MHT CET: बीई-बीटेकसह अनेक UG-PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ

MHT CET 2020

Cet Counselling Round 2020 Registration Date Extended For Various Ug Pg Courses

CET Counselling Round 2020 Registration Date Extended For Various Ug Pg Courses: The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has extended the deadline to apply under the cap round for admissions to many undergraduate and postgraduate courses. In this regard, the CET Cell has issued a circular and issued a new syllabus schedule.

बीई-बीटेकसह अनेक UG-PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ

सीटीई कक्षाने अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे…

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने अनेक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅप राउंड अंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. यासंदर्भात सीईटी सेलने एक परिपत्रक जारी करून अभ्यासक्रमनिहाय नव्या तारखांचे वेळापत्रक जारी केले आहे.

BE/B.Tech, B.Parmacy/Pharm. D, B.Arch, B. HMCT, DSE, DSP या यूजी कोर्सेसच्या तर MBA/MMS, ME?M.Tech, MCA, M.Pharmacy/ Pharm.D, M.Arch या पीजी कोर्सेसच्या कॅप राऊंडअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

अभ्यासक्रमनिहाय नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेल्या नव्या तारखा पुढीलप्रमाणे –

पदवीपूर्व अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत
बीई, बीटेक – २२ डिसेंबर २०२०
बी.फार्म – २१ डिसेंबर २०२०
बी. आर्क. – २० डिसेंबर २०२०
बी. एचएमसीटी – २३ डिसेंबर २०२०
डीएसई – २१ डिसेंबर २०२०
डीएसपी – २१ डिसेंबर २०२०

पदव्युत्तर अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत

एमबीए / एमएमएस – २० डिसेंबर २०२०
एमई / एम. टेक – २४ डिसेंबर २०२०
एमसीए – २३ डिसेंबर २०२०
एम. फार्मसी / फार्म. डी. – २३ डिसेंबर २०२०
एम. आर्क. – २३ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा


MHT CET 2020: काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी? वाचा सविस्तर

बीटेक प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया कधी, कशी? वाचा सविस्तर

MHT CET Counselling: Counselling: महाराष्ट्र सीईटी सेल MHT CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू करणार आहे. पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) दोन्ही ग्रुपसाठी शनिवार ५ डिसेंबरपासून समुपदेशन फेऱ्यांना सुरुवात होईल. कोविड – १९ महामारी स्थितीमुळे या फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट किंवा सीईटी परीक्षेच्या वेबसाइटला भेट द्यावी. सर्व थेट लिंक्स या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहेत.

MHT CET 2020 Counselling साठी काही महत्त्वपूर्ण टिप्स :

– MHT CET Councelling 2020 प्रक्रियेत नोंदणी, शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र पडताळणी या टप्प्यांचा समावेश असेल.

– जे विद्यार्थी MHT CET Councelling 2020 साठी पात्र असतील त्यांना स्वतंत्रपणे काऊन्सेलिंग शुल्क भरावे लागणार नाही.

– ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2020 साठी JEE Main स्कोअरच्या आधारे अर्ज केला आहे, त्यांना देखील MHT CET Councelling 2020 साठी नोंदणी करावी लागेल आणि शुल्क भरावे लागेल.

– MHT CET Councelling 2020 ही बीटेक प्रवेशांसाठीची केंद्रीय समुपदेशन प्रक्रिया (CAP) आहे.

– MHT CET Councelling 2020 प्रक्रियेतील सीट अलॉटमेंट प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्राधान्यक्रमांवर आधारलेली असेल.

MHT CET REsult 2020: सीईटी निकालात गुणवंतांची वाढ

MHT CET 2020 Result २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. ४१ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळवण्यात यश मिळाले आहे. १९ विद्यार्थी PCB गटात तर २२ विद्यार्थी PCM गटात टॉप होते.

पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात १८७ केंद्रांवर आणि राज्या बाहेरील १० अशा एकूण १९७ केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती. तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली होती.


The CET cell announced the schedule of students who failed the CET exam due to heavy rains, power outages and lockdown. The exam will be held on November 7 in the morning and afternoon sessions. The decision to re-examine the students who could not reach the examination center due to natural calamity was taken by the CET cell. Accordingly, the examination will be held on November 7 at 45 centers in the state. The PCB exam will be held in the session from 9 to 12 in the morning and the PCM in the session from 2.30 to 5.30 in the afternoon.

