MCGM Bharti – मुंबई महापालिकेत तब्बल २३ हजार पदे रिक्त

MCGM Bharti 2022

MCGM Bharti 2022- As per the posts One lakh 20 thousand posts have been sanctioned in Mumbai Municipal Corporation. As a result, about 23,000 posts are vacant at present.

Due to vacancies in Mumbai Municipal Corporation, work stress is increasing on the officers and employees of the corporation. As per the establishment schedule of the corporation, there are 348 posts in the administrative officer cadre, out of which 25 posts (7 per cent) and 213 posts (17 per cent) are vacant out of the total 1,280 posts in the chief clerical cadre. Therefore, the officials and employees say that the day-to-day work of the municipality as well as the establishment and administrative work is being hampered. More details regarding MCGM Bharti 2022 are given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची संधी – नवीन जाहिरात प्रकाशित

 मुंबई महापालिकेने सलग दोन वर्षे करोनाचा मुकाबला केला असला, तरीही रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होताना दिसत नाही. मुंबई पालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. मुंबई पालिकेत एक लाख २० हजार पदे मंजूर असून, नियमित भरती आणि कंत्राटी पद्धतीने आस्थापना अनुसूचीवर प्रत्यक्ष कार्यरत पदे ९७ हजार आहेत. त्यामुळे सध्या सुमारे २३ हजार पदे रिक्त आहेत.

मुंबई पालिकेत रिक्त पदांमुळे पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. पालिकेच्या आस्थापना अनुसूचीप्रमाणे प्रशासकीय अधिकारी संवर्गाची एकूण ३४८ पदे असून, त्यातील २५ पदे (७ टक्के), मुख्य लिपिक संवर्गातील एकूण १,२८० पदांपैकी २१३ पदे (१७ टक्के) पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासह आस्थापना, प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई पालिकेत अनेक वर्षे विविध विभागातील पदे रिक्त असून, ती भरली जात नाहीत. त्याचा परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवरही होत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने ही पदे भरण्याचे आश्वासन दिले असले, तरीही त्याची पूर्तता होत नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांचा आहे. १४ ऑक्टोबर २०२१मध्ये लिपिक वर्गातील सुमारे १,७०० पदे भरण्याचे आश्वासन प्रशासनाशी झालेल्या चर्चेत देण्यात आले होते. परंतु, सहा महिने उलटले तरीही त्याची पूर्तता न झाल्याचे ‘द म्युनिसिपल युनियन’चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.

कंत्राटीकरणामुळे दुर्लक्ष?

सन १९९०च्या दशकात मुंबई पालिकेत एक लाख ४७ हजार पदे होती. मात्र, ही पदे हळूहळू कमी होत गेल्याने आता ही संख्या सुमारे एक लाख २० हजारांपर्यंत आली आहे. त्यामुळे तत्कालीन कालावधीची तुलना केल्यास ही संख्या आणखी वाढत जाईल, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. सध्या रिक्त असलेली पदे केव्हा भरली जाणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, कंत्राटीकरणावर भर दिला जात असल्याने कायमस्वरूपी पदांच्या भरतीकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.

घनकचरा विभागातील रिक्त पदे

 • सफाई कामगार : ५० पेक्षा जास्त जागा रिक्त. त्यात वारसाहक्क नोकरी प्रकरणे प्रलंबित असल्याने ही पदे रिक्त आहेत.
 • मुकादम : ९० ते १०० जागा रिक्त.
 • प्रतिवेदन वाहक : ४ जागा रिक्त.
 • उपद्रव शोधक : ९८ जागा रिक्त आणि आगार परिचर: ३० जागा रिक्त (दोन्ही पदे १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे रिक्त)
 • चाळ राखणदार – १२ जागा रिक्त.

लिपिक पदे – घन कचरा व्यवस्थापन खात्यात १०० पेक्षा जास्त लिपिक पदे रिक्त असल्याने सफाई कामगारांकडून लिपिक पदाचे काम करून घेतले जात आहे. या विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया प्रचलित पद्धतीने राबविल्यास सफाई कामगारांना २ ते ३ वर्षांनी पदोन्नतीची संधी असल्याचे ‘स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन’चे सरचिटणीस रवींद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.


