Stamp Duty Vibhag -नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त

Department of Stamp Duty Bharti 2021

In the last few years, a large number of posts have been vacant in the registration and stamp duty department. Among them, 393 posts of Deputy Registrar (Class-I) and Stamp Inspector (Group B) (Non-Gazetted) and 396 posts of Senior Clerk and Supervisor (Group C) were vacant.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात (registration and stamp duty department) गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, ती पदे नेमकी किती रिक्त आहेत, याबाबत विभागच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. स्वतः विभागाने प्रकाशित केलेल्या माहितीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या आणि माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या रिक्त जागांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वी विभागातील पदांबाबत माहिती समोर आली. त्यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-१) आणि मुद्रांक निरीक्षक या (गट ब)(अराजपत्रित) पदामधील ३९३ जागा तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक (गट क) या पदाच्या ३९६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली.

मात्र, २५ वर्षांपासून ज्या विभागाची पदभरतीच झालेली नाही, त्या विभागात इतकी कमी पदे रिक्त कशी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे सूरज गज्जलवार यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकाच्या पुणे कार्यालयात सादर केला. मात्र, मिळालेल्या माहितीमुळे हा संभ्रम अधिकच वाढल्याचे दिसून आले. दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधकांची १३८ तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षकांची (गट क) ४६ जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नेमक्या जागा किती याची माहिती विभागाकडे नाही काय? असा प्रश्‍न निर्माण होतोय.


Stamp Duty Bharti 2021: The post of Secondary Registrar Group B in the stamp duty department has not been recruited through competitive examination for many years.There are a total of 600 posts in this department out of which 300 posts have to be filled through competition.

मुद्रांक शुल्क विभाग भरती २०२१ अपडेट

मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधक गट ब या पदाची स्पर्धा परिक्षेव्दारे मागील बरेच वर्षांपासून भरती केली नाही. सण १९९५ मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ मार्फत ही परीक्षा शेवटची राबविण्यात आली होती.

शासनातील विविध विभागांवर कामांचा ताण वाढला आहे. परंतु रिक्त पदांची भरती प्रक्रिया सरकार कडून राबविली जात नाही. या  विभागात एकूण ६०० पदे असून त्यापैकी ३०० पदे स्पर्धा घेऊन भरणे अनिवार्य आहे. मात्र या पदाचे मागणीपत्र काढले जात नाही.

2 Comments
  1. Onkeshwar A. Gawarle says

    Please share a link

  2. जॉब पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!