JEE नंतर अधिकारी पदावर मिळणार सरकारी नोकरी!! जाणून घ्या प्रक्रिया – JEE Main 2024

JEE Main Exam Registration 2024 @ jeemain.nta.nic.

Government Jobs after JEE Exam – If you clear jee and you have good marks and you are getting admission in IIT, then you can apply for technical admission scheme in Indian Army. If you are selected in JEE, you can get a job as an officer. The Indian Navy has also issued a notification for the exam on its website. If you are selected in this recruitment, you get a good salary. Candidates Read the complete details given below on this page regarding the JEE Main 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

JEE नंतर अधिकारी पदावर मिळणार सरकारी नोकरी!! जाणून घ्या प्रक्रिया

तुम्हाला जर आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जेईई परीक्षा उत्तीर्ण करणे खूप गरजेचे आहे. ही परीक्षा तुमच्यासाठी सरकारी नोकरीचे दार उघडते. परंतु जर तुम्हाला या परीक्षेत चांगले गुण असतील, तर तुम्ही थेट अधिकारी होऊ शकता. आता आपण जेईई परीक्षेमुळे तुम्ही सरकारी नोकरी कशी मिळवू शकता हे पाहणार आहोत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.  

  • तुम्ही जर जेईई ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि तुम्हाला जर आयआयटीमध्ये प्रवेश घेताना असेल, तर तुम्ही भारतीय सैन्यात तांत्रिक प्रवेश योजनेसाठी अर्ज करू शकता. तुमची जेईईमध्ये निवड झाली, तर तुम्हाला अधिकारी पदावर नोकरी मिळू शकते. भारतीय नौदलाने या परीक्षेसाठी त्यांच्या वेबसाईटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. या भरतीत जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला चांगला पगार देखील मिळतो.
  • Educational Details शैक्षणिक पात्रता – या परीक्षेत बसण्यासाठी तुम्हाला 70 टक्के गुणांसह बारावी पास असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेईई मेन परीक्षेला बसणे आवश्यक आहे. दोन्ही गुणपत्रिकेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवाराची बारावी ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये असावी. या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
  • Age Limit वयोमर्यादा – तुमचे वय जर 20 वर्षे असेल, तर तुम्ही या भरती मोहिमेत भाग येऊ शकता. कारण या परीक्षेसाठी कमाल वय 19.5 निश्चित करण्यात आलेले आहे. 16.5 ते 19.5 या वयोगटातील उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याची मुलाखत घेतली जाईल. आणि मुलाखतीवर निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारतीय नौदलात कडून मेल पाठवला जाईल
  • नवोदयातून मिळणार मोफत शिक्षण – या निवडलेल्या उमेदवारांना अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजीनियरिंगमधील चार वर्षाच्या B. Tech कोर्ससाठी कॅडेट म्हणून समाविष्ट केले जाईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ द्वारे दिली जाईल. त्याचप्रमाणे मुलाखत पूर्ण झाल्यानंतर पुस्तके, वाचन, साहित्य, प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च हा भारतीय नवोदयाकडून केला जातो. त्याचप्रमाणे कॅडेट्सला योग्य कपडे आणि जेवणही दिले जाते.

TES-52 भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना भरती; ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या !!


NCHM JEE Main 2024 – The National Council for Hotel Management has released the schedule for the Joint Entrance Test (JEE) to be conducted for admission to hotel management related courses for the year 2024-2025. According to official information released by the council, the entrance test will be conducted in May 2024.

NCHM JEE 2024 will be conducted by the National Testing Agency (NTA). Registration to appear for the exam will be opened by the NTA on February 1, 2024. The admit cards of the candidates who have applied for the joint entrance examination will be released only in May. On the other hand, the answer keys will also be released in May after the examination.

Candidates can register their objections online on these answer sheets. The results of the examination will be declared after reviewing these objections. The first round of counselling will be held in June 2024 to complete the admission process for the successful candidates. Through the examination, admission will be given to reputed hotel management institutes in the country as well as government and private hotel management colleges in various states.

  • – Website for application – nchmjee.nta.nic.in
  • – Entrance Test Date – May 2024
  • – Total seats – 11 thousand 965

हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटने २०२४-२५ या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई) वेळापत्रक जारी केले आहे. कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे २०२४ मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

एनसीएचएम जेईई २०२४ राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) द्वारे आयोजित केले जाईल. परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी १ फेब्रुवारी २०२४ रोजी एनटीए द्वारे सुरू केली जाईल. संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे मे महिन्यातच जारी केली जातील. दुसरीकडे परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यातच उत्तरसुचीही जाहीर होणार आहेत.

