CBSE दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार

CBSE 10th 12th Board Exams 2021

CBSE 10th 12th Board Exams 2021: Regarding the dates of board exams, Education Minister Ramesh Pokhriyal said, “Board exams cannot be held in January. But we will consider when the exams can be held after February. This means that board exams will not be held till January-February and it will be considered when to take them after that. Explaining how the board exams will be conducted, the Minister said that there are more than 24,000 schools affiliated to CBSE in these rural areas. So online exams are not currently possible.

CBSE दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार

CBSE बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले…

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी लाइव्ह वेबिनारद्वारे शिक्षकांसोबत संवाद साधला. या दरम्यान शिक्षकांनी विचारलेल्या दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भातील प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. एका शिक्षकाने बोर्ड परीक्षा रद्द होणार का अशा विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोखरियाल म्हणाले, ‘सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करते. आम्ही कोविड १९ ला विद्यार्थ्यांवर परिणाम करू देणार नाही. परीक्षा स्थगित केल्यास विद्यार्थ्यांवर कोविड १९ विद्यार्थी असा शिक्का बसू शकतो. म्हणून त्यांना परीक्षा घेऊनच पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल.’

पोखरियाल पुढे म्हणाले, ‘आम्ही याच वर्षी जेईई, नीट परीक्षांचे आयोजन केले होते. कोविड १९ महामारी काळात आयोजित केली गेलेली या सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक होत्या.’

फेब्रुवारी २०२१ पर्यंत बोर्ड परीक्षा नाही

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी बोर्ड परीक्षांच्या तारखांसदर्भात सांगितले की, ‘बोर्ड परीक्षा जानेवारी महिन्यात होऊ शकत नाहीत. मात्र फेब्रुवारीनंतर कधी परीक्षांचे आयोजन करता येईल याचा आम्ही विचार करू. म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बोर्ड परीक्षा होणार नाहीत आणि त्यानंतर कधी घ्यायच्या त्याच्यावर विचार केला जाईल.’

ऑफलाइन होणार परीक्षा

बोर्ड परीक्षा कशा पद्धतीने होणार ते सांगताना मंत्री म्हणाले की CBSE शी संलग्न २४ हजारहून अधिक शाळा या ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा सध्या शक्य नाहीत.


CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा कधी होणार जाहीर? जाणून घ्या

CBSE Exam Schedule Likely To Be Announced On 22nd December 2020

CBSE Exam Date: The dates of the Central Board of Secondary Education (CBSE) Class X and XII examinations next year are likely to be announced on Tuesday, December 22. The board has already clarified that the examination will be conducted on the paper-pen basis.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पेपर-पेन पद्धतीने घेण्यात येणार आहेत…

CBSE Exam Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) पुढील वर्षी होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा मंगळवारी २२ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या परीक्षा पेपर-पेन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मंगळवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशभरातील शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते परीक्षेच्या तारखांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोविड -१९ महामारी काळात देशभरात परीक्षा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, शिक्षणमंत्र्यांनी देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी त्रिस्तरीय संवाद साधण्याची योजना आखली आहे. मंत्री तीन दिवस वेबिनारच्या माध्यमातून या सर्वांशी संवाद साधतील.
बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन ठेवण्याचा सीबीएसईचा कोणताही प्रस्ताव नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सीबीएसई अधिकारी शिक्षक, विद्यार्थी-पालकांशी परीक्षांबाबत चर्चा करत आहेत, शिवाय देशभरातील शाळा-महाविद्यालये डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. आतापर्यंत सर्व वर्ग, तसेच बोर्ड परीक्षांची नोंदणी आदी काम व्हर्च्युअल मोडवर झाले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यापूर्वी म्हटले होते, ‘गेले नऊ महिने विद्यार्थी शाळा-महाविद्यांलयांमध्ये जाऊ शकलेले नाहीत. पण विद्यार्थ्यांनी हे संकटही आव्हान म्हणून स्वीकारले. सर्वात मोठं आव्हान या काळात आपली इच्छाशक्ती टिकवून ठेवणे हे होतं. आमच्यापुढील मोठं आव्हान बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेत लावून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी घेणे हे आहे.’

येत्या काही दिवसांत आभासी संवाद साधल्यानंतर शिक्षणमंत्री विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचा आढावा घेतील. आरोग्य व गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आरोग्य प्रोटोकॉल आदेशानुसार या परीक्षा आयोजित करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जाईल.


CBSE Exam Date 2021 CBSE Board Warns Against Fake Notice

CBSE Board Warns Against Fake Notice: A fake notice has gone viral regarding the dates of CBSE Board’s 10th and 12th written and practical exams. This information is inaccurate and has caused undue panic among students and parents.CBSE Board of Controller of Examinations Dr. Sanyam Bharadwaj on Thursday issued an official circular to the board urging them not to believe any rumors circulating on social media regarding the 10th and 12th exams. The circular states that this viral information is incorrect, and therefore there is an atmosphere of concern among students and parents.

