JEE Main परीक्षा मराठीसह होणार बहुभाषेत; विद्यार्थ्यांना देता येणार मातृभाषेतच परीक्षा

JEE Main Exam 2021-Updates

JEE Main Exam 2021: The JEE (Main) 2021 exam will be conducted in ten other regional languages including English, Hindi, and Marathi from this year. In this regard, the senior director of the National Testing Agency (NTA) Dr. Sadhana Parashar has issued a circular on Friday (Thu. 8).

JEE Advanced : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेची तारीख जाहीर

  जेईई (मेन) २०२१ ही परीक्षा यावर्षीपासून इंग्रजी, हिंदी व मराठीसह इतर दहा प्रादेशिक भाषेमध्ये घेतली जाणार आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टांग एजन्सीच्या (एनटीए) वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पाराशर यांनी शुक्रवारी (ता. आठ) परिपत्रक काढले आहे.

पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत परीक्षा होणार असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आपआपल्या मातृभाषेत प्रश्नपत्रिका सोडवणे सोयीस्कर ठरणार आहे. प्रादेशिक भाषेत परीक्षा घेण्याचा हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे. जेईई (मेन) परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजीसह आसामी, बंगाली, कानडी, मल्याळम, गुजराती, उडीसी, पंजाबी, तमिळ, तेलगु व उर्दु या प्रादेशिक भाषेतून घेतली जाणार आहे.

यावर्षीपासूनच जेईई (मेन) परीक्षा एकूण चार सत्रामध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षा फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या महिन्यात होणार आहे. सदरील परीक्षा २३, २४, २५, २६ फेब्रुवारी, १५, १६, १७, १८ मार्च, २७, २८, २९, ३० एप्रिल आणि २४, २५, २६, २७,२८ मे या तारखांना देशातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचेही परिपत्रकामध्ये म्हटलेले आहे.

 बी. आर्किटेक्ट या परीक्षेतील ड्रॉईंग टेस्ट वगळता इतर सगळ्या चाचण्या संगणकाधारीत असणार आहे. बहुपर्यायी, बहुसत्रीय परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून, त्यांना गुण सुधारण्यास मदतही होईल. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसानही होणार नाही. कोविड-१९ मुळे किंवा बोर्ड परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेचा महिना निवडता येईल. विद्यार्थ्याना चार परीक्षा देणे बंधनकारक नसून, दिल्यास त्यापैकी एका परीक्षेतील मिळवलेले सर्वाधिक गुण विचारात घेवून गुणवत्ता यादी तयार केली जाईल, असेही डॉ. साधना पाराशर यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

 भारतातील विविध बोर्डाने अभ्यासक्रमाच्या बाबतीत घेतलेल्या विविध निर्णयाच्या अनुषंगाने सदरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ९० प्रश्न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांना कोणतेही ७५ प्रश्न सोडवण्याची मुभा राहील. प्रश्नपत्रिकेच्या भाग- ब (संख्यात्मक)मध्ये विद्यार्थ्यांना पर्याय दिले जातील व त्यासाठी कोणतेही नकारात्मक गुण असणार नाहीत


 खुशखबर! एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा

JEE Main Exam Updates: The Joint Entrance Examination for admission to engineering degree courses in all IITs in the country will now be conducted four times a year. This means that even if the students miss the opportunity to take the exam once, they will get the opportunity three times again. Union Education Minister Ramesh Pokhriyal made the announcement while interacting with students on Twitter

जेईई मेन परीक्षा कधी, कशी होणार यासंबंधी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी घोषणा केली…

JEE Main Exam Updates: देशातील सर्व आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा आता वर्षातून चार वेळा आयोजित केली जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची ही परीक्षा देण्याची संधी एकदा हुकली तरी त्यांना पुन्हा तीन वेळा ही संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत ही घोषणा केली

JEE Main परीक्षेचे पहिले सत्र फेब्रुवारी महिन्यात, दुसरे सत्र मार्च, तिसरे एप्रिल आणि चौथे सत्र मे महिन्यात होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा होईल. फेब्रुवारीत होणारी परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार आहे, अशी माहिती डॉ. पोखरियाल यांनी दिली.

ज्या पद्धतीने जॉइंट एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन होत आहे, ते पाहता ही जगातली सर्वात मोठी परीक्षा व्हावी अशी अपेक्षा पोखरियाल यांनी व्यक्त केली.