उमेदवार या उत्तरसुचींवर त्यांचे आक्षेप ऑनलाइन नोंदवू शकतील. या हरकतींचा आढावा घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. यशस्वी घोषित उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जून २०२४ मध्ये समुपदेशनाची पहिली फेरी घेतली जाईल. परीक्षेच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठित हॉटेल मॅनेजमेंट संस्था तसेच विविध राज्यांतील सरकारी आणि खाजगी हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल.

  • – अर्जासाठी संकेतस्थळ – nchmjee.nta.nic.in
  • – प्रवेश परीक्षेची तारीख – मे २०२४
  • – एकूण जागा – ११ हजार ९६५

OFFICIAL WEBSITE


JEE Main 2024 @ jeemain.nta.nic.in : The National Testing Agency (NTA) will announce the application dates for the Joint Entrance Test (JEE Main 2024) for Session 1 this week. At the same time, the syllabus of JEE Main is also expected to undergo some changes. The decision to revise the JEE Main syllabus 2024 has been taken after suggestions from several boards.

According to the exam schedule released by NTA, JEE Main Session 1 exam will be held from 24th January 2023 to 1st February 2024 and Session 2 exam will be held from 1st April 2024 to 15th April 2024. The link to JEE Main application will soon be activated on the official website jeemain.nta.nic. Interested and eligible candidates can then visit the official website and apply. The application step will be given on the official website.

JEE (Main) – 2023 Session 1 for Paper 1 (B.E./B.Tech.) will be held on 24, 25, 27, 28, 29, 30, and 31 January 2023 followed by Session 2 on 06, 07, 08, 09, 10, 11 and 12 April 2023. This is being done to ensure that the JEE (Main) – 2023 does not interfere with the Board examinations, which may be held at different times across the States/UTs. Paper 2A and Paper 2B (B. Arch and B. Planning) will also be held twice a year (January and April 2023).

It has been decided to provide choices in one section of each subject of Paper 1 and Part-I of Paper 2A and 2B to cater to the decision of different Boards across the country regarding the reduction of the syllabus. However, the total number of questions to be attempted will remain the same (Physics – 25, Chemistry – 25, and Mathematics – 25), wherever applicable.

JEE Main 2024: जेईईच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल; पुढील आठवड्यापासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) या आठवड्यात सत्र १ साठी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी म्हणजेच JEE Main 2024 अर्जाच्या तारखा जाहीर करेल. त्याचवेळी, जेईई मेनचा अभ्यासक्रमही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेईई मेन अभ्यासक्रम २०२४ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय अनेक बोर्डांच्या सूचनांनंतर घेण्यात आला आहे.

  • गेल्या ३ वर्षांत CBSE, NCERT तसेच अनेक राज्य मंडळांनी ९वी ते १२वीचा अभ्यासक्रम कमी केला आहे, पण JEE Main अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीएने सर्व राज्य मंडळांशी याबाबत चर्चा केली असून, यासाथी तज्ज्ञ समिती लवकरच जेईई मेन नवीन अभ्यासक्रम आणेल अशी अपेक्षा आहे. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट जाहीर करण्यात आलेले नाही.
  • NTA ने जाहिर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार JEE Main सत्र १ ची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी आणि सत्र २ ची परीक्षा १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत घेतली जाणार आहे. जेईई मुख्य अर्जाची लिंक लवकरच अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic वर सक्रिय केली जाईल. त्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची पायरी अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंह म्हणाले की, एनटीए सर्व शिक्षण मंडळांशी चर्चा करत आहे आणि या संदर्भात तज्ज्ञांची समिती सध्या या चर्चेवर आणि मतांवर आधारित अभ्यासक्रमाला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. सुधारित अभ्यासक्रम माहिती बुलेटिनसह लवकरच सूचित केला जाईल. त्यामुळे, अभ्यासक्रमातील दुरुस्ती अथवा बदलांची माहिती अर्जासोबतच प्रसिद्ध केली जाईल, असे मानले जात आहे.

