधिली १०० टक्के जागांवरील प्रवेशांसाठी नीट यूजी काऊन्सेलिंग प्रक्रिया आयोजित केली जात आहे.

नीटमध्ये पात्र उमेदवारांनी पुढील पद्धतीने नोंदणी करायची आहे –

 • स्टेप १ – सीईटी सेलची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
 • स्टेप २ – होमपेज पर ‘नीट-यूजी 2021’ वर क्लिक करा.
 • स्टेप ३ – स्क्रीन वर एक नवे पेज दिसेल.
 • स्टेप ४ – रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज भरण्यासाठी निर्देश काळजीपूर्वक वाचा.
 • स्टेप ५ – अर्जातील सर्व माहिती भरावी.
 • स्टेप ६ – अर्ज शुल्क भरावे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
 • स्टेप ७- फॉर्म जमा करा आणि एक प्रिंटआऊट घ्या.

महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२१ साठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे-

 • नीट २०२१ चे अॅडमिट कार्ड
 • नीट ऑनलाइन अर्जाची कॉपी
 • नीट गुणतालिका
 • राष्ट्रीयत्वाचा दाखला
 • बारावीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रवयोमर्यादेसाठी दहावीचे प्रमाणपत्र
 • आधार कार्डडोमिसाइल सर्टिफिकेट
 • मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
 • विशिष्ट प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र

NEET Phase 2 Registration

The National Testing Agency will soon begin the 2021 Phase 2 registration process. The process will be started on the official website of NTA, neet.nta.nic.in. The registration dates for the second phase of NEET have not been announced yet. NEET UG 2021 was organized on September 12 in pen and paper-based mode i.e. offline mode.

 •  NEET Phase 2 Registration 2021- नॅशनल टेस्टिंग एजन्सी  लवकरच नीट 2021 फेज 2 रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करणार आहे. एनटीएची नीट परीक्षेकरिता असणारी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
 • नीटच्या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीच्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. NEET UG 2021 चे आयोजन १२ सप्टेंबर रोजी पेन आणि पेपर-आधारित मोड वर म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने करण्यात आलं होतं.
 • उमेदवारांनी आपली माहिती योग्य प्रकारे सबमिट केली आहे, हे निश्चित करण्यासाठी एनटीएने नीट 2021 नोंदणी प्रक्रियेला दोन टप्प्यांत विभाजित केले आहे.
 • नीट २०२१ अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांना मेडिकल परीक्षेसाठी नोंदणी करताना आवश्यक फील्डमध्ये तपशील भरून सबमीट करायचा होता. दुसरीकडे NEET च्या अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना निकाल जाहीर होण्याअगोदरच चॉइस भरायचे आहेत.
 • नीट 2021 (NEET 2021) परीक्षेच्या माध्यमातून ८३,०७५ एमबीबीएस, २६,९४९ बीडीएस, ५२,७२० आयुष, ५२५ बीवीएससी आणि एएच, १,८९९ एम्स आणि २४९ जिपमर जागांवरील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) २०२१ च्या गुणांना आता B.Sc (H) नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाते.

 

NEET Counselling 2021

The Medical Counseling Committee (MCC) of the Directorate General of Health Sciences conducts 2021 counseling for admission in medical and dental colleges. Online counseling is provided by MCC. This counseling will be conducted in two rounds. This will be followed by a mopup round. Mopup Round Counseling is conducted only for vacancies in Dimd / Central University and ESIC College.

NEET 2021- NEET ची अ‍ॅन्सर की अन्‌ परीक्षा निकालाच्या या आहेत संभाव्य तारखा…

NEET Counseling: आरोग्य विज्ञान महासंचालनालयाची वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी नीट २०२१ काऊन्सिलिंगचे आयोजन करते. एमसीसीतर्फे ऑनलाईन माध्यमातून काऊन्सिलिंग केली जाते. ही काऊन्सिलिंग दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येईल. यानंतर एक मॉपअप राउंड असेल. मॉपअप राऊंड काऊन्सिलिंग केवळ डिम्ड/केंद्रीय विद्यापीठ आणि ईएसआयसी कॉलेजमधील रिक्त जागांसाठी आयोजित केले जाते.

 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण अंडरग्रॅज्युएट पदांच्या १५ टक्के तर पदव्युत्तर पदांच्या ५० टक्के जागांवर ऑल इंडिया कोटा अंतर्गत प्रवेश घेतला जातो.
 • दिल्ली विद्यापीठ (DU), BHU, AMU यासह डीम्ड विद्यापीठे / केंद्रीय विद्यापीठे / कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मधील सर्व जागा
 • -AIIMS आणि JIPMER मधील जागा
 • – आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) – MCC आणि AFMC, पुणे द्वारा संचालित

केवळ NEET पात्र उमेदवारच काऊन्सिलिंग प्रक्रेयेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आपण नोंदणीसाठी खालील स्टेप्स फॉलो करु शकता.

NEET 2021 काऊन्सिलिंग: या स्टेप्स करा फॉलो

 • सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर काऊन्सिलिंग शुल्क भरा.
 • आता चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करा.
 • जागा वाटप यादी जाहीर केल्यानंतर वाटप केलेल्या महाविद्यालयाकडे रिपोर्ट करणे आवश्यक आहे.

असा तयार होतो नीट कटऑफ

शेवटच्या क्रमांकावर ज्या विद्यार्थ्याला एका विशिष्ट महाविद्यालयात जागा वाटप केली जाते ती कॉलेज प्रवेशाची कटऑफ असते. कटऑफ दरवर्षी बदलते. परीक्षा किती कठीण आहे, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या, सीट मॅट्रिक्स आणि इतर अशा विविध घटकांचा विचार करुन


 

NEET NTA Exam 2021

NEET PG 2021 tickets are likely to be announced on NBE’s official website nbe.edu.in between September 4 and 7. Candidates who had applied for NEET UG 2021 can download the admission form by visiting the official website of NTA NEET neet.nta.nic.in on September 9, 2021.