पॅटर्नमध्ये बदल

विविध राज्यांनी बारावी बोर्ड परीक्षांच्या अभ्यासक्रम कपातीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले होते. त्यामुळे या सामायिक परीक्षेत नेमके कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. तीही दूर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ९० प्रश्न विचारले जातील, त्यापैकी ७५ प्रश्नांचीच उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. त्यामुळे या ९० प्रश्नांमध्ये सर्व प्रकारचा अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. शिवाय १५ वैकल्पिक प्रश्नांमध्ये नकारात्मक गुणही नसणार आहेत.

१३ भाषांमध्ये होणार परीक्षा

देशात पहिल्यांदाच जेईई मेन परीक्षा १३ भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. इंग्रजीसह हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, गुजराती, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दू या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

मेरिट लिस्टसाठी सर्वोत्तम गुण ग्राह्य

चारही परीक्षा जर विद्यार्थ्याने दिल्या तर त्यापैकी बेस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधीही यामुळे मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.


The change in the academic schedule due to Corona has also led to a major change in the schedule of the JEE Mains exam. Students will be able to take the exam anytime during the four months of February, March, April and May so that they can take the exam at their convenience. The National Testing Agency (NTA) has clarified that the February 2021 exams will be held between February 22 and 25. The application deadline for this has started from today (Tuesday 15).

 The First Phase Of the JEE Mains Exam Is In February

पुणे: कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात झालेल्या बदलामुळे जेईई मेन्स परीक्षेच्या वेळापत्रकातही मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने परीक्षा देता यावी यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात कधीही परीक्षा देता येणार आहे. फेब्रुवारी 2021 महिन्यातील परीक्षा 22 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) स्पष्ट केले आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत आजपासून (ता. 15) सुरू झाली आहे.

 कोरोनामुळे इयत्ता 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले आहे. त्यातच देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या कालावधीत या परीक्षा होणार असल्याने “जेईई मेन्स’ परीक्षेच्या आयोजनात अडचणी येत होत्या. त्यामुळे यावर तोडगा म्हणून “एनटीए’ने चार टप्प्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यर्थ्यांना एक किंवा एक पेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. दरम्यान, 2020 मध्ये जानेवारी व सप्टेंबर असे दोन वेळेस परीक्षा घेण्यात आली होती.

 “एनटीए’ने मंगळवारी (ता. 15) जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पहिली परीक्षा 22 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात 27 शहरांमध्ये तर देशात 329 शहरांमध्ये होणार आहे. तर अभ्यासक्रमातही कपात केली असून, प्रत्येक विषयांचे 25 प्रश्‍न विचारले जाणार आहेत. याबाबत अधिक माहिती www.jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

 मराठीसह 12 भाषेत परीक्षा-“एनटीए’ने यंदापासून प्रादेशिक भाषेत परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामध्ये इंग्रजीतून प्रश्‍न असतीलच पण त्यासह हिंदी, मराठी, असामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडीया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दू या भाषेतही प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्यामुळे इंग्रजीतून प्रश्‍न न समजल्यास विद्यार्थ्याला त्याच्या स्थानिक भाषेतून समजून घेणे शक्‍य आहे.


JEE Main Exam 2020: All the states in the country have cut curricula in the wake of the Corona outbreak. Union Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank’ hinted at a change in the method of the JEE Mains examination this year. He said that although the curriculum would not be reduced, it was being considered to give students the option to solve 75 out of 90 questions. Against the backdrop of the Corona outbreak, all the states in the country have reduced the syllabus for Class X and XII by 15 to 30 percent.

‘जेईई’ परीक्षा पद्धतीत बदल? वर्षातून तीन ते चार वेळा परीक्षा?

यंदा जेईई मेन्स परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी दिले….

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांनी अभ्यासक्रमात कपात केली आहे. यामुळे यंदा जेईई मेन्स परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिले. अभ्यासक्रम कपात केली जाणार नसली, तरी विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्न सोडवण्याचा पर्याय देण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. करोना साथीच्या पार्शभूमीवर देशातील सर्व राज्यांनी दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात १५ ते ३० टक्के कपात केली आहे. प्रत्येक राज्याची अभ्यासक्रम कपात वेगळी असल्यामुळे केंद्रीय प्रवेश परीक्षांना येणाऱ्या प्रश्नांची निवड कशी करायची, परीक्षा पद्धतीत काय बदल करता येतील, याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) विचार करीत आहे. याबाबत सातत्याने चर्चा सुरू असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले.