The National Testing Agency (NTA) has recently released the JEE Main 2024 exam time table. Accordingly, this exam will be conducted in two sessions of two months namely January 2024 and April 2024. At the same time, information has been announced on behalf of NTA that the registration for the examination will start from the first week of December. After the registration process starts, candidates will be able to apply through the official website. According to the schedule released by NTA, the 1st session of Join Entrance Exam 2024 will be conducted from 24th January to 1st February 2024. So, the second semester exam will be held in April 2024. Also, the admit card of the first session of the exam will be released on the official website in the second week of January 2024. More details of JEE Main 2024 are given below:

जेईई मेन २०२४ साठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार? परीक्षेची तारीख आणि इतर तपशील जाणून घ्या

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नुकतेच जेईई मेन २०२४ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जानेवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यांच्या दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षेसाठी नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती एनटीएच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकणार आहेत.

NTA च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, Join Entrance Exam 2024 च्या १ ल्या सत्राची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या पहिल्या सत्राचे प्रवेशपत्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.

जेईई मेन परीक्षेत टॉप २.५ लाख रँक असलेल्या उमेदवारांना जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी बोलावले जाते. जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये यशस्वी झालेले उमेदवार आयआयटी, एनआयटी, ट्रिपलआयटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि इतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. शिवाय, इंजिनिअरिंग आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परिसखा ग्राह्य धरली जाते.

Eligibility for JEE Main 2024

  • परीक्षेसाठी वयोमार्यादा : – जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा निर्धारित केलेली नाही.
  • पात्रता निकष :
  • विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा देणारे उमेदवारच परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. मात्र सदर विद्यार्थ्याचे मुख्य विषय गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र (Physics, Chemistry, Mathematics) म्हणजेच PCM असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतरही अर्ज करू शकतात.
  • उमेदवारांना ही परीक्षा देण्याची संधी जेईई मेनसाठी दोन संधी मिळते.
  • पहिली संधी बारावी झाल्यावर एक वर्षभरात तर, दुसरी संधी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षाने उपलब्ध होते.

JEE Main 2024 Exam Time Table

NTA ने जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पाह ण्यासाठी येथे क्लिक करा.

JEE Main 2024 Time Table

JEE Exam 2024


JEE Mains Percentile Eligibility

Latest udpates regarding the JEE Main Exam 2023 is given here. The condition of 75 percent and 20 percent top percentile in JEE Mains imposed by the National Testing Agency was challenged in the High Court. But the court has rejected this challenge. Nirwala Court has given that the High Court will not interfere in it as this is a policy matter of the government. The judgment was given by a bench of Acting Chief Justice Sanjay Gangapur Vala and Justice Sandeep Marne of Bombay High Court.