NEET 2021 Admit Card : नीट यूजी २०२१, नीट पीजी २०२१ परीक्षांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी नीट २०२१ ची तयारी करणारे उमेदवार त्यांच्या ई-कॉल लेटरची (NEET 2021 प्रवेशपत्र) वाट पाहत आहेत. MBBS, BDS (UG) आणि पदव्युत्तर (PG) प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेची (NEET 2021) तारीख जवळ आली आहे.

NEET UG PG 2021 परीक्षेची तारीख

नीट पीजी २०२१ परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. तर नीट यूजी परीक्षा २०२१ ही १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. नीट पीजी २०२१ राष्ट्रीय शिक्षण मंडळ (NBE) द्वारे आयोजित केले जाईल तर नीट यूजी २०२१ ही राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केले जाईल.

ज्या उमेदवारांनी NEET UG 2021 साठी अर्ज केला होता ते ९ सप्टेंबर २०२१ रोजी NTA NEET च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

NEET PG 2021 प्रवेशपत्र NBE ची अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. NEET 2021 परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रवेशपत्र दिले जाईल अशी माहिती देण्यात आली होती

NTA NEET च्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा
NBE च्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


The National Testing Agency has issued a new notification regarding the National Eligibility Entrance Test. Accordingly, NTA has extended the deadline for payment of application fee for proper examination. Candidates registered for the examination can pay their application fee till 11.50 pm on 15th August. More information can be found on the official website neet.nta.nic.in.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात नवे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, एनटीएद्वारे नीट परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आपले अर्ज शुल्क १५ ऑगस्ट रात्री ११.५० वाजेपर्यंत भरु शकतात. अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकते.

एनटीएने विद्यार्थ्यांकडून वारंवार होत असलेली मागणी पाहता अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नोंदणीकृत उमेदवारांनी आधी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये नीट २०२१ परीक्षेचे अर्ज शुल्क भरले नाही अशा उमेदवारांना ही संधी देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


NEET UG 2021

The date for applying for UG 2021 has been extended. Candidates appearing for this examination can apply till 10th August. Earlier, the application was to be submitted till August 6, 2021

नीट यूजी २०२१ ची परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. या परीक्षेसाठी बसलेले उमेदवार १० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. याआधी ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करण्यात येणार होता. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा यूजी म्हणजेच नीट २०२१ ची अर्ज करण्याची तारीख वाढविण्यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ठरवल्या गेलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केल्यानंतर उमेदवारांना आपल्या अर्जात बदल करण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवार आपल्या अर्जामध्ये बदल करु शकतील.

अधिकृत वेबसाईट

नोटीस – 


The NEET UG 2021 entrance exam for medical degree courses will be held on September 12. The decision was announced by the National Testing Agency (NTA).  The NEET (UG) 2021 will be held on 12th September 2021 across the country following COVID-19 protocols. The application process will begin from 5 pm tomorrow through the NTA website(s).

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे होणारी NEET UG 2021 प्रवेश परीक्षा आता १२ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन दिली. परीक्षा केंद्रांवर करोना नियमांचे पालन केले जाणार आहे.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NEET UG 2021 ही परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. १३ जुलैपासून एनटीएच्या वेबसाइटवर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीटरवरुन दिली.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


There is immediate uncertainty as to whether the NEET UG 2021 entrance exam for medical degree courses will be postponed or scheduled. However, the UG 2021 exams are likely to be postponed in the wake of the second wave of Covid epidemics and the possibility of a third wave.

 

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी NEET UG 2021 प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार का की नियोजित वेळापत्रकानुसार होणार, याबाबत तूर्त अनिश्चितता आहे. मात्र, करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची स्थिती आणि तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता या पार्श्वभूमीवर नीट यूजी २०२१ परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NEET-UG 2021 परीक्षा तूर्त १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. NTA द्वारे, अद्याप NEET 2021 UG परीक्षा स्थगित करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की अधिक माहितीसाठी त्यांनी अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in ला भेट देत राहावी.

NEET परीक्षा मागील वर्षी कोविड -१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे परीक्षा स्थगित करण्यात आली होती. अनेकदा लांबणीवर पडल्यानंतर अखेर सप्टेंबर २०२० मध्ये नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली गेली होती.


The National Eligibility Test (NEET UG 2021) conducted by the National Testing Agency (NTA) was scheduled to take place on August 1, 2021. But the application forms for the exams have not yet arrived on the official website. There was also no update in this regard. In the first week of June, NTA launched Neet UG 2021’s official website neet.nta.nic.in. It was informed that application form for proper examination will be made available on this new website.

NEET UG 2021:नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA)द्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा(NEET UG 2021)१ ऑगस्ट २०२१ रोजी होणार होती. पण अधिकृत वेबसाइटवर नीट परीक्षांचे अर्ज फॉर्म अद्यापही आले नाहीत. तसेच यासंदर्भात कोणती अपडेट देखील आली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात एनटीए नीट यूजी २०२१ ची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in लॉन्च केली होती. या नवीन वेबसाइटवर नीट परीक्षेसाठी एप्लीकेशन फॉर्म उपलब्ध केला जाईल अशी माहिती दिली होती.

दुसरीकडे, मिडिया रिपोर्ट्सनुसार, नीट परीक्षा स्थगित होण्याची शक्यता आहे. एनटीएद्वारे निर्धारित केलेल्या १ ऑगस्टला परीक्षा होणं शक्य नाही. नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा केंद्र निवडण्यात साधारण ४५ दिवसांचा कालावधी लागतो. पण नोंदणी प्रक्रियाच अजून सुरु झाली नाही.

एनटीएने वेळेवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु केली तर २५ दिवसांचा वेळ देण्यावर विचार केला जाऊ शकतो. १ ऑगस्टला परीक्षा घ्यायची असेल तरी जुलै शेवटापर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.


