आदिवासीं विकास भरती रिक्त पदांचा तपशील

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2021

आदिवासींची रिक्त पदे त्वरित भरा – १२ हजार ५०० पदे रिक्त

अपडेड: १.०३.२०२१: आदिवासी युवक रोज मजुरी करून शिक्षण घेतात. मात्र, बिगर आदिवासींनी खऱ्या आदिवासींची नोकरी बळकावली आहे. शासकीय सेवेतील ती पदे रिक्त करून त्याचा लाभ खऱ्या आदिवासींना द्यावा, अशी मागणी आहे. आदिवासींच्या विशेष पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रमाची मुदत संपली, तरीही १२ हजार ५०० रिक्त पदांपैकी केवळ २८ पदे भरली. ही आदिवासी समाजाची थट्टा व दिशाभूल आहे.

 उर्वरित पदांविषयी जाहिरात काढण्यात आली नाही. रिक्त जागांचा कालबद्ध कार्यक्रम आखून दिल्यावरही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे शासन आदिवासी समाजाची फसवणूक व दिशाभूल करीत आहे, असा आरोप करण्यात आला. अनुसूचित जमातीच्या राखीव जागा त्वरित भरण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. यावेळी डॉ.आरती फुपाटे, सुरेश सिडाम, सचिन आत्राम, नारायण कऱ्हाळे, स्वप्निल माहुरे, वसंतराव इंगळे, भागोराव भिसे आदी उपस्थित होते.

सोर्स: लोकमत


Although the special recruitment program was expired for Adiwasi Vikas Vibhag, only 28 out of 12,500 vacancies were filled. Advertisements for the remaining posts were also not removed. As a result, the vacancies in the constitutional rights of the tribal community have not been filled even after a periodic program has been drawn up. Naturally, the tribal community was misled and deceived. The Birsa Kranti Dal has expressed regret in its statement.
शिराळा : राज्यभरात खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमातींची बिगरआदिवासींनी बळकावलेली बारा हजार ५०० पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्याची मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिवांकडे करण्यात आली.

याबाबतचे निवेदन शिराळा तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दि. ६ जुलै, २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व तद्अनुषंगाने उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या आदेशान्वये राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दि. २१ डिसेंबर २०१९ निर्गमित करून बिगरआदिवासींनी आदिवासींच्या बळकावलेल्या राखीव जागा रिक्त करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दिलेली होती. आणि रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रधारक उमेदवारांमधून सेवाप्रवेश नियमानुसार विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यासाठी, कालबद्ध कार्यक्रम आखून पदे भरण्याची कार्यवाही करण्याचे राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना व खुद्द त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालयांना आदेशित केले होते.

मात्र विशेष पदभरतीच्या कालबद्ध कार्यक्रमाची मुदत संपून गेली तरी १२,५०० रिक्त पदांपैकी फक्त २८ पदे भरण्यात आली. उर्वरित पदांविषयी जाहिरातीही काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रिक्त झालेल्या आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा कालबद्ध कार्यक्रम आखून दिल्यावरही भरण्यात आलेल्या नाहीत. स्वाभाविकपणे आदिवासी समाजाची दिशाभूल होऊन फसवणूक झाली. याबाबत बिरसा क्रांती दलाने आपल्या निवेदनात खेद व्यक्त केला आहे.

आदिवासी समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. समाजातील उच्चशिक्षित युवक, युवती घटनात्मक हक्काच्याही राखीव जागा मिळत नसल्यामुळे निराशेच्या गर्तेत आहे. कसेबसे पोटभरण्यासाठी जिवाचे रान करून पायपीट करीत आहे ही परिस्थिती लक्षात घेता आतातरी बिगरआदिवासींनी हडपलेली राज्यातील सर्वच विभागातील अनुसूचित जमातींच्या राखीव जागा तात्काळ भरण्यात याव्यात.

आणि याकरिता जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येतात त्या पदांच्या जाहिराती काढून भरण्यात याव्यात तसेच जी पदे आयोगाच्या कक्षेबाहेर, जिल्हा निवड समिती व इतर नियुक्ती प्राधिकरणाच्या कक्षेत येतात. ती पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिराती काढण्यासाठी पुन्हा कालबद्ध कार्यक्रम आखून भरण्याची कार्यवाही सुरू करावी. आणि विहित कालावधीत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, तालुका संघटक मनिराम चौधरी, सहसंघटक जगन चौधरी, अरुण ठाकरे यांच्या निवेदनावर सह्या आहे.


Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2020:  Tribal Development Mumbai has published the notification for the recruitment of Law Officer Posts. Job Location for these posts in Mumbai. All Willing applicants need to submission of the application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 13th November 2020. More details about Tribal Development Mumbai Bharti 2020 like application and application address are given below.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संविधी अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज सदर करावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, मुंबई

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2020
 • पदाचे नाव – विधी अधिकारी
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता – [email protected]
 • अधिकृत वेबसाईट:https://tribal.maharashtra.gov.in/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32

Tribal Development Department  Bharti 2020 

👉 Department (विभागाचे नाव)  Tribal Development Department Mumbai
⚠️ Recruitment Name
Adivasi Vikas Vibhag Mumbai Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Law Officer 

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Law Officer 
Retied Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  13th Nov 2020

Important Link of Maha Tribal Mumbai Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

2 Comments
 1. Pravin. Warkhede says

  Where is the tribal development department vacancy available in this msw

 2. Pravin. Warkhede says

  ,गृहपाल आणि अधिक्षक या पदासाठी जाहिरात केवा निघणारं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!