MHT CET 2020: हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सीईटी ७ नोव्हेंबरला

MHT CET 2020 Additional Session: अतिवृष्टी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले. ही परीक्षा ७ नोव्हेंबर रोजी सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला होता.

१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नैसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान १०० रुपये शुल्क भरून परीक्षेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परीक्षेची संधी हुकलेल्या चार हजार १८८ विद्यार्थ्यांनी पीसीएम व पीसीबी गटाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यानुसार ७ नोव्हेंबरला राज्यातील ४५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १२ च्या सत्रात पीसीबी, तर दुपारी २.३० ते ५.३० च्या सत्रात पीसीएम गटाची परीक्षा होणार आहे.

‘इथे’ मिळेल हॉलतिकीट

ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना सीईटीच्या mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अ‍ॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली असल्याची महिती सेलकडून देण्यात आली आहे.

अतिरिक्त सीईटी नोटिफिकेशन

MHT CET 2020 अॅडमिट कार्ड

CET वेबसाइट


सीईटी परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ : उदय सामंत

 CET Exam Update : परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे उदय सामंत म्हणाले.

 पूरस्थितीमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही त्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

 पूरग्रस्त विद्यार्थी जे परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सीईटी रजिस्ट्रेशनची लिंक देण्यात आली होती. ही लिंक आणखी दोन दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे ते म्हणाले. तसेच ही परिक्षा 10 नोव्हेंबरआधी घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

 कधी कोरोना, कधी अतिवृष्टी तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठप्प झालेल्या लोकल सेवा अशा अनेक कारणांमुळे यंदा सीईटीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना दिलासा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे एमएचटी सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे.

 विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क कॅप  प्रोसेसच्या वेळी ऍडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी सेलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.  राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही नसर्गिक  आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा

केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र  परीक्षा  देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.


सीईटीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; मिळणार आणखी एक संधी

करोना,पाऊस व खंडित वीजपुरवठा अशा कारणांमुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे…

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे MHT-CET परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे. ही नोंदणी २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० या दोन दिवशी सुरू राहणार आहे.

विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क CAP प्रोसेसच्या वेळी अॅडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी कक्षाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, या परीक्षेसाठी करोना,पाऊस व खंडित वीजपुरवठा अशा कारणांमुळे या सीईटी परीक्षेसाठी सर्व साधारण ४०% विद्यार्थी उपस्थित नव्हते. ही गोष्ट सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या लक्षात आणून देण्याचे काम असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया चे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी केले व यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व संबंधित विभागांना तत्काळ पत्रव्यवहार केला होता.

राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत MHT-CET 2020 परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही विद्यार्थ्यांना करोना, पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर झालेला परिणाम, खंडित वीजपुरवठा आदि कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. PCB आणि PCM या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांचे अतिरिक्त १०० रुपये शुल्क कॅप राउंडमध्ये अॅडजस्ट केले जाईल.’

MHT-CET 2020 च्या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.MHT-CET 2020 अतिरिक्त सत्रासंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी 

CET Exam 2020  : ज्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे.

CET Exam 2020  : अतिवृष्टीसारख्या कारणांनी एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षा देण्यापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती.

राज्याती ‘पीसीबी’ गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. तर, ‘पीसीएम’ गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.सीईटीचे परीक्षा केंद्र प्रामुख्याने शहरी भागात होते. त्याचप्रमाणे शहरी भागात संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. या अनुपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत सोडले जात नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या गुणांची पात्रता कमी केल्याने, बारावीत कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, सीईटीपूर्वी हे विद्यार्थी पूर्वीच्या निकषाप्रमाणे अपात्र असल्याने सीईटीला अनुपस्थित राहिले. नव्या निकषानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्या परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी मिळणार आहे.

Maha CET 2020: State CET Cell, Mumbai has decided to give an extension for Online Registration and Filling up of an application form for CET’s related to courses under Higher and Technical Education conducted by this office on 7th and 08th September 2020

सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सीईटीपरीक्षा १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी २०२० – २१ च्या आॅनलाइन सीईटी परीक्षेकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.

सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून आॅनलाइन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असेल, असेही सेलने स्पष्ट केले.

1 Comment
  1. URVASHI DNYANESHWAR SHRIRAO says

    LLB.FOR 3YEAR

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!