जेईई मेन्समधील पात्रता अट आम्ही हटवू शकत नाही – उच्च न्यायालय

  • जेईई मेन्स परिक्षेतील परसेंटाइलची पात्रता अट ही शासनाची धोरणात्मक बाब आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना काळात जेईई मेन्स परीक्षेसाठीची 75 टक्के पात्रतेची अट काढून टाकण्यात आली होती, परंतु कोरोना नंतर ती अट पुन्हा घालण्यात आली आहे.
  • मुंबई : राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून जेईई मेन्स मध्ये लावण्यात आलेली 75 टक्के आणि 20 टक्के टॉप परसेंटाइलच्या अटीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने हे आव्हान परतावून लावले आहे. शासनाची ही धोरणात्मक बाब असल्याने त्यामध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूर वाला आणि न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
  • सलग दोन दिवस सुनावणी झाली : जेईई मेन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लावलेली 75 टक्के आणि 20 टक्के पर्सेन्टाईल अट काढून टाकावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनी धाव घेतली होती. काल आणि आज सलग दोन दिवस यावर सुनावणी झाली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याबाबत दस्तावेज सादर केले होते. उपलब्ध पुराव्याच्या आधारे सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर शासनाची बाजू उचलून धरली आणि हा महत्त्वपूर्ण निकाल देत शासनाच्या धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप करणार नाही, असे वक्तव्य केले.
  • कोरोना काळात एक वेळेची बाब म्हणून अट रद्द : कोरोना काळात जेईई मेन परीक्षेसाठी लावलेली 75 टक्के पात्रतेची अट काढून टाकली होती. परंतु कोरोना नंतर ती अट पुन्हा घालण्यात आली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र केंद्र शासनाच्या वतीने आज या धोरणाच्या संदर्भात महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या गेल्या. कोरोना काळामध्ये शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आणि केवळ ‘वन टाइम’ म्हणजे एका वेळे पुरताच तो निर्णय होता, असे केंद्र शासनाने आपल्या माहितीपत्रात म्हटल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया याचं निरीक्षण केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज शासनाची भूमिका उचित असल्याचं म्हटलं आहे.
  • विद्यार्थ्यांची बाजू : विद्यार्थ्यांच्या बाजूने आज अ‍ॅडव्होकेट अनुभा सहाय यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की, ‘विविध राज्यांचे गुण देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे जर 20 टक्के परसेंटाइलची अट लावली, तरच विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेमध्ये पात्र केले जाईल. मात्र त्यामुळे अन्याय होऊ शकतो. त्यात महाराष्ट्राचे नुकसान होईल पण मणिपूरचा फायदा होईल. बिहारचे नुकसान होईल, पण गुजरातचा फायदा होईल. त्यामुळेच एकसमान काहीतरी निकष असला पाहिजे, जो विद्यार्थ्यांचं भलं करणारा असला पाहिजे’. मात्र हा तर्क आणि युक्तिवाद शासनाच्या वकिलांनी धोरणात्मक बाब असल्याने त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असा मुद्दा मांडत खोडून काढला. मात्र विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच शासनाने एक वेळची बाब म्हणून पात्रता अटी काढल्या, मात्र त्याची पूर्व सूचना द्यायला हवी होती, हे देखील वकील अनुभा साहाय यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मांडले.
  • निकाल पत्र अद्याप संकेतस्थळावर अपलोड केले नाही : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यांनी सर्व कागदपत्रे काल आणि आज झालेल्या सुनावणीमध्ये स्पष्टपणे मांडले. त्यामध्ये ही बाब वस्तुनिष्ठ रीतीने न्यायालयाच्या समोर दिसून आली की, पात्रता आणि परसेंटाइल अट रद्द करण्याचा निर्णय शासनाने केवळ एका वेळेसाठीच घेतला होता. हीच बाब उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला आणि न्यायधीश यांनी मान्य करत विद्यार्थ्यांचा दावा फेटाळून लावला. ह्या संदर्भात उच्च न्यायालयाचे निकाल पत्र अद्यापही संकेतस्थळावर अपलोड केलेले नाही.

JEE Main Exam Schedule

JEE Main Exam : दुसऱ्या सत्रातील ‘जेईई मेन २०२३’ परीक्षा येत्या गुरुवारपासून

The examination of the second session of the JEE Main 2023 examination conducted by the National Testing Agency (NTA) is starting from next Thursday (6th). More than nine lakh 40 thousand students across the country are going to give this exam in the second semester. This exam will be held on 6th, 8th, 10th, 11th, 12th, 13th and 15th of April. On behalf of ‘NTA’, the admit card of the students who will take the exam on Thursday has been made available. The exam will be held at 330 exam centers across the country and 15 exam centers outside the country. The schedule for making the admit card available to the students appearing for the exam after Thursday will be announced soon. Also, NTA has requested that students should regularly visit the official website of NTA to see the latest information regarding the examination.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन २०२३ परीक्षेतील दुसऱ्या सत्रातील परीक्षा येत्या गुरुवारपासून (ता.६) सुरू होत आहे. देशभरातील तब्बल नऊ लाख ४० हजारांहून अधिक विद्यार्थी दुसऱ्या सत्रातील ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ६, ८, १०, ११, १२, १३ आणि १५ एप्रिलला होणार आहे. ‘एनटीए’च्या वतीने गुरुवारी परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील ३३० आणि देशाबाहेरील १५ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गुरूवारनंतर परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत अद्ययावत माहिती पाहण्यासाठी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळाला सातत्याने भेट द्यावी, असे आवाहन एनटीएतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ –

  • – www.nta.ac.in
  • – https://jeemain.nta.nic.in

NTA has changed the schedule of JEE Main (Main Exam) which is important for admission in IITs, NITs and other engineering colleges. ‘NTA’ has postponed the exam on 27th January. This exam will be conducted on January 28. Read More details are given below.