NEET Exam 2021

Applications for the National Eligibility Entrance Test (NEET UG 2021) will be released soon. For this, the National Testing Agency has also launched the official website neet.nta.nic.in for ‘NEET UG’. It has been informed that the application for NEET exam will be made available on this new website soon.

राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणीसाठी (NEET UG 2021) लवकरच अर्ज प्रसिद्ध केले जाणार आहेत. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) ‘नीट यूजी’करिता neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटही सुरू केलीय. या नवीन संकेतस्थळावर लवकरच NEET परीक्षेचा अर्ज उपलब्ध करुन देण्याची माहिती देण्यात आलीय.

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2021) एनटीएतर्फे 1 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात 12 मार्च 2021 रोजी एक नोटीस देखील nta.ac.in च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलीय. दरम्यान, आता नीटसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.

नीट यूजी परीक्षा ही MBBS, BDS अभ्यासक्रम तसेच BAMS, BHMS, BUMS आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. या वेळी ही प्रवेश परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह एकूण 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.


On Sunday, May 2, Prime Minister Narendra Modi held a meeting with experts on the situation in the country. The exam is likely to be postponed to 2021. Also MBBS students can be given COVID duty.

NEET PG 2021 परीक्षा लांबणीवर

नीट परीक्षा २०२१ पोस्टपोन होण्याची शक्यता

NEET Exam 2021: नीट परीक्षा २०२१ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोविड ड्युटी दिली जाऊ शकते. पीएम मोदींच्या समीक्षा बैठकीत काय झाली चर्चा?

रविवारी २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञांसोबत देशातील कोविड स्थितीसंदर्भात बैठक घेतली. यात त्यांनी देशातील ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कोविड-१९ महामारीशी लढण्यासाठी मनुष्यबळ उपलब्धतेविषयी चर्चा झाली. या दरम्यान एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोविड ड्युटी लावण्याबाबत आणि नीट २०२१ च्या विषयावर देखील चर्चा झाली.


 

NEET PG Exam 2021

NEET PG 2021: The central government announced the decision. a national examination for admissions to postgraduate medical courses, has been postponed. The exam was to be held across the country on Sunday, April 18. The next date will be announced soon.

NEET PG 2021 Update: वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट पीजी (NEET PG 2021) ही राष्ट्रीय परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १८ एप्रिल रोजी ही परीक्षा देशभर होणार होती. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला.

NEET PG 2021 परीक्षेसाठी प्रवेश जाहीर

नुकतेच बुधवारी १५ एप्रिल रोजी NEET PG परीक्षेचे अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आले होते. परीक्षेच्या आयोजनाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली होती.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. ‘आपल्या तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे,’ असे हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

NEET Exam 2021

The National Eligibility cum Entrance Test (NEET) for admission to medical degree courses will be held once in 2021. Union Education Minister Dr. This information was given by Ramesh Pokhriyal.

NEET (UG) परीक्षा रविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये पेन-पेपर पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट यूजी परीक्षा घेतली जाते.

जेईई मेन २०२१ परीक्षा यंदा चार सत्रात आयोजित केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नीट परीक्षेबाबतही उत्सुकता होती. जेईई मेन प्रमाणेच नीट परीक्षेचे आयोजन एकापेक्षा अधिक वेळा होणार आहे का, असा प्रश्न विद्यार्थी विचारत होते. मात्र शिक्षणमंत्र्यांनी ही शक्यता यंदा पुरती तरी फेटाळून लावली आहे.

NEET Counselling 2020: दुसऱ्या फेरीची यादी जाहीर

NEET Counselling 2020: The allotment list of NEET Counseling 2020 for the second round of NEET Counseling in the state has been announced by the CET Cell. The list can be downloaded from the official website of  at mahacet.org.

NEET Counselling 2020 च्या दुसऱ्या फेरीची यादी सीईटी कक्षाने जाहीर केली आहे…

Maharashtra NEET Counselling 2020: राज्यातील नीट काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीची अलॉटमेंट यादी (NEET Counselling 2020) सीईटी कक्षाने (CET Cell) जाहीर केली आहे. सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट mahacet.org वरून ही यादी डाऊनलोड करता येईल.
स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने राज्याच्या कोट्यांतर्गत एमबीबीएस आणि बीडीएसमध्ये अॅडमिशनच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादीदेखील जाहीर केली आहे. यापूर्वी कक्षाने आयुर्वेदिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी निवड यादी जाहीर केली होती.

दुसऱ्या यादीत नाव आलेल्या उमेदवारांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत आहे.

Maharashtra NEET Counselling 2020 Round 2 अलॉटमेंट यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

NEET Counselling 2020

NEET UG Counselling 2020: दुसऱ्या फेरीला सुरुवात

MCC NEET UG Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने नीट यूजी काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. ही दुसरी फेरी आधी १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. पण एमसीसीने ती दोन दिवस लांबणीवर टाकली होती.

ज्या उमेदवारांनी नीट काऊन्सेलिंग २०२० च्या दुसऱ्या फेरीत सामील व्हायचे आहे, त्यांना पुन्हा रजिस्टर करावे लागेल. ज्या उमेदवारांनी पहिल्या फेरीच्या काऊन्सेलिंगमध्ये सीट अलॉट केली होती, मात्र ते त्या राऊंडमध्ये सामिल झाले नव्हते, असे उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.


तिसरी फेरी कधी?

तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.

NEET UG 2020: एमबीबीएस बीडीएस प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


Neet Ug 2020 Schedule For Admission Process Announced By Cet Cell

BAMS, BHMS सह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे…

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मंगळवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी गुरुवार ३ डिसेंबरपासून अर्जामध्ये पर्याय निवडायचे आहेत. तर, अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता बुधवारी २ डिसेंबरला जाहीर होईल, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.

सीईटी सेलने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी वेळापत्रकाची वाट पाहत होते. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी ३ ते १० डिसेंबर या दरम्यान आवडणाऱ्या कॉलेजांचे पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतर प्रवेशासाठी निवड यादी १२ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजेनंतर जाहीर होईल.