CBSE दहावी, बारावी परीक्षांच्या बनावट तारखांचा मेसेज व्हायरल झाला आहे…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गुरुवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि पालकांना सावध करणारं हे परिपत्रक आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी आणप प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांसंदर्भात एक बनावट नोटीस व्हायरल झाली आहे. ही माहिती अयोग्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये परीक्षांसंदर्भात नाहक घबराट पसरली आहे.

CBSE Exam 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी गुरुवारी बोर्डाचे अधिकृत परिपत्रक काढून दहावी, बारावी परीक्षांसंदर्भत सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर, परीक्षांच्या तारखांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. ही व्हायरल माहिती चुकीची आहे, आणि त्यामुळे उगीचच विद्यार्थी-पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

CBSE 12th Exam 2021: सीबीएसई बारावीचा पेपर पॅटर्न बदलला

बोर्डाने सर्व संलग्न शाळा, विद्यार्थी-पालक, अन्य संबंधितांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. सीबीएसई बोर्डासंदर्भातील कोणत्याही अधिकृत माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन बोर्डाने केलं आहे.

सीबीएसईच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, ‘करोना महामारी काळात विद्यार्थी-पालकांच्या स्थितीबाबत सीबीएसई बोर्डाला जाणीव आहे. म्हणूनच कोणताही निर्णय बोर्डाने घेतला तर तो संबंधितांशी विचार विनिमय करूनच घेतला जाईल आणि त्याबाबत बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाईल.’

सोर्स:म. टा

CBSE CTET 2020 परीक्षेसंबंधी बनावट नोटीस व्हायरल

CBSE CTET 2020 परीक्षेसंबंधी बनावट नोटीस व्हायरल होत आहे…

CBSE CTET 2020 परीक्षेसंबंधी बनावट नोटीस व्हायरल
CTET 2020 Exam Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) संदर्भात एक बनावट नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही नोटीस सीबीएसई सीटीईटी जुलै २०२० परीक्षेसंदर्भात आहे. या परीक्षेचं अद्याप आयोजन करण्यात आलेलं नाही.

व्हायरल झालेल्या बोगस परिपत्रकात असं म्हटलं आहे की सीबीएसईद्वारे सीटेट जुलै २०२० परीक्षेचं आयोजन ५ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. मात्र, बोर्डाने अद्याप या परीक्षेची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. हे परिपत्रक पूर्णपणे बोगस आहे.

शिक्षकांसाठी खुशखबर! NCTE चा TET बाबत महत्त्वाचा निर्णय

सीबीएसईने म्हटलं आहे की ‘आतापर्यंत परीक्षेच्या तारखेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बोर्डाने परीक्षेची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. अॅडमिट कार्डही जाहीर केलेले नाही. यासंबंधी कोणतीही माहिती सीबीएसई आणि सीटीईटीच्या वेबसाइट्सवर cbse.nic.in आणि ctet.nic.in वर जाहीर केली जाईल.’

सीबीएसीईद्वारे सेंट्रल टीचर्स एलिजिबीलिटी टेस्ट जुलै २०२० (CTET July 2020) चे आयोजन ५ जुलै २०२० रोजी होणार होते. पण कोविड – १९ महामारी स्थितीमुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

सोर्स:म. टा


CBSE: नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाचा मोठा दिलासा; वाचा सविस्तर

सीबीएसई बोर्डाने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाचा मोठा दिलासा आहे…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीएसई बोर्डाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर हे परिपत्रक आहे.

बोर्डाने दोन वेगवेगळ्या सूचना जारी केल्या आहेत. एक इयत्ता नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसरी सूचना इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दोन्ही सूचनांच्या लिंक पुढे देत आहोत.

इयत्ता नववी आणि अकरावीसाठी

बोर्डाने इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणीची मुदत वाढवली आहे. ही नोंदणी २०२२ साली होणाऱ्या परीक्षेसाठी आहे. आधी दोन्ही इयत्तांसाठी रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर २०२० होती.

आता दोन्ही इयत्तांसाठी विलंब शुल्काशिवाय नोंदणीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर २०२० करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क भरावे लागेल. विलंब शुल्कासह नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर २०२० आहे. प्रति विद्यार्थी दोन हजार रुपये विलंब शुल्क आहे.

यासंदर्भातील सीबीएसईचे परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


CBSE Compartment Exam 2020

सीबीएसई बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी? बोर्डाने दिली माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने २४ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भातील माहिती दिली.