MCGM Bharti 2022– As per the news Two Thousands Five Hundred of posts for Clerks are vacant in Mumbai Municipal Corporation. However, there is a shortage of 600 clerks in the health department. The corporation had twice called for tenders for the recruitment of clerks as well as for the appointment of a company to conduct the aptitude test. However, the MCGM did not receive a response on both occasions. Therefore, this recruitment is stalled. Read More details of MCGM Bharti 2022 as given below.

मुंबई महानगरपालिकेत लिपिकांची तब्बल अडीज हजार पदे रिक्त

महानगर पालिकेतील प्रशासनाच्या लिखापढीचा आधार असलेल्या कारकूनांची (क्लर्क) तब्बल अडीज हजार पदे रिक्त आहेत. तर,आरोग्य विभागात 600 कारकूनांचा तुटवडा आहे. कारकूनांच्या भरतीचे नियाेजन करण्या बरोबर पात्रता परीक्षा घेण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यासाठी महानगर पालिकेने दोन वेळा निवीदा मागवल्या होत्या. मात्र, दोन्ही वेळेला पालिकेला प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे ही भरती रखडली आहे. अशा परीक्षांचे नियोजन करणाऱ्या काही कंपन्यांकडे पालिकेने संपर्क साधून त्यांना निवीदा प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली होती.मात्र,तरीही या कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2021-नवीन जाहिरात प्रकाशित

महानगर पालिकेच्या प्रशासकीय कारभारात कारकून हे पद पाया मानले जाते.किरकोळ नोंदी पासून महत्वाच्या दस्तांची नोंद ठेवण्यात कारकूनांचा महत्वांचा वाटा असतो.तर,रुग्णालयात केसपेपर तयार करण्या पासून महत्वाची लिखापढीची कामे कारकूनां मार्फत केली जातात.पालिकेच्या सर्व विभागात मिळून 2500 हजारच्या आसपास कारकुनांची पदे रिक्त आहेत.तर,त्यात 600 रिक्त पदे ही आरोग्य विभागातील आहेत.अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजूल पटेल यांनी दिली.

2013-14 मध्ये भरती

आरोग्य विभागातील कारकूनांच्या रिक्त पदबाबत प्रशासना सोबत बैठक घेतली होती.तेव्हा संपुर्ण पालिकेत अडीज हजार पदे रिक्त असल्याचे समजले.दोन वेळा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कंपनी नियुक्त करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या होत्या.मात्र,त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने 2013-14 मध्ये लेखी परीक्षा न घेता वॉकईन पध्दतीने उमेदवारांची नियुक्ती केली होती.त्याच पध्दतीने आता भरती प्रक्रिया राबविता येते का हे पडताळून पाहाण्याची सुचना प्रशासनाला केली आहे.असे पटेल यांनी सांगितले.


मुंबई महापालिकेत ८१० लिपिकांची भरती

BrihanMumbai Mahanagarpalika Bharti 2020 : As per the today’s news the Lipik (Clerk) recruitment process will be started soon in Mumbai Mahanagarpalika. Due to financial crisis, the decision of the municipal administration to change the standing committee has changed the way of recruitment. Since the administration has the right to initiate the recruitment process, it does not mean that the recruitment process will begin immediately. However, rejecting the administration’s request to cancel the recruitment has left the recruitment doors open.