या निवड यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १३ ते २१ डिसेंबर दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे; तसेच रीटेन्शन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बीपीटीएच आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी नवे कॉलेज प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. त्याची माहिती www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

BAMS, BHMS आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.The second round of NEET-UG Counseling 2020 by the Medical Counseling Committee (MCC) is starting from today. This process is followed for admissions to 15% All India quota seats for MBBS, BDS courses.

The second round of counseling will be held from November 18th to 22nd. According to the proper counseling schedule, the deadline for filling up the preference order, paying the fee, in the Choice Locking facility etc. is 19th to 22nd November.

NEET UG Counselling दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात

NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने NEET UG Counselling 2020 ची दुसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. MBBS, BDS अभ्यासक्रमांच्या १५ टक्के ऑल इंडिया कोट्याच्या जागांवरील प्रवेशांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते.

काऊन्सेलिंगची दुसरी फेरी १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. नीट काऊन्सेलिंग शेड्युलनुसार, पसंतीक्रम भरणे, शुल्क भरणे, चॉइस लॉकिंग सुविधात आदी प्रक्रियांसाठी १९ ते २२ नोव्हेंबर अशी मुदत आहे.

MCC समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे. अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. पहिल्या फेरीचा निकाल ६ नोव्हेंबर रोजी जारी झाला होता. १६ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश निश्चित करायची मुदत होती.

तिसरी फेरी कधी?

तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र

या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


NEET Counselling 2020

NEET 2020 काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीतील कॉलेज रिपोर्टिंग प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे.

 

NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने NEET 2020 काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीतील कॉलेज रिपोर्टिंग प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी आता अलॉट झालेल्या कॉलेजांमध्ये १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत रिपोर्ट करू शकतात. यापूर्वी यासाठी १४ नोव्हेंबर पर्यंत मुदत होती.

विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


नीट समुपदेशनाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेश निश्चितीसाठी एमसीसीने १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढवली आहे. आधी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती करायची होती. आता १४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने शनिवारी यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


Neet Counselling 2020

नीट यूजी काऊन्सेलिंग फेरी लांबणीवर;

नीट यूजी काऊन्सेलिंग फेरी एका दिवसाने लांबणीवर पडली आहे…

NEET UG Counselling 2020: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ऑल इंडिया कोटासाठी सुरू होणारी नीट यूजी काऊन्सेलिंग फेरी एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवार २७ ऑक्टोबर पासून ही फेरी सुरू होणार होती, ती आता बुधवार २८ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होईल. काही तांत्रिक अडचण आल्याने हा निर्णय घेतल्याचे मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने (MCC) कळवले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी MCC संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने केलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS / BDS अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचे आहेत, त्यांना नोंदणी, शुल्क भरणे आणि पसंतीक्रम नोंदवणे या प्रक्रियेसाठी २ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकली नाही. ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे.

कशी करायची नोंदणी?

– नीट ऑल इंडिया काउन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी mcc.nic.in वर रजिस्टर करावे लागेल.
– एमसीसीच्या संकेतस्थळावर जा.
– होम पेजवर डावीकडे न्यू रजिस्ट्रेशन लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
– यात विचारलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करा. – रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक आयडी मिळेल.
– पुढील सर्व प्रक्रियेसाठी हा आयडी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तो सुरक्षितपणे नोंदवून ठेवा.

ही चूक करू नका
नीट यूजी काऊन्सेलिंगसाठी उमेदवाराला एकदाच रजिस्ट्रेशन करता येतं. त्यामुळे एकाहून जास्त वेळा रजिस्ट्रेशनचा प्रयत्न केल्यास तुम्हाला ब्लॉक केलं जाईल, ही गोष्ट ध्यानात ठेवा.

निकाल कधी?
एनईईटी समुपदेशन 2020 च्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी, शुल्क भरणे, पसंतीक्रम नोंदवणे यासाठी २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत प्रक्रिया राबवली जाईल. सीट अलॉटमेंटचा निकाल ५ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर होईल. समुपदेशनाची दुसरी फेरी १८ ते २२ नोव्हेंबर २०२० दरम्यान आयोजित केली जाईल.

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानुसार, यावर्षी देशातील ५२९ शासकीय, बिगर शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी ७५ हजार हून अधिक आणि बीडीएससाठी २६,९४९, आयुषच्या ५२,७२०, एम्सच्या १२०५, जिपमरच्या २०० आणि बीवीएसच्या ५२५ रिक्त जागांसह एकूण १ लाख ५६ हजार ५५९ जागांवर ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँकनुसार प्रवेश होतील.


Neet Counselling 2020 Schedule Released

नीट काउन्सेलिंग २०२० चे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे….

NEET Counselling 2020: वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर NEET 2020 च्या समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवार समुपदेशनाचे वेळापत्रक mcc.nic.in वर ऑनलाईन पाहू शकतात. समुपदेशन वेळापत्रक १५ % अखिल भारतीय कोटा (AIQ) आणि केंद्रीय व डीम्ड विद्यापीठे, AIIMS आणि JIPMER संस्थांनी प्रस्तावित केलेल्या जागांसाठी आहे. राज्य कोटा जागांसाठी नीट समुपदेशन २०२० संबंधित राज्यांमार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येईल.

वेळापत्रकानुसार एनईईटी समुपदेशन 2020 च्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी, शुल्क भरणे, पसंतीक्रम नोंदवणे यासाठी २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत प्रक्रिया राबवली जाईल. सीट अलॉटमेंटचा निकाल ५ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर होईल. समुपदेशनाची दुसरी फेरी १८ ते २२ नोव्हेंबर २०२० दरम्यान आयोजित केली जाईल.

(वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रवर्गनिहाय कटऑफ स्कोर

सामान्य वर्ग- ७२०- १४७

ओबीसी, एससी,एसटी- १४६-११३

दिव्यांग सामान्य- १४६- १२९

दिव्यांग आरक्षित -१२८- ११३

५२९ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १.५६ लाख जागा

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानुसार, यावर्षी देशातील ५२९ शासकीय, बिगर शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी ७५ हजार हून अधिक आणि बीडीएससाठी २६,९४९, आयुषच्या ५२,७२०, एम्सच्या १२०५, जिपमरच्या २०० आणि बीवीएसच्या ५२५ रिक्त जागांसह एकूण १ लाख ५६ हजार ५५९ जागांवर ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँकनुसार प्रवेश होतील.

NEET चा निकाल कधी आला?

एनईईटीचा निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. यंदा ओडिशाच्या शोएब आफताबने नीट परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने ७२० पैकी ७२० गुण मिळवले आहेत.

यावर्षी टॉप ५ मध्ये तीन मुली आहेत. टॉप ५ विद्यार्थ्यांची नावे (कंसात गुण) पुढीलप्रमाणे –

१- शोएब आफताब (७२०)

२- आकांक्षा सिंह (७२०)

३- त्वमला स्निक्था (७१५)

४- विनीत शर्मा (७१५)

५- अमृता खेतान (७१५)

नीट वेळापत्रक

neet-counseling 2020 Process Neet Counselling Likely To Begin In October End

NEET काऊन्सेलिंग २०२० प्रक्रिया कधी सुरू होणार? जाणून घ्या प्रवेशासंबंधी माहिती

NEET Counselling 2020:: नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नीट 2020 परीक्षेचे आयोजन केले होते. नीट २०२० निकालानंतर आता एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी एमसीसी Medical Counseling Committee (MCC) म्हणजेच वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीने आरोग्य विज्ञान महासंचालनालय (DGHS) नीट काउन्सेलिंग २०२० चे वेळापत्रक जारी करेल. नीट समुपदेशन फेऱ्यांना ऑक्टोबर अखेर सुरुवात होण्याची शक्यता आहे. नीट काऊन्सेलिंग 2020 साठी ऑनलाइन नोंदणी होणार आहे.

अखिल भारतीय नीट काउन्सेलिंग २०२० दरम्यान नीट साठी सुमारे ३१७ एमबीबएस आणि २२ डेंटल ESIC जागा ऑल इंडिया कोट्यांतर्गत उपलब्ध होणार आहेत.

NEET काउन्सिलिंग प्रक्रियेत एकूण २३५ मेडिकल कॉलेज सहभागी होणार आहेत. NEET 2020 काउन्सेलिंगसाठी एकूण तीन फेऱ्या आयोजित केल्या जातील, त्यात मॉप-अप राऊंडही असेल. हा राउंड केवळ डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी तसेच ESIC कॉलेजांसाठी आयोजित केला जातो.

NEET Counselling 2020 : नीट काउन्सेलिंगची प्रक्रिया पुढीलप्रमाणे होते –

1) रजिस्ट्रेशन –
काउन्सेलिंगसाठी सर्वात आधी mcc.nic.in वर रजिस्टर करा. उमेदवारांना आपला रोल नंबर, नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख आदी माहिती तेथे भरावी लागेल.

२) काऊन्सेलिंग शुल्क –
उमेदवारांना काऊन्सेलिंग प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी नियोजित वेळेच्या आत शुल्क भरावे लागेल. शुल्क क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरता येईल.

३) लॉकिंग चॉइस –
आपल्या पसंतीचा अभ्यासक्रम निवडा आणि कॉलेजचं प्राधान्यक्रम निवडा.

४) सीट अलॉटमेंट लिस्ट –
प्रत्येक राऊंडनंतर नीट सीट अलॉटमेंटचा निकाल जारी केला जाईल.

कधी आणि कशी होईल नीट परीक्षा?
नीट परीक्षेसाठी एकूण १५.९७ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील ८५ ते ९० टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली. यावर्षी सुमारे १४.३७ लाखांहून अधिक उमेदवार महामारी असूनही १३ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रवेश परीक्षेत सामील झाले होते.

कंटेन्मेंट झोनमधील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती, त्यांच्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या परीक्षार्थींना देशातील सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेसमध्ये प्रवेश मिळणार आहे.


NEET Results 2020

नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. स्वत: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली.

NEET 2020 ची अंतिम उत्तरतालिका जारी

निकाल चेक करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे, आपण सरळ निकाल बघू शकता,

नीट परीक्षेचा निकाल जाहीर. परंतु तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर होत आहे,थोड्याच वेळात site सुरु होणे अपेक्षित आहे,.

The NEET 2020 results seem to be temporarily unavailable shortly after being announced. The official website now shows the message —”The NEET (UG) – 2020 result will be available soon.” 

नीटचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता लागण्याची शक्यता आहे. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. मात्र, कोविड-१९ संसर्गामुळे किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ८५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

असा पाहा निकाल –

नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
– सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
– यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
– नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
– आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.


‘नीट’ चा निकाल कधी कोर्टाने सांगितले; गुरुवारी पुन्हा परीक्षा

‘नीट’ चा निकाल कधी जाहीर करायचा, कोर्टाने एनटीएला सांगितले…

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) चा निकाल येत्या शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची नीट परीक्षा कोविड-१९ संक्रमणामुळे हुकली आहे, त्यांच्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतरच निकाल जाहीर होणार आहे. या अंतिम निकालासोबतच एनटीए नीट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आणि गुणवत्ता यादीदेखील जाहीर करणार आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट १३ सप्टेंबर २०२० रोजी पेन-पेपर स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एनटीएने माहिती दिली होती की परीक्षेत ८५-९० टक्के विद्यार्थी सहभागी झाले होते. कोविड-१९ महामारीमुळे परीक्षा दोन वेळा स्थगित करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यापूर्वी नीटची प्रोव्हिजनल आन्सर की आणि उमेदवारांची NEET OMR आन्सरशीट जारी केली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनीही ट्विट करत नीट परीक्षेच्या निकालाच्या तारखेबाबत माहिती दिली आहे. ही परीक्षा १६ ऑक्टोबरला कोणत्या वेळेला आयोजित केली जाणार त्याची माहिती लवकरच दिली जाणार आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांवर परिणाम

देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यााक्रमांच्या प्रवेशांसाठी NEET UG परीक्षा होते. यावर्षी NEET UG चे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे, कारण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ मिळाला होता आणि पेपर तुलनेने सोपा होता.