आयआयटी, एनआयटीसह अन्य इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मेनच्या (मुख्य परीक्षा) वेळापत्रकात ‘एनटीए’ने बदल केला आहे. ‘एनटीए’ने २७ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता २८ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

एनटीए’च्या मूळ नियोजनानुसार जेईई मुख्य परीक्षा २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारीला घेतली जाणार होती. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता २४, २५, २८, २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला होणार आहे. एनटीएकडून २७ जानेवारीला घेण्यात येणारी परीक्षा आता २८ जानेवारीला होणार आहे.

यातील बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य पेपर १ ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. बी आर्क आणि बी प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठीचा जेईई मुख्य पेपर २ ही परीक्षा २८ जानेवारीला दुसऱ्या सत्रात घेतला जाणार आहे, असे ‘एनटीए’ने जाहीर केले आहे. या परीक्षा देशातील २९० केंद्रांवर आणि परदेशातील २५ शहरांत घेतल्या जाणार आहेत.

आयआयटी जेईई-मेन्सची परीक्षा ही देशभरात होते आणि देशातील लाखो लोक या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल,’ असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

एनटीए’ने ही प्रवेश परीक्षा अत्यंत उशिरा जाहीर करून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधीच दिलेला नाही. दर वर्षी ‘एनटीए’कडून चार महिने आधी प्रवेशपरीक्षेच्या तारखा घोषित होतात. या वेळी ‘एनटीए’ने खूप विलंब केला आहे. त्याचबरोबर सीबीएसई व अन्य परीक्षा मंडळांच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना; तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी होणार असताना ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. या साऱ्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येणार असल्याने प्रवेश परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा,’ अशी विनंती बालहक्क कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती

JEE Main Exam Registration 2023

JEE Main Exam Registration : National Testing Agency (NTA) has released exam date. The exam will be conducted from January 24 to January 31, 2023. Admit Card will be released after 12th January 2023. The registration process for JEE Main 2023 has started from yesterday i.e. 15th December 2022. Last date of registration is 12th January 2023. Applicants need to registered themself through the given link.

JEE Exam 2023

यंदा बारावीची परीक्षा देणारे आणि ज्यांना पुढे इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करायचं आहे असे विद्यार्थी कित्येक दिवसांपासून JEE Mains 2023 च्या तारखांची आणि नोटिफिकेशनची वाट बघत होते. अखेर NTA कडून JEE Mains 2023 च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तसंच रजिस्ट्रेशन प्रोसेसही सुरु करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसाठी फॉर्म नक्की कसा भरायचा आणि रजिस्टर कसं करायचं हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, JEE मेन 2023 साठी नोंदणी प्रक्रिया कालपासून म्हणजेच 15 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 आहे. आणि परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन नक्की कसं करायचं हे जाणून घेऊया.

अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन्स

  • JEE 2023 नोंदणी कशी करावी
  • नोंदणीसाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2023 सत्र 1 पर्यायावर जा.
  • यामध्ये तुम्हाला JEE (मुख्य) 2023 सत्र 1 अर्जाच्या लिंकवर जावे लागेल.
  • आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर, विनंती केलेले तपशील भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.
  • अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षा 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाईल. 12 जानेवारीनंतर परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जाईल. याशिवाय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शहर जाहीर केले जाणार आहे. JEE Mains या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेसाठी जारी केलेली संपूर्ण सूचना तपासू शकतात.

REGISTRATION LINK 

Release of the NTA Examination Calendar for Academic Year 2023-24


JEE Main Exam Registration : National Testing Agency (NTA) may soon announce the date of Joint Entrance Examination Main 2023 exam date. According to media reports, JEE Mains 2023 will be held twice this year i.e. in January and April. JEE Main 2023 Exam Date will be announced on official website jeemain.nta.nic.in 2023, from here students can get exam date as well as other information.

अभियांत्रिकीची सर्वात प्रतिष्ठित परीक्षा असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई) तारखेची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JEE Mains 2023 या वर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे. जानेवारीला फक्त काही दिवस शिल्लक असताना, असे म्हटले जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 ची तारीख जाहीर करू शकते. या महिन्यातच तारीख येऊ शकते.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 परीक्षेची तारीख ची तारीख जाहीर करू शकते. JEE मेन 2023 परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in 2023 वर जाहीर केली जाईल, येथून विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख तसेच इतर माहिती मिळू शकेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेईई मेन 2023 ची नोंदणी देखील लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in 2023 वरून JEE मुख्य नोंदणी 2023 पूर्ण करावी लागेल. JEE मेन 2023 अर्ज भरताना, विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल, कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि JEE अर्ज शुल्क भरावे लागेल.