त्यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. नियमित शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे तीन ते चार महिनेच उरलेले आहेत. अद्याप जेईई, नीट या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. याबाबत पालकांकडून सतत विचारणा होत होती. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात होता. या संवादामध्ये त्यांनी नवीन शिक्षण धोरण; तसेच मोदी सरकारच्या शैक्षणिक धोरणांचाही आढावा घेतला. जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन संधी मिळतात. साधारणपणे जानेवारी आणि मार्चमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. जेईई मुख्य परीक्षा चार वेळा घेण्याची सूचना विद्यार्थ्यांनी केली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशी चार वेळा जेईई घेण्याच्या सूचनेवर विचार करण्यात येत आहे, असे पोखरीयाल यांनी सांगितले.

तीस टक्के भारांश कमी करण्यात आलेला असून अजून अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्न सोडवण्याचा पर्याय देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचेही, पोखरीयाल यांनी सांगितले. प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करण्याची सूचनाही पालक आणि विद्यार्थ्यांनी केली. त्याबाबत ‘परीक्षेपूर्वी विद्यार्थी वर्गांमध्ये प्रात्यक्षिके करू शकले नाहीत, तर प्रात्यक्षिकांसाठी पर्याय शोधता येईल. परीक्षेच्या वेळापत्रकाबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षांबाबत काय करावे, यावर सध्या चर्चा सुरू आहे.

‘नीट’ रद्द होणार नाही

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा रद्द करावी, अशी मागणी होत होती. मात्र, ही परीक्षा रद्द होणार नसल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले. यामुळे याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

विद्यार्थ्यांची निराशा

‘विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार ‘ अशा स्वरूपाची जाहिरात मागील दोन आठवड्यांपासून करून शिक्षणमंत्र्यांच्या वेबिनारबाबत प्रसिद्धी करण्यात आली. मात्र, या वेबिनारमध्ये काही संकेत मिळाले असले, तरी दिलासा देणारा ठोस निर्णय नसल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आल्याचे लाइव्ह कार्यक्रमाच्या कमेंट बॉक्समध्ये दिसत होते.


JEE Main 2020 Exam : JEE Main January 2021 Exam Update: जानेवारी २०२१ च्या जेईई मेन परीक्षेसंदर्भात लाखो विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आतापर्यंत या परीक्षेसंदर्भात कोणतेही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही. विद्यार्थ्यांमध्ये अद्याप या परीक्षेच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे. कोविड-१९ विषाणू महामारीमुळे ही परीक्षा रद्द होणार, लांबणीवर पडणार की नेमकं काय होणार याबाबत अनिश्चितता आहे.

यासंबंधी एनटीएने कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही. मात्र एनटीएच्या सूत्रांचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द होणार नाही. दुसरीकडे आयआयटी दिल्लीचे निवृत्त फॅकल्टी आणि एनटीएच्या सल्लागारांचं म्हणणं आहे की ‘परीक्षा रद्द होणार नाही, मात्र विलंब होऊ शकतो. २०२१ च्या बोर्ड परीक्षांच्या शेड्युलच्या आधारेच जेईई मेनचे शेड्युल जारी होईल. तारखा एकमेकांशी क्लॅश होऊ नये, हे ध्यानात ठेवले जाईल. त्यामुळे जेईई मेन जानेवारी २०२१ परीक्षेत विलंब होऊ शकतो.’


जेईई मेन परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये

JEE Main Exam language: इंजिनीअरिंगच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) संबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली ाहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले, ‘नव्या शिक्षण धोरणांतर्गत (NEP 2020) जॉइंट अॅडमिशन बोर्ड (JAB) ने निर्णय घेतला आहे की जेईई मेन देशातील अन्य प्रादेशिक भाषांमध्येदेखील आयोजित करण्यात येईल.’

पोखरियाल यांनी एका अन्य ट्विट मध्ये लिहिलं आहे की ‘ज्या राज्यामधील इंजिनिअरींग कॉलेजांमधील प्रवेश प्रादेशिक भाषांमध्ये होणाऱ्या परीक्षांच्या आधारे होतात, त्या राज्यांमध्ये या परीक्षा त्या प्रादेशिक भाषांमध्ये होतील. अशा राज्यांच्या भाषा आता जेईई मेन परीक्षेत समाविष्ट केल्या जातील.’