NEET 2020: मोठी बातमी! नीट परीक्षेचा निकाल आज होऊ शकतो जाहीर, असा करा चेक

नीट परीक्षेचा निकाल आज (सोमवार, 12 ऑक्टोबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरात 13 सप्टेंबर रोजी जवळपास 3,843 परीक्षा</a> केंद्रांवपरीक्षा  घेण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जवळपास 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. लाखो विद्यार्थी निकालाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज नीट 2020 चा निकाल आपली अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जाहीर करू शकते.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास उशीर होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result 2020) हा 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे.

 नीट परीक्षेचा निकाल असा चेक करा 

 •    सर्वप्रथम नीटच्या ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
 •  – नीट अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन टाकून सबमिट करा.
 •  नीट 2020 चा निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल.
 •  – रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.</p>

NEET Exam 2020

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांनी कोणते पर्याय निवडले होते, त्या ओएमआर शीट्स एनटीएने जारी केल्या आहेत. यापूर्वीच जाहीर केलेल्या उत्तरतालिकेवरून आता विद्यार्थी आपले संभाव्य गुण किती ते काढू शकतील…

NEET OMR Sheet 2020: राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीने (एनटीए) आपली अधिकृत वेबसाइट ntaneet.ac.in वर ओएमआर शीट (OMR) जारी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET 2020 परीक्षा दिली आहे, ते आपल्या उत्तरपत्रिकेसह ओएमआर शीट जुळवून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या सर्व विषयांमध्ये त्यांची उत्तरे पाहू शकतात. एनटीएने उमेदवारांना नीट 2020 च्या ओएमआर शीटवर आक्षेप घेण्याची संधीही दिली आहे. नीट परीक्षेस हजेरी लावणारे उमेदवार आता ओएमआर शीट डाउनलोड करु शकतात आणि त्यांचे उत्तर नीट २०२० उत्तरतालिकेसोबत जुळवून पाहू शकतात. यामुळे त्यांना त्यांचा संभाव्य स्कोअर कळण्यास मदत होईल.

नीट ओएमआर शीट २०२०: कसे डाउनलोड करावे?

प्रथम अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर जा.
– यानंतर, होम पेजवर ‘NEET 2020 OMR Sheet’ वर क्लिक करा.
– आता जेव्हा नवीन पृष्ठ उघडेल तेव्हा आपली माहिती जसे की नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आदी माहिती भरा.
– नीट 2020 ओएमआर शीट आपल्या स्क्रीनवर उघडेल.
– आपण ओएमआर शीट डाउनलोड करू शकता आणि उत्तरतालिके सह आपले उत्तर पडताळून पाहू शकता.

नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी देशभरातील ३,८४३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार यंदा जवळपास ९० टक्के विद्यार्थी नीट परीक्षेला बसले. यावेळी एकूण १५ लाख ९७ हजार लाख उमेदवारांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापूर्वी एनटीएने नीट 2020 च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका जारी केली आहे.


NEET 2020 Question Paper: एनटीएने प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम (NEET 2020) परीक्षेत विचारलेले प्रश्न सार्वजनिक केले आहेत. एनटीएने नीट २०२० च्या सर्व प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. या त्या सर्व भाषांच्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्या भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.

NEET UG परीक्षा २०२० उत्तरतालिका जाहीर

नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (ntaneet.nic.in) इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या सोयीनुसार अन्य भाषेतील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येतील. यासाठी कुठलाही लॉगइन आयडी किंवा अन्य तपशील देण्याची आवश्यकता नाही.

प्रश्पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून संबंधित भाषेतील प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर प्रश्नपत्रिका पीडीएफ फॉरमॅटमध्ये उघडेल. ती डाऊनलोड करा.

तयारीसाठी होईल मदत

या प्रश्नपत्रिका विशेष करून त्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहेत, जे नीटची तयारी करत आहेत. पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिल्यास परीक्षेचा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. सोबत यावर्षी विचारलेल्या प्रश्नांचा सरावही होईल.

कधी येणार निकाल?

नीट २०२० च्या प्रोव्हिजनल आन्सर की वर हरकती मागवण्यात आल्या आहेत. आता या परीक्षेची अंतिम आन्सर की जारी होईल आणि त्यानंतर निकाल जारी होईल. एनटीए ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीट परीक्षेचा निकाल जारी करण्याची शक्यता आहे.


नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली.

NEET 2020 Update: एम्स (AIIMS), जिपमर (JIPMER) सह देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएस (MBBS/BDS) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र निकालाआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटसंबंधी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांना निकालाच्या आधी एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितले आहे.

कशाबद्दल आहे परिपत्रक?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची एक संधी दिली आहे. जे विद्यार्थी १३ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी पुन्हा एकवार आपला नीट परीक्षा अर्ज पाहायचा आहे. जर त्यात कुठली दुरुस्ती करायची असेल तर ती आताच करायची आहे. कारण त्या अर्जातली माहितीच विद्यार्थ्यांना नीट निकालात असणार आहे.

कोणत्या रकान्यात करू शकता दुरुस्ती?
आईचे नाव
वडिलांचे नाव
लिंग
कॅटेगरी
पर्सन विथ डिसअॅबिलिटी
स्टेट कोड एलिजिबिलिटी
नॅशनॅलिटी

दुरुस्ती करण्यासाठी नीट संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. विद्यार्थी ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करु शकतात. शुल्क जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११.५० पर्यंतचा वेळ दिला गेला आहे.