 1. नोकरभरती मार्ग मोकळा
 2. आयुक्तांच्या निर्णयाला स्थायी समितीचा शह
 3. सल्लागार, ओएसडी यांच्या नियुक्त्यांवर सदस्यांचे प्रश्नचिन्ह
 4. प्रक्रिया कधी सुरू करायची, याचा अधिकार प्रशासनाला

BrihanMumbai Mahanagarpalika Bharti 2020 :

आर्थिक संकटामुळे नोकरभरती न करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय स्थायी समितीने बदलल्याने नोकरभरतीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. भरती प्रक्रिया कधी सुरू करायची याचा अधिकार प्रशासनाला असल्याने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू होईल, असे नाही. मात्र भरतीच रद्द करण्याचे प्रशासनाचे निवेदन फेटाळल्याने भरतीची दारे उघडी राहिली आहेत, ही जमेची बाजू आहे.

मुंबई महापालिकेत ८१० लिपिकांची भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. अर्थसंकल्प मांडताना मात्र पालिकेची आर्थिक स्थिती सुदृढ नसल्याने भरती प्रक्रिया स्थगित करावी लागत आहे, अशी घूमजाव करणारी भूमिका घेतली होती. त्यामुळे भरतीकडे डोळे लागलेल्या अनेक बेरोजगारांचा हिरमोड झाला होता. आर्थिक परिस्थितीचा विचार करता भरती तूर्तास स्थगित करून आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच भरतीचा विचार केला जाईल, असे निवेदन स्थायी समितीच्या मागील बैठकीत प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आले होते. हे निवेदन सदस्यांनी फेटाळून लावले.

त्यानंतर शुक्रवारी पुन्हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, सर्वपक्षीय सदस्यांनी नोकरभरती न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत भरती व्हायलाच हवी, अशी आग्रही मागणी केली.

नोकरभरती करताना आर्थिक स्थितीचे कारण दिले जाते. मग सल्लागार, फेलाशिपचे उमेदवार तसेच ओएसडी यांच्या सरसकट नियुक्त्या कशा केल्या जातात, त्यांच्यावर लाखो रुपये कसे खर्च केले जातात, हा खर्च करताना पालिकेच्या आर्थिक स्थितीची काळजी वाटत नाही का, नोकरभरती करतानाच आर्थिक स्थिती कशी काय आठवते, असा सवाल सदस्यांनी केला. लिपिकांची भरती करणार नसाल तर सल्लागार, फेलोशिपचे उमेदवार तसेच ओसडी पदावरील नियुक्त्या रद्द करा, असा आक्रमक पवित्राही सदस्यांनी घेतला. भरती स्थगित करण्याचे प्रशासनाचे निवेदन फेटाळून प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. एकप्रकारे आयुक्तांच्या निर्णयाला समितीने शह दिल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

नोकरभरतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून प्रशासनाने भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

० असे आहेत आक्षेप

विविध पदांवरील सल्लागार तसेच विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करताना पालिका प्रशासन स्थायी समितीची परवानगी घेत नाही. अनेक नियुक्त्या प्रशासकीय अधिकारात केल्या जातात. बेस्टला दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देताना स्थायी समितीला विश्वासात घेतले गेले नव्हते. तेव्हा पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव नव्हती का, असा सूर प्रशासनाच्या विरोधात दिसला. त्यामुळे स्थायी समिती सर्वोच्च आहे हे दाखवून देण्यासाठीच भरती स्थगितीचे निवेदन फेटाळून लावत भरती प्रक्रिया राबवण्याचा आदेश दिला गेला, असे समजते.

सौर्स : म. टा.

MCGM Recruitment for Executive Assistant 874 Vacancies

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागांसाठी भरती

MCGM Recruitment 2020 : Mumbai Mahanagarpalika (BMC) Maha Bharti Advertisement will be published soon for the Executive Assistant Posts. There were 874 vacancies will be available for Executive Assistant. After the recruitment of junior engineers, there will be Mahabharati in Mumbai Municipal Corporation means BMC . The vacant posts of clerk, executive assistant, will be filled by this recruitment. The recruitment process will be implemented by taking an online test. Other details are given below read it carefully and keep visit on govnokri.in for further details….

MCGM Bharti 2020 – 874 Vacant Seat

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

सौर्स : म. टा.

11 Comments
 1. RAJASHREE KADAM says

  i am serarching a clerk vaccancy . when i get it ?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!