CBSE Compartment Exams Results 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने २४ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भातील माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई कंपार्टमेंट निकाल आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक कॅलेंडर २०२०-२१ संबंधी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

कोविड – १९ विषाणूच्या संक्रमणामुळे परिस्थिती सामान्य नाही. सीबीएसईच्या कंपार्टमेंट परीक्षाही यामुळे विलंबाने सुरू झाल्या. परिणामी निकालाला विलंब होईल. अशातच यूजीसीच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार जर विद्यापीठांमधील प्रथम वर्ष प्रवेश बंद झाले, तर सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल, अशी भीती या याचिकेच व्यक्त करण्यात आली आहे.

न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. खंडपीठाने सीबीएसईला सांगितले होते की फेरपरीक्षांच्या निकालाचा निश्चित कालावधी सांगा, जेणेकरून यूजीसीला त्याअनुसार निर्णय घेता येईल.

याच्या उत्तरादाखल सीबीएसईने सांगितले की बारावीच्या फेरपरीक्षेच्या म्हणजेच कंपार्टमेंट परीक्षेच्या निकालाची घोषणा १० ऑक्टोबर २०२० किंवा त्यापूर्वी केली जाईल. दुसरीकडे, यूजीसीद्वारे जारी करण्यात आलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार, प्रथम वर्ष पदवी प्रवेशांची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२० आहे.


CBSE बोर्डाच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत…

फेरपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाची तयारी; २२ सप्टेंबरपासून परीक्षा

फेरपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाची तयारी; २२ सप्टेंबरपासून परीक्षा
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून घेणार आहे. या परीक्षा देण्यासाठी दहावीचे विद्यार्थी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडणार आहेत. बारावीचे विद्यार्थी यापूर्वी जेईई आणि नीट परीक्षांच्या निमित्ताने परीक्षा केंद्रांपर्यंत जाऊन आले आहेत. सीबीएसई फेरपरीक्षा किंवा कंपार्टमेंट परीक्षा म्हणजे नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या परीक्षा आहेत.
दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.
फेरपरीक्षांना विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे कोविड-१९ संसर्ग काळ असतानाही त्यांच्या आयोजनाची भीती नसल्याचे प्राचार्य सांगत आहेत. शिवाय केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आरोग्यविषयक काळजी घेतली जाणार आहे.
सीबीएसईने कंपार्टमेंट परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. मात्र अनेक राज्यांतील बोर्डांनी दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रात करोनाचा कहर कमी झालेला नाही. विशेषत: मुंबई, पुणे आणि अन्य शहरी भागात करोना संक्रमित रुग्ण रोज नव्याने पुढे येत आहेत. परिणामी दहावी, बारावी फेरपरीक्षांबाबत महाराष्ट्राने कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महाराष्ट्रात पदवी परीक्षा होऊ घातल्या आहेत, त्याही ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the schedule for the 10th and 12th compartment examinations. The Board has issued separate schedule of examinations for both the classes on its official website cbse.nic.in

सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दोन्ही इयत्तांच्या परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक जारी केले आहे

यावर्षी दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.

संपूर्ण वेळापत्रक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या स्वतंत्र लिंक्स आहेत. या लिंकवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.

दरम्यान, या परीक्षांना विद्यार्थी-पालकांकडून जोरदार विरोध होत आहे. या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारी काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणीदेखील झाली. न्यायालयाने सीबीएसईला ७ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. दहावी आणि बारावीचे मिळून २,३७,८४९ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणी लागू आहे.

CBSE 10th compartmment date sheet 2020 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


CBSE compartment exam 2020 latest update: Whether the Central Board of Secondary Education (CBSE) will conduct re-examination this year or not … Thousands of students and parents are facing this question. The remaining board exams for Class X-XII were canceled due to the Corona transition. So now there are doubts as to whether there will be a re-examination. The board has also come up with an explanation in this regard.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांबद्दल बोर्डाने माहिती दिली आहे..

CBSE compartment exam 2020 latest update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या वर्षी फेरपरीक्षा घेणार की नाही… हजारो विद्यार्थी-पालकांना हा प्रश्न सतावत आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या उर्वरित बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात बोर्डाचं स्पष्टीकरण देखील आलं आहे.

दहावी-बारावी फेरपरीक्षा तत्काळ नाहीच!!

बोर्डाने सांगितलं, ‘आमच्याकडे यावर्षी दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा रद्द करण्याची विनंती आली आहे. पण बोर्ड फेरपरीक्षा रद्द करेल तर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भविष्यावर विपरित परिणाम होईल. कारण हा दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा प्रश्न आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.’

कशी होणार फेरपरीक्षा?

सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे की फेरपरीक्षा घेतल्या जाणार यात शंकाच नाही. या परीक्षा कोविड – १९ महामारीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) नुसार आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती सीबीएसई बोर्ड आपली अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर देणार आहे.

