BMC Bharti-मुंबई महानगरपालिकेत १० हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
BMC Bharti 2022 - Advertisement, Vacancy Details, Online Apply
BMC Bharti 2023
MCGM Bharti 2023 |Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 – Latest Updates regarding Brihanmumbai Municipal Corporation Bharti is that The way for the recruitment process of Mumbai Municipal Corporation stalled since 2017 is clear and soon more than 10 thousand posts will be recruited. Read More details are given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची संधी भरपूर पगार- लगेच अर्ज करा
मुंबई महानगरपालिकेचा २०१७ पासून रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध पदांअंतर्गतच्या सुमारे १० हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारच्या शासन आदेशाच्या पाठोपाठच मुंबई महानगरपालिकाही भरतीबाबतचे एक परिपत्रक जारी करणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध विभागनिहाय भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्याबाबतची स्पष्टता या परिपत्रकामुळे येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला भरती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करता येईल. कोरोनामुळेही ही भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांमध्ये रखडली होती.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
- मुंबई महानगरपालिकेच्या १० हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून मंदावली होती. परंतु शासनाच्या अध्यादेशामुळे आता एजन्सी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेकडूनही परिपत्रक काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये एजन्सीसोबत करण्याचे करार, अटी व शर्थी यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे.
- त्यामुळेच पालिकेच्या विविध विभागांमध्ये असलेली मनुष्यबळाची भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करता येणे शक्य होणार आहे. येत्या आठवड्याभरात हे परिपत्रक पालिकेकडून जारी होणे अपेक्षित आहे.
- त्यामुळे पालिकेतील विविध विभागांना भरती प्रक्रियेसाठीची एजन्सी नेमून रिक्त जागांची भरती करणे शक्य होईल. परिपत्रक निघाल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यात ही प्रक्रिया पुर्ण करणे शक्य असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
राज्य सरकारकडून फेब्रुवारी, मे आणि ऑक्टोबर असे तीनवेळा भरती प्रक्रियेसाठीचे शासन आदेश निघाले. त्यामुळेच पालिकेलाही यानुसारच परिपत्रक जारी करावे लागणार आहे. याआधीही पालिकेने परिपत्रक जारी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु नव्या आदेशामुळेच हे परिपत्रक जारी करण्यापासून रखडले. आता शासनाचे तिसऱ्यांदा आदेश आल्याने पालिका विविध विभागांना परिपत्रक जारी करणार आहे. त्यानंतरच भरती प्रक्रियेला सुरूवात होईल.
मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात सध्या १६०० लिपिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यानुसारच पालिकेच्या विविध विभागांमध्ये जागा रिक्त आहेत. पालिकेच्या विविध विभागांच्या गरजेनुसार ही भरती प्रक्रिया आगामी महिन्याभरात सुरू होणे अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या आदेशानुसार टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणे अपेक्षित आहे
या पालिकेच्या अतिक्रमण विभागात ८८ पदे रिक्त; जाणून घ्या
BMC Bharti 2022- As per the latest news, There are 88 vacancies in the Encroachment Department of BMC.RTI activist Anil Galgali has been informed by NMC that 88 out of the total 505 posts in NMC’s encroachment department are vacant. That is why unauthorized peddlers are getting free rein, said Galgali. According to the Municipal Corporation, there are posts of Senior Inspector (Encroachment Elimination), Inspector (Vehicle) and Workers to remove encroachments of unauthorized peddlers.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे पदविकाधारकांसाठी नोकरीची संधी -जाहिरात प्रकाशित
मुंबईतील प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या बाहेर, बस थांब्याजवळ, पदपथावर, रस्त्याच्या कडेला, मोकळी जागा दिसेल तिथे अनधिकृत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक कोंडीचीही (Traffic jam) समस्या निर्माण होते. अनेक वेळा फेरीवाले आणि नागरिकांची बाचाबाचीही होते. त्यानंतर तात्पुरती कारवाई होते; मात्र पालिकेकडून (BMC) सातत्याने ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामागे पालिकेकडे तुटपुंजे मनुष्यबळ असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई जिल्यातील इतर सर्व भरती जाहिराती येथे पहा
महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एकूण ५०५ पदांपैकी ८८ पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळेच अनधिकृत फेरीवाल्यांना मोकळे रान मिळत असल्याचे गलगली यांनी सांगितले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन), निरीक्षक (वाहन) आणि कामगार, अशी पदे आहेत.
यात सर्वात जास्त रिक्त पदे कामगारांची असून त्याची संख्या ८१ आहे. मंजूर पदे ३७३ असून सध्या २९२ कामगार कार्यरत आहेत. वरिष्ठ निरीक्षकांची २५ पदे मंजूर असून ५ पदे रिक्त आहेत; तर निरीक्षकाची १०७ पदे मंजूर असून सध्या १०५ पदे कार्यरत आहेत; तर दोन पदे रिक्त आहेत. क्लीन अप मार्शलचे सहकार्य घ्यावे! मुंबईत वाढलेल्या फेरीवाल्यांच्या तुलनेत अतिक्रमण हटवणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड कमी आहे.
त्यामुळे या कामासाठी क्लीन अप मार्शलचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची आणि क्लीन अप मार्शल यांचे सहकार्य घेण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
114 post chi bharti keva karnar 2019 made form bharala aahe aata 4 varsh zali aata 2022 chalu aahe aata mulanche vy nigun gele thala kon jababdar aahe corona che 3ri lat sampat aali tari BMC चे डोळे keva ughdnar Ami nisedh karto सरकारचे v BMC che