पुन्हा भरावे लागणार का शुल्क?

परिपत्रकात असं म्हटलं आहे की अर्जात पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार की नाही हे कुठल्या प्रकारची दुरुस्ती केली जाणार त्यावर ठरणार आहे. जर तुम्हाला कुठल्या अशा रकान्यात दुरुस्ती करायची आहे, ज्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यायचे आहे, तर ते तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे करू शकता.

ही चूक करू नका

एनटीए ने सांगितलं आहे की ईमेल, फॅक्स किंवा अन्य माध्यमांद्वारे अर्जात सुधारणा करण्यासंबंधी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. ही प्रक्रिया तुम्हाला स्वत: वेबसाइटला भेट देऊन पूर्ण करायची आहे.

एनटीएचे परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) १३ सप्टेंबरला घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) परीक्षेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षी काहीना काही विघ्न येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत २५ हजारांवर विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र आणि केंद्राची संख्या वाढवून एनटीएने यंदा बरेच नीटनेटके नियोजन केल्याचे दिसून येते. दुपारी २ ता ५ या दरम्यान पेपर घेण्यात येणार असून १.३० वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करावे लागणार आहे.

दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी “नीट’ परीक्षा घेण्यात येते. दोन वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईईनंतर देशातील सर्वात मोठी परीक्षा असल्याने येत्या १3 सप्टेंबरला वैद्यकीय प्रवेशांसाठी आवश्यक असलेल्या नीट प्रवेश परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. यात शहरात ६४ केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर ३६० ते ४२० म्हणजे जवळपास २५ हजारांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल.

‘नीट’ परीक्षा घेण्यासाठी देण्यात आलेले शहरातील भारतीय कृष्णा विद्या विहार हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी काटोल येथील नबीरा महाविद्यालयाजवळील ऑर्चिड पब्लिक स्कूल हे केंद्र ठेवण्यात आले आहे. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे विद्यार्थ्यांना फोन, ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. मात्र, वेळेवर केंद्रात बदल करण्यात आल्याने नागपूरमधील विद्यार्थ्यांना काटोलला जावे लागणार आहे. या प्रकाराने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

 एका वर्गखोलीत १२ विद्यार्थी 

प्रत्येक वर्गखोलीत एका निरीक्षकाच्या देखरेखीखाली केवळ १२ विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर हात धुण्यासाठी ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर, साबणाची व्यवस्था करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. संसर्गामुळे यंदा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी केंद्रावर एकमेकांपासून कमीत कमी सहा फूट जागा राखणे आवश्यक केले आहे.

 परीक्षेपूर्वी ‘थर्मल स्कॅनिंग’द्वारे तपासले जाणार 
नीट परीक्षेदरम्यान दरवर्षी केंद्रावर मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही गर्दी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये २ हजार ५४६ केंद्र होती. मात्र, त्यात वाढ करून ३ हजार ८४३ केंद्र देशभरात वाढविण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तालुका पातळीवर केंद्राची सोय करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळाला आहे.

 केंद्रावर जाताना घ्या ही काळजी 

परीक्षेसाठी फेरमूल्यांकनाची सोय उपलब्ध नसून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्राची व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रावर पेन्सिल बॉक्‍स, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, मोबाईल, इलेक्‍ट्रीक गॅझेट आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय मुलांना सुती कपडे, हाफ शर्ट वा टी-शर्ट घालून जावे लागणार आहे. मुलींनीही हेअरपीन, ब्रेसलेट वा गळ्यात चेन घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रावर येताना जोडे घालून येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र, मधुमेही विद्यार्थ्यांना शुगर टॅबलेट, हॅन्ड बॅग, फळ आणि पारदर्शी बॉटल नेता येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहचावे लागणार आहे.

लालपरीही सज्ज 

नीट परीक्षेसाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र आहेत. यामुळे बसस्थानकांवर गर्दी होण्याची तशी शक्यता नाही. पण, विद्यार्थी आल्यास ते परीक्षेपासून वंचित राहू नयेत यादृष्टीने एसटी महामंडळाने तयारी केली आहे. नेहमीच्या महत्वाच्या मार्गांवर अधिकच्या फेऱ्यांचे नियोजन करण्याच्या सूचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सोबतच विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता तालुका स्तरावरून अधिकच्या बसेस सोडण्यासाठी नियोजन करून ठेवण्यास सांगण्यात आल्या आहेत. गरजेनुकार तालुका व आंतरजिल्हा फेऱ्या सोडण्यात येणार आहे. त्यासाठी १५ ते २० अधिक बसेस तयार ठेवण्यात येतील, गरज भासल्यास फेऱ्यांची संख्या वाठविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

 ७२० गुणांचे प्रश्‍न 

एनटीएद्वारे नुकतेच प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहेत. ७२० गुणांची परीक्षा असून यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयांचे १८०-१८० गुणांचे ४५-४५ प्रश्‍न विचारण्यात येतील. जीवशास्त्र विषयात ३६० गुणांचे ९० प्रश्‍न विचारण्यात येतील.


Neet 2020 Neet Preparation Last Few Days Revision Plan

NEET 2020 Preparations: The National Eligibility Cum Entrance Test (NEET 2020) for admission to degree courses in various government and other medical colleges across the country will be held on September 13. Students have only a few days left to prepare for this exam. Students, you are preparing for COVID-19 sitting at home due to infection and lockdown. You have to work a little harder as you will not get any readymade help. So focus on regular, consistent, and planned study. This test is a test of your competitiveness and knowledge, depending on how well you prepare. So here are some tips to help you prepare for 2020.