दरम्यान, सध्या जेईई मेन हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत आयोजित केली जाते. दुसरीकडे, वैद्यकीय प्रवेशांसाठी होणारी नीट परीक्षा मात्र एकूण ११ भाषेत आयोजित केली जाते. जेईई मेन मध्ये देखील अन्य भाषांचा समावेश केल्यामुळे परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळेल. आपल्या सोयीनुसार ते प्रश्नपत्रिकेच्या भाषेची निवड करू शकतील.


JEE Main Exam 2020 Answer Key

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन 2020 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर विद्यार्थी ही उत्तरतालिका पाहू शकतात आणि डाऊनलोड देखील करू शकतात. आपला अॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड, जन्मतारीख आदी माहिती देऊन ही उत्तरतालिका पाहता येईल. या उत्तरतालिकेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जेईई मेन मध्ये किती गुण मिळाले आहेत, हे निकालाआधीच पडताळून पाहता येईल. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. दरम्यान, एनटीएने यापूर्वी जाहीर केल्यानुसार जेईई मेन परीक्षेचा निकाल १० ते ११ सप्टेंबर २०२० या कालावधीत जाहीर होणार आहे.

जेईई मेन २०२० ची उत्तरतालिका कशी डाऊनलोड कराल?

पुढील पद्धतीने टप्प्याटप्प्याने जेईई मेन २०२० ची उत्तरतालिका विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येईल –

१) जेईई मेनचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जा.
२) ‘JEE Main Answer Key 2020 September’ या पर्यायावर क्लिक करा.
३) तुमचे लॉगइन तपशील भरा.
४) सबमीट बटणावर क्लिक करा.
५) आता तुमच्या स्क्रीनवर जेईई मेन २०२० ची उत्तरतालिका दिसेल.
६) जेईई मेन २०२० ची उत्तरतालिका डाऊनलोड करा.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देशभरातील आयआयटी, एनआयटी आणि सीएफटीआयमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा होते. जेईई मेन पेपर १ आणि पेपर २ च्या निकालावर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठीची पात्रता अवलंबून असेल. जेईई मेन पेपर १ आणि २ चे टॉप २.४५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेतील स्कोअरनुसार देशातील २३ आयआयटींमधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.


JEE Main 2020

The National Testing Agency will be conducting the Joint Entrance Examination (Main) September– 2020 in Computer Based Test (CBT) mode at 605 Centres for B.Tech./B.E. and 489 Centres for B.Arch. and B.Planning located in 224 cities throughout the country and 08 cities abroad from 1st September to 6th September 2020.

जेईई मेन २०२० परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; ‘असे’ करा डाउनलोड

जेईई मेन २०२० परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी. कसे कराल डाऊनलोड… जाणून घ्या.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन २०२० परीक्षेचे अॅडमिट कार्ड (प्रवेश पत्र) अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर उपलब्ध केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते या संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. जेईई मेन (एप्रिल) परीक्षा २०२० यावर्षी १ ते ६ सप्टेंबर २०२० दरम्यान होणार आहे.ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होईल.

जेईई मेन २०२० असे करा अॅडमिट कार्ड डाऊनलोड

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर जा
– यानंतर JEE Main Admit Card 2020 लिंक वर जा
– आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका
– यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा
– अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर येईल
– तुम्ही अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून प्रिंटआऊट घेऊ शकाल.

परीक्षा कशी होईल?

जेईई मेन २०२० परीक्षा पुढील पद्धतीने होणार आहे –

१) बी.ई./ बी. टेक्. साठी परीक्षा संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) पद्धतीनेच होईल.
२) B. Arch: Mathematics- Part I and Aptitude Test-Part II संगणक आधारित आणि ड्रॉइंग टेस्ट – Part III पेन आणि पेपर म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होईल.
३) B. Planning: Mathematics- Part I, Aptitude Test-Part II आणि Planning Based Questions-Part III या विषयांसाठी परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने होईल.


सर्वोच्च न्यायालयाने जेईई मेन आणि नीट परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळल्याने या परीक्षा होणार हे आता निश्चित आहे. भारतातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई मेन (JEE Main 2020 Exam) परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन होण्यापूर्वी किमान १५ दिवस अगोदर जेईई मेन २०२० चे अॅडमिट कार्ड जारी केले जातील.