सीबीएसई बोर्डाने १३ जुलै रोजी बारावीचा तर १५ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. ईशान्य दिल्ली वगळता देशभरात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या अनेक महत्त्वाच्या विषयांची परीक्षा देशभरात रद्द करावी लागली.


सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE timetable:CBSE has announced the schedule of 10th and 12th examinations. These exams will be held from 1st to 15th July 2020. The board has given detailed information about which paper, when and in which session. Besides, Union Manpower Development Minister Dr. Ramesh Pokhriyal Nishank also tweeted this timetable.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. २९ प्रमुख विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

CBSE timetable: सीबीएसईने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डाने दिली आहे. शिवाय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीही हे टाइमटेबल ट्विट केले आहे.

दहावी आणि बारावीच्या एकूण २९ विषयांच्या परीक्षा होणार आहेत. कोणत्या परीक्षा पूर्ण देशभर होणार आहेत आणि कोणत्या केवळ ईशान्य दिल्लीत होणार आहेत, ते या वेळापत्रकात सविस्तरपणे नमूद करण्यात आले आहे. सर्व परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहेत.

सीबीएसई दहावी, बारावीचे संपूर्ण वेळापत्रक पाहा –

सीबीएसई सविस्तर वेळापत्रक


CBSE Board Exam Date Sheet 2020

CBSE Board Exam Date Sheet 2020: The schedule of examinations for the remaining 29 subjects of the CBSE Board will be announced on the evening of May 16. Union Manpower Development Minister gave information in this regard.

The Union Minister wrote in his tweet that the crisis of Corona virus Covid-19 had created uncertainty about the rest of the CBSE exams. Today, removing the uncertainty and seeing the curiosity of the students, we are announcing the date of Class X and XII examinations at 5 pm. With this tweet, the Union Minister has appealed to students, parents and teachers to keep an eye on the information regarding CBSE exams on Twitter on May 16, 2020 at 5 pm.

CBSE दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक आज ‘या’वेळी होणार जाहीर

सीबीेसई बोर्डाच्या उर्वरित २९ विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक आज १६ मे रोजी सायंकाळी जाहीर केले जाणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली…

CBSE Board Exam Date Sheet 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर करणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘करोना व्हायरस कोविड -१९ च्या संकटामुळे सीबीएसईच्या उर्वरित परीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आज ही अनिश्चितता दूर करून विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहता आम्ही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख संध्याकाळी ५ वाजता जाहीर करीत आहोत.’ या ट्विटसह केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना आज १६ मे २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता ट्विटरवर सीबीएसईच्या परीक्षांसंदर्भातील माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसईने जाहीर केले होते की दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील. दहावीची परीक्षा फक्त ईशान्य दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी असेल तर १२ वी च्या उर्वरित परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमुळे वेळेचा अभाव असल्याने केवळ प्रमुख २९ विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.

सोर्स: मटा


सीबीएसईच्या परीक्षा होणार; मंत्र्यांनी केलं स्पष्ट

CBSE Exam 2020: Out of the remaining 83 subjects of CBSE X and XII, 29 subjects will be examined. The marks of the remaining optional subjects will be given on the basis of internal evaluation. Once the situation returns to normal, the remaining 29 CBSE subjects will be examined. The Union Minister for Human Resource Development has said that students should continue their studies. The CBSE board will announce the exam dates as soon as the lockdown ends. Students will be notified at least ten days before the exams.

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या उर्वरित ८३ विषयांपैकी २९ विषयांची परीक्षा होणार आहे. उर्वरित वैकल्पिक विषयांचे गुण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिले जातील. परिस्थिती सामान्य झाल्यावर सीबीएसईच्या त्या राहिलेल्या २९ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सांगितलं आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. मात्र लवकरच सीबीएसई बोर्डाच्या झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरू होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं की ‘दहावी, बारावीच्या ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरू व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’

त्यांनी सांगितलं, ‘सीबीएसई दहावी आणि बारावीच्या उर्वरित ८३ विषयांपैकी २९ विषयांची परीक्षा होणार आहे. उर्वरित वैकल्पिक विषयांचे गुण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिले जातील. परिस्थिती सामान्य झाल्यावर सीबीएसईच्या त्या राहिलेल्या २९ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा.’

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जातील, या शक्यतांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पूर्णविराम दिला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा परिस्थिती सामान्य झाल्यावर घेतल्या जाणार आहेत, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

ईशान्य दिल्लीतील काही भागात उसळलेल्या हिंसेमुळे दहावी, बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना काही परीक्षांना बसता आले नाही. त्यानंतर देशात करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी केला. परिणामी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या.

लॉकडाऊन संपताच सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा करेल. परीक्षांच्या आधी किमान दहा दिवस विद्यार्थ्यांना सूचित केले जाईल.

सोर्स: मटा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!