CAT 2020 परीक्षेत यंदा करोनामुळे मोठे बदल!

CAT Exam 2020

CAT 2020 परीक्षेत यंदा करोनामुळे मोठे बदल!

कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. यंदा करोना व्हायरस महामारीमुळे या परीक्षेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

CAT 2020 परीक्षेत यंदा करोनामुळे मोठे बदल!
CAT 2020 exam latest update: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) सह देशातील आघाडीच्या मॅनेजमेंट संस्थांमधील पदव्युत्तर पदवी (PG) अभ्यासक्रमांसाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. यंदा करोना व्हायरस महामारीमुळे या परीक्षेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या आयआयएम इंदूर (IIM Indore) ने यासंदर्भातील सूचना जारी केली आहे.
आयआयएम इंदूरचे संचालक हिमांशु राय यांनी सांगितले की, ‘यंदा कॅट परीक्षेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. परीक्षा तीन तासांऐवजी दोन तासांची असेल. परीक्षेत तीन विभाग असतात. आधी प्रत्येक विभाग एक तासाचा होता. पण यावर्षी मात्र हे तीन्ही विभाग प्रत्येकी ४० मिनिटांचे असतील. या व्यतिरिक्त परीक्षेच्या सत्रांमध्येही वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत परीक्षा दोन सत्रात होत होती, यंदा ती तीन सत्रांत होईल.’परीक्षेदरम्यान एका वेळी विद्यार्थ्यांची संख्या कमी असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्रांची संख्या वाढवून परीक्षेचा कालावधी मात्र कमी करण्यात आला आहे.
हिमांशु राय म्हणाले, ‘आयआयएम केंद्रांची तपासणी केल्याशिवाय परीक्षा केंद्रांची संख्या वाढू शकत नव्हते. म्हणून परीक्षेचा कालावधी कमी करून सत्रांची संख्या वाढवण्याचा मार्ग सर्वात योग्य वाटला. सोबतच दोन सत्रांच्या मध्ये बऱ्यापैकी वेळ असेल जेणेकरून विद्यार्थ्यांची एन्ट्री आणि एक्झिट गेटवरची सॅनिटायझेशनची प्रक्रिया योग्य पद्धतीने होईल.’

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!