जेईई मेन २०२० असे करा अॅडमिट कार्ड डाऊनलोड

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर जा
– यानंतर JEE Main Admit Card 2020 लिंक वर जा
– आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका
– यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा
– अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर येईल
– तुम्ही अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून प्रिंटआऊट घेऊ शकाल.

दरम्यान, जेईई मेन आणि नीट या अनुक्रमे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा कोविड -१९ महामारी काळात लांबणीवर टाकाव्यात, अशी मागणी करणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कोविड – १९ संसर्ग काळातही जीवन जगत राहायला हवे. परीक्षा कशा थांबवता येतील, अशी टिप्पणी न्या. अरुण मिश्रा यांनी केली. दरम्यान, परीक्षा योग्य खबरदारीसह आयोजित करण्यात येतील अशी हमी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने महाधिवक्त तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. एनटीएच्या ३ जुलैच्या परिपत्रकानुसार जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर रोजी तर नीट यूजी २०२० परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. न्या. अरुण मिश्रा, न्या. बी.आर.गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली.

JEE Main 2020 Exam: परीक्षेला जाताना पुढील सूचनांचे पालन करा.

– करोना विषाणूमुळे परीक्षा केंद्रांवर तपासणी आणि सॅनिटायझेशनमध्ये अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याआधी किमान १ तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे.

– एनटीएचे संचालक विनीत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी टाइम स्लॉट दिला जाईल. विद्यार्थ्यांनी या टाइम स्लॉटचे काटेकोर पालन करत दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचायचे आहे.

– परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी उमेदवारांना ओळखपत्रासह आपलं जेईई मेन २०२० अॅडमिट कार्ड दाखवायचं आहे. परीक्षा केंद्राच्या आत अन्य कोणतंही सामान नेण्याची अनुमती नाही.

– विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे.

JEE Main 2020

Schools and colleges across the country have been closed since March due to a growing corona infection. Meanwhile, several student exams have been canceled while some have been postponed. The JEE Main Examination to be conducted by NTA for engineering admission in institutes like IITs, NITs at the national level will be conducted from 1st to 6th September. An important piece of information has now emerged for JEE students. Let’s learn about it.

 JEE Main 2020 Exam: जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

 JEE Main 2020 Exam : अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. जेईई विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

 नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याच दरम्यान विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरीवर आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. जेईई विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

  कोरोना लॉकडाऊनमुळे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेण्यात येणार आहे. योग्य ती खबरदारी घेतली जाणार असून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यामुळेच तपासणी आणि सॅनिटायझेशनसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 एनटीएचे संचालक विनीत जोशी यांच्या मते, विद्यार्थ्यांना केंद्रांवर येण्यासाठी स्लॉट देण्यात येणार आहेत. स्लॉटनुसार विद्यार्थ्यांनी यावे. जेणेकरून सर्व गोष्टी सोप्या होतील.

  परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थांना त्यांचे जेईई मेन 2020 प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.

  परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही

  परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

 विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले पाहिजे. परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यावर त्यांनी आपल्या सीटनंबरनुसार जागेवर बसावे.

पेपर २ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असेल. वॉटर कलर वापरता येणार नाहीत.

विद्यार्थ्यांना परिक्षेदरम्यान काही रफ वर्क करण्यासाठी एक कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी आपलं नाव लिहावं आणि नंतर परीक्षा झाल्यावर तो पेपर परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या शिक्षकांना परत करावा.

 विद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की नाही याची खात्री करावी. तसेच अंगठ्याचा ठसा देखील योग्य पद्धतीने दिलेला असावा.

पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

जोपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येत नाही. तोपर्यंत पालकांनी देखील येऊ नये अशी विनंती पालकांना करण्यात आली आहे.

 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्याची गरज असेल तरच त्यांनी यावे आणि विद्यार्थी आतमध्ये गेल्यावर निघून जावं. विनाकारण परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये.

परीक्षा केंद्रांवर बॅरिकेट्स लावले जातील. पालकांनी या सर्व गोष्टींचं पालन करावं.

 परीक्षा केंद्रांवर जास्त गर्दी करू नये

मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

 मधुमेहाच्या असलेल्या विद्यार्थ्यांना साखरेच्या गोळ्या आणि फळं (केळी/सफरचंद) आणि पाण्याच्या बाटली असे खाण्यायोग्य पदार्थ नेण्याची परवानगी असणार आहे.

विद्यार्थ्यांना चॉकलेट / कँडी / सँडविच यासारख्या पॅक पदार्थांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.


