MU Exam – मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University Exam Postponed
Mumbai University Exam Postponed :After Demands from Students from several city colleges, Mumbai University has decided to Postpone all semester-end exam starting from October 10. The revised dates of commencement will be released soon. The decision was taken in the board of examinations meeting. Exams are most likely to be schedule post Diwali.
Mumbai University Exam postponed
Mumbai university exams postponed: मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार होत्या. आता त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
विद्यापीठाकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली होती. या मागणीवर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून 2022 च्या हिवाळी सत्राच्या सत्र 5 बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई विद्यापीठ 2022 च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.
या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले की, “2022 च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल”.
As a preventive measure to prevent the spread of the coronavirus, all written and demonstrated exams of Mumbai University, as well as all written and demonstration examinations of the first and second year of the affiliated college, have been postponed till May 1. Further decisions will be taken with regard to the examination after May 1, as per the directions of the State Government and the current situation.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मेपर्यंत लांबणीवर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल.
१५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित कॉलेजच्या पदवीस्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ३ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात ३ मे नंतर शासनाच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.
परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखाही लांबणीवर
२०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे आणि जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.
२०२० च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा
विद्याशाखा परीक्षा संख्या
मानव्य विद्याशाखा ९५
वाणिज्य व व्यवस्थापन १०१
विज्ञान व तंत्रज्ञान ३८१
आंतरविद्याशाखीय अभ्यास १८२
एकूण परीक्षा ७५९