अशा पद्धतीनं करता येईल रजिस्टर

  • JEE Main -jeemain.nta.nic.in 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “JEE Main Registration 2023” या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी पूर्ण करण्यासाठी फील्डमध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर, लॉगिन क्रेडेन्शियल्स नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर पाठवले जातील.
  • पुढे, क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
  • अर्ज भरण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड एंटर करा.
  • आवश्यकतेनुसार वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.
  • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाइन मोडमध्ये JEE मेन 2023 अर्ज शुल्क भरा.
  • JEE Mains अर्ज फॉर्म 2023 तपासल्यानंतर, तो सबमिट करा. शेवटी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

JEE Main Exam Session 2 Registration: National Testing Agency, NTA has started registration process again for JEE Main 2022 July Session. The National Testing Agency (NTA), which is conducting the exams, has announced the resumption of the application process for the second session of JEE Main 2022 in two phases. Candidates can register for JEE Main Exam by visiting the official website jeemain.nta.nic.in. The application process can be completed by 9 pm on 9th July 2022.

JEE Main 2022: जेईई मेन २०२२ सत्र २ परीक्षेसाठी नोंदणी विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन नोंदणी करता येईल. अर्जाची प्रक्रिया ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पूर्ण करता येईल. जेईई मुख्य २०२२ जुलै सत्रासाठी यापूर्वी अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी बंद करण्यात आली होत  जेईई मुख्य सत्र २ हे २१ जुलै ते ३० जुलै दरम्यान आयोजित केले जाणार आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन २०२२ सत्र १ साठी परीक्षा शुल्क भरलेल्या आणि जेईई मेन २०२२ सत्र २ साठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मागील अर्ज क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागेल. सत्र २ साठी पेपर, परीक्षेचे माध्यम आणि शहर निवडू शकतात आणि परीक्षा शुल्क भरु शकतात. इच्छुक विद्यार्थी पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करु शकतात

JEE Main 2022 Registration: असा करा अर्ज

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • आता नाव, पालकांचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर तपशील सबमिट करून लॉगिन तयार करा.
  • आता पेजवर परत जाऊन लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर, अर्ज भरा.
  • फोटो आणि सही अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि तृतीयपंथी उमेदवारांकडून ३२५ रुपये शुल्क आकारले जाईल. परदेशी विद्यार्थ्यांना ३ हजार रुपये तर परदेशी महिला, थर्ड जेंडर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १,५०० रुपये शुल्क घेतले जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


 JEE Main Exam Session 2 Registration: National Testing Agency, NTA has started registration process again for JEE Main 2022 July Session. The National Testing Agency (NTA), which is conducting the exams, has announced the resumption of the application process for the second session of JEE Main 2022 in two phases. Applicants who applied for these exam may resisted themself online through the jeemain.nta.nic.in

JEE Main Exam 2022- देशातील सर्वात मोठ्या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेच्या २०२२ आवृत्तीसाठी अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), ने यावेळी दोन टप्प्यात जेईई मेन २०२२ च्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. जेईई मेन २०२२ सत्र २ (जुलै) साठी अर्जांसाठी अर्ज प्रक्रिया प्रथम आयोजित केली जाणार आहे. सत्र (जून) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल.

जेईई मेन २०२२ जून सत्र २३ ते २९ जून या कालावधीत देशातील ५०१ शहरांमध्ये आणि परदेशातील २२ शहरांमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर, निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, पहिली तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून उपस्थित उमेदवारांकडून हरकती मागवण्यात येतील. ज्याच्या पुनरावलोकनानंतर जेईई मुख्य २०२२ अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर केला जाईल.

अर्ज दुरुस्ती विंडो पुन्हा उघडली

दुसरीकडे, NTA ने जेईई मेन २०२२ च्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी १ जुलैपासून अर्ज सुधारणा विंडो पुन्हा उघडली आहे. ज्या उमेदवारांना जेईई मेन अर्ज २०२२ मधील त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टलवर लॉग इन करून दुरुस्त करू शकतात. उमेदवारांना ३ जुलै २०२२ (रात्री ११.५० पर्यंत) अर्ज दुरुस्ती करता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    JEE Main Exam Registration 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!