नीट परीक्षेच्या तयारीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. या शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करावा जाणून घ्या…

NEET 2020 Preparations: देशभरातील विविध शासकीय आणि अन्य मेडिकल कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्था NEET 2020 येत्या १३ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडे या परीक्षेच्या तयारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही कोविड-१९ संसर्ग स्थिती आणि लॉकडाऊनमुळे घरात बसूनच तयारी करत आहात. तुम्हाला कोणतीही रेडिमेड मदत मिळणार नसल्याने थोडी अधिक मेहनत करावी लागत आहे. म्हणूनच नियमित, सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यासावर भर द्या. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तयार केली आहे त्यावर अवलंबून असलेली तुमची स्पर्धात्मक क्षमता आणि ज्ञान याची कसोटी म्हणजे ही परीक्षा आहे. त्यामुळे घरबसल्या नीट २०२० ची तयारी कशी करायची त्याबाबतच्या टिप्स लक्षात घ्या….

शेवटच्या दिवसांमधील उजळणीसाठी टिप्स –

– जे आधी वाचलंय त्यावर अखेरचा हात फिरवा

शेवटच्या २०-२५ दिवसात नवे विषय हाताळणे टाळलेलेच बरे. त्याऐवजी जे टॉपिक तुम्ही छान पद्धतीने आत्मसात केले आहेत, त्यांची उजळणी करा.

– मॉडेल ग्रँड टेस्ट्स

शेवटच्या १५ दिवसात जितक्या शक्य तितक्या NEET Model Grand Tests द्या. यामुळे पेपरचं आकलन आणि तयारी पूर्ण होईल. मॉक टेस्टमुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल. या स्पर्धा परीक्षांमध्ये वेळेला अतोनात महत्त्व असतं.

– स्मार्ट अभ्यास

प्रभावी अभ्यासासाठी स्मार्टपणे अभ्यास करणे गरजेचे असते. तुमची बळकट स्थाने, कमजोर स्थाने ओळखा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा.

– फॉर्म्युला आणि नोट्स

स्वत:च्या नोट्सचा अभ्यास करा. महत्त्वाचे फॉर्म्युले हायलाइट करून ठेवा. दिवसभरातून एकदा या महत्त्वाच्या फॉर्म्युल्यांवर नजर मारा.

– नोट्सची उजळणी करा

तुम्ही किती अभ्यास पूर्ण केल्या यापेक्षा तुम्ही अभ्यास किती नीट केलाय यावर नीट परीक्षेतील कामगिरी ठरेल. यासाठी दररोज नोट्सची उजळणी करा. सिलॅबसची विभागणी करून उजळणी करा. नोट्स या वेळेची बचत करणाऱ्या आणि नियोजनबद्ध अभ्यासासाठी असतात. हायलाइट केलेले मुद्दे, विभाग नोट्समध्ये असावेत.

– मागील वर्षांचे प्रश्न

तुमची तयारी किती चोख आहे हे पाहण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. नीटचा अभ्यास खूप व्यापक असतो. त्यामुळे काही भाग राहून जाणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मागील प्रश्नपत्रिका सोडवताना बहुतांश प्रश्नांचे स्वरुप स्पष्ट होईल.

– परीक्षेतील अचुकता आणि वेळेचे व्यवस्थापन

वेळेचे व्यवस्थापन आणि अॅक्युरसीच्या स्वत:च्या पद्धती शोधून काढा. कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते नाही याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात स्पष्टता हवी.

– आरोग्य चांगले राखा

सद्यस्थिती पाहता, करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. अभ्यास करताना मध्ये थोडा ब्रेक घ्या. विश्रांती घ्या. दररोज किमान ६ ते ७ तास झोप घ्या. चांगला आहार घ्या. खूप पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका.

NEET 2020 Exam Centre City Update

NEET 2020 Exam Centre City Update: A circular has been issued regarding the NEET entrance examination for admissions to medical degree courses (MBBS / BDS). The National Testing Agency (NTA) has issued this circular on its official website nta.ac.in. This circular has given important information regarding the examination centers for 2020. For the first time, ATA is providing this facility to the students of NEET. Each time the information about the city in which the examination center will be located is given in the admit card. But for the first time this year, students are getting this information first.

NEET 2020: परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती विद्यार्थ्यांना लवकर कळणार!

यंदा प्रथमच नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती लवकर कळणार आहे…

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (MBBS / BDS) होणारी नीट (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आपले अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर हे परिपत्रक जारी केले आहे.

नीट २०२० च्या परीक्षा केंद्रांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. एटीए पहिल्यांदाच नीटच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देत आहे. दरवेळी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल, याची माहिती अॅडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्रात दिली जाते. पण यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ही माहिती आधी मिळत आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत अॅडमिट कार्ड मिळायच्या आधीच एनटीए आणि नीटच्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती दिली जात आहे, जेणेकरून आयत्या वेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची कसरत करावी लागू नये. जर परीक्षा केंद्राचे शहर त्यांच्या वर्तमान शहरापेक्षा वेगळं असेल तर तेथे पोहोचण्याची तयारी त्यांना करता येईल.

आपल्या परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या लिंकवरून तपासता येईल.

अॅडमिट कार्डची माहिती

या परिपत्रकात एनटीएने हेही सांगितले आहे की नीट २०२० साठी लवकरच अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि पत्ता, प्रश्नपत्रिकेचे माध्यम (भाषा), रिपोर्टिंग आणि एंट्री टाइम, परीक्षा केंद्राचे गेट बंद होण्याची वेळ आदी माहितीचा समावेश असेल.

एनटीएद्वारे नीट २०२० चे आयोजन १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळा ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

हेल्पलाइन क्रमांक

नीट २०२० संबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. पुढे दिलेल्या ईमेल वा संपर्क क्रमांकाद्वारे एनटीएशी संपर्क साधता येईल –

ईमेल आयडी – [email protected]

संपर्क क्रमांक –
८२८७४७१८५२,
८१७८३५९८४५,
९६५०१७३६६८,
९५९९६७६९५३,
८८८२३५६८०३

NTA द्वारे NEET Exam centre city संबंधी जारी करण्यात आलेले परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!