जेईई मेन २०२०: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी

JEE Main Exam 2020:  There is good news for the students who are going to take the JEE Main 2020 exam. The National Testing Agency has issued a notice for JEE Main candidates on its official website. It contains information about an opportunity offered to the examinees.This opportunity has been given to the students who are appearing for the JEE Main exam this year and also for the UPSC NDA NA exam. The May JEE Main exam has been postponed and is now taking place in September and both the JEE Main and NDA exams are clashing as they come at the same time. Therefore, students who are going to sit for both the exams have to inform the NTA, the National Testing Agency.

जे विद्यार्थी जेईई मेन आणि एनडीए एन ए अशा दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी ही सूचना आहे…

JEE Main 2020 application correction for UPSC NDA candidates: जे विद्यार्थी जेईई मेन २०२० परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जेईई मेन परीक्षार्थींसाठी एक नोटीस जारी केली आहे. यात परीक्षार्थींना दिल्या जाणाऱ्या एका संधीबद्दलची माहिती आहे.

जे विद्यार्थी यावर्षी जेईई मेन परीक्षा देत आहेत आणि यूपीएससी एनडीए एनए (UPSC NDA NA) परीक्षा देखील देत आहेत त्यांच्यासाठी हे संधी देण्यात आली आहे. मे महिन्यातील जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये होत आहे आणि जेईई मेन व एनडीए या दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने क्लॅश होत आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी दोन्ही परीक्षांना बसणार आहेत, त्यांनी एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला तसे कळवायचे आहे.

नोटीशीत असं म्हटलं आहे की अशा विद्यार्थ्यांसाठी जेईई मेनच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. जर तुम्ही जेईई मेन आणि यूपीएससी एनडीए दोन्हीसाठी अर्ज केला असेल, तर जेईई मेनच्या अर्जात तशी माहिती नमूद करा. अर्जात सुधारणा करण्यासाठी तुमच्याकडे ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत आहे. जेईई मेनच्या संकेतस्थळावर त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या संकेतस्थळाची लिंक आम्ही या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.

जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० दरम्यान होणार आहे. यूपीएससी एनडीए एनए परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. अर्थात दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ उडू शकतो. म्हणूनच जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी तशी माहिती जेईई मेन २०२० परीक्षेच्या अर्जात नमूद करायची आहे.

जेईईसंदर्भातील संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

NTA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी क्लिक करा.


JEE Main 2020

JEE Main 2020: The JEE Main is an entrance examination for admission to engineering degree courses in IITs in the country. This year, the exam has been postponed and will now be held in September. However, the NDA exam will also be held at the same time. As a result, both exams are clashing. The central government has taken note of this. This clash may change the date of the JEE Main exam.

एनडीए आणि जेईई मेन परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. दोन्ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात आहेत.

देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा लांबणीवर पडत आता सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. मात्र याच परीक्षेच्या वेळी एनडीएची परीक्षादेखील होणार आहे. परिणामी दोन्ही परीक्षा क्लॅश होत आहेत. केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे. या क्लॅशमुळे कदाचित जेईई मेन परीक्षेची तारीख बदलू शकते.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी यासंबंधी ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते की ‘मला काही विद्यार्थ्यांकडून कळले की एनडीए परीक्षेची तारीख आणि जेईई मेन परीक्षेची तारीख एकाच वेळी आहेत. परिणामी या प्रकरणाची चौकीशी केली गेली आहे. जेईई आणि एनडीए दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. दोन्ही परीक्षांच्या तारखा क्लॅश होणार नाहीत, हे एनटीए पाहील.’

जेईई मेनची तारीख बदलणार?

यावर्षी एकूण सुमारे ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेनसाठी अर्ज केले आहेत. जेईई मेन परीक्षा भारतातील सर्व अभियांत्रिकी माहाविद्यालयातील प्रवेशांसाठी दिली जाते. जेईई नंतर विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड क्लिअर करावी लागते. एनडीए परीक्षेच्या तारखांच्या क्लॅशमुळे तारखांमध्ये काही बदल होऊ शकतो.

यावर्षी कट ऑफ वाढण्याची शक्यता

यावर्षी विद्यार्थ्यांना जेईई मेन आणि नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप वेळ मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळाल्याने यावर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील आणि परिणामी कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.

