Krushi Vibhag Bharti-या जिल्ह्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची ३२ पदे रिक्त

Krushi Vibhag Palghar Recruitment 2022

Krushi Vibhag Palghar Bharti 2022: There are 32 vacancies for officers in agriculture department in Palghar district. Out of the total 69 posts sanctioned, 32 posts are vacant from district formation. Sharad Patil, president of Shivkranti Sanghatana, has demanded in a statement sent to the Chief Minister that these posts should be filled immediately. Read more details regarding Krushi Vibhag Palghar Bharti 2022 are given below.

या जिल्ह्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची ३२ रिक्त पदे

Krushi Vibhag – कृषी विभागातील संवर्ग गट क, ड पदभरतीचा अपडेट

Krushi Vibhag Palghar Bharti 2022: पालघर हा शेतकरी व शेतमजुरांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवते, मात्र त्या योजना राबवायला या जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी वर्गच अपुरा आहे. एकूण मंजूर ६९ पदांपैकी ३२ पदे जिल्हा निर्मितीपासून रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे मुख्य पदच रिक्त आहे. तंत्र अधिकारी ही चार पदे मंजूर आहेत. मात्र चारही पदे रिक्त आहेत. कृषी अधिकारी दोन पदे मंजूर आहेत. मात्र, तिही रिक्त आहेत. लेखा अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन्ही पदे भरलेली नाहीत. एकूण १० पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत. मग जिल्ह्याचा कारभार चालणार कसा, असा प्रश्न शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे.
तालुकास्तरावरही अशीच परिस्थिती आहे. जव्हार, मोखाडा, वाडा या तिन्ही तालुक्यांना कृषी अधिकारी नाहीत. मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या चार जागा रिक्त आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी दोनपैकी एक जागा रिक्त आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या १४ पैकी फक्त सहा भरल्या आहेत; तर आठ जागा रिक्त आहेत.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी
अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्यामुळे विकासासाठी आलेला निधी वारंवार परत जातो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!