करोना सुरक्षेसाठी उपाययोजना

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने करोना व्हायरस संक्रमणापासून सुरक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निर्देश दिले आहेत की परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करा, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवा. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या कमी ठेवा. याव्यतिरिक्त मास्क घालणे अनिवार्य आहे, तसेच परीक्षा केंद्रांवर शरीराचे तापमान मोजण्याचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे.


जेईई मेनची तारीख बदलणार? NDA परीक्षेसोबत होतेय क्लॅश

जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जूनमध्ये शक्य

Millions of students are waiting for the JEE Main and NEET exam dates. The country is in lockdown until May 3 due to the outbreak of the Corona virus. Due to this, the possibility of this examination is going to be delayed even by the end of May. And neat exams can now be conducted in June. This information has been given by Union Minister for Human Resource Development Ramesh Pokhrial. Pokhriyal tweeted, “Now the safety of the students is our top priority. The JEE Main Exam is likely to take place in June. ‘

लाखो विद्यार्थी JEE Main आणि NEET परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन स्थितीत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीसदेखील या परीक्षा होण्याची शक्यता मावळत निघाली आहे.

लाखो विद्यार्थी JEE Main आणि NEET परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन स्थितीत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीसदेखील या परीक्षा होण्याची शक्यता मावळत निघाली आहे.  आणि नीट परीक्षा आता जून महिन्यात आयोजित केल्या जाऊ शकतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. पोखरियाल यांनी ट्विट करून सांगितले आहे की ‘आता विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. जेईई मेन परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.’

अन्य एका ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘जेईई मेन आणि नीट परीक्षेसंदर्भात मंत्रालय सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात येईल.’ यापूर्वी जेईई मेन आणि नीट परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार होती. मात्र परिस्थिती आटोक्यात न आल्याने आता या परीक्षांचं आयोजन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. नियोजित वेळापत्रकानुसार जेईई परीक्षा ५,७,९ आणि ११ एप्रिलला होणार होती तर नीट परीक्षा ३ मे रोजी आयोजित होणार होती. पण देशभरात पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत होता आणि दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे.

सोर्स:मटा


JEE Main 2020: आता पसंतीचं परीक्षा केंद्र निवडता येणार

JEE Main 2020: In the JEE Main Application Form, the students will try to give the examination center in the order in which they are going to select the examination center. Students will be able to make changes to their applications by 14 April 2020. Students will be able to make changes to their applications by April 14. It also includes the choice of city of examinations. Applications are subject to change at 11.50 pm on April 14. The deadline for filing charges is up to 5.00 pm on the same day. If additional charges are required, you can do so through Credit Card / Debit Card / Net Banking / UPI and Paytm.

जेईई मेन अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये विद्यार्थी ज्या क्रमाने परीक्षा केंद्राची निवड करणार आहेत, त्या क्रमानेच त्यांना परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न केला जाईल. १४ एप्रिल २०२० पर्यंत विद्यार्थी आपल्या अर्जांमध्ये बदल करू शकणार आहेत.

नवी दिल्ली: कोव्हिड – १९ मुळे देश लॉकडाऊन स्थितीत आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे जेईई  मेनच्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी आता आपल्या पसंतीचं परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.

जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाइन व्हिडिओ

एनटीएने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनीही हे ट्विट केलं आहे. एनटीएच्या परित्रकात म्हटलं आहे की जेईई मेन अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये विद्यार्थी ज्या क्रमाने परीक्षा केंद्राची निवड करणार आहेत, त्या क्रमानेच त्यांना परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं परीक्षा केंद्र तेव्हाच मिळेल जेव्हा तिथे जागा उपलब्ध असेल.

१४ एप्रिल २०२० पर्यंत विद्यार्थी आपल्या अर्जांमध्ये बदल करू शकणार आहेत. यात परीक्षांच्या शहरांच्या पसंतीक्रमाचाही समावेश आहे. अर्जात १४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदल करता येणार आहेत. शुल्क जमा करण्याची मुदत याच दिवशी रात्री ११.५० वाजेपर्यंत आहे. जर अतिरिक्त शुल्काची गरज भासली तर ते तुम्ही क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड/ नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएमद्वारे करू शकता.

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे जेईई मेन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच या परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल. एनटीएने नीट यूजी परीक्षाही स्थगित केली आहे. ही परीक्षा ३ मे २०२० रोजी होणार आहे.

एनटीएचं परिपत्रक पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

सोर्स:मटा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!