सुवर्ण संधी; स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ५३५ पदांसाठी निघाली भरती 

Punjab National Bank Recruitment 2020

Punjab National Bank (PNB) is in the process of recruiting for the posts of Manager and Senior Manager. Interested and eligible candidates can apply online on the official website of PNB Bank. pnbindia.in is the official website of the bank.

सुवर्ण संधी; स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ५३५ पदांसाठी निघाली भरती

PNB Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार पीएनबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. pnbindia.in हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

नोकरीची उत्तम संधी SBI मध्ये हजारो जागांवर बंपर भरती होणार!

कोणकोणत्या पदांची भरती सुरू आहे, किती जागा रिक्त आहेत, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरायचा, अंतिम मुदत काय आहे आदी सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. याशिवाय भरतीचे नोटिफिकेशन, अर्जाची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.

पदांची माहिती

पदांची माहिती

मॅनेजर (रिस्क) – १६० पदे
मॅनेजर (क्रेडिट) – २०० पदे
मॅनेजर (ट्रेझरी) – ३० पदे
मॅनेजर (लॉ) – २५ पदे
मॅनेजर (आर्किटेक्ट) – 2 पदे
मॅनेजर (सिविल) – ८ पदे
मॅनेजर (इकोनॉमिक) – १० पदे
मॅनेजर (एचआर) – १० पदे
सीनियर मॅनेजर (रिस्क) – ४० पदे
सीनियर मॅनेजर (क्रेडिट) – ५० पदे
एकूण – ५३५

IBPS RRB Exam – प्राथमिक परीक्षा 2020 पोस्टपोन

आवश्यक पात्रता
वेगवेगळ्या पदांची पात्रतादेखील स्वतंत्रपणे मागितली आहे. पुढील दिलेल्या अधिसूचना दुव्यावर क्लिक करुन आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल.

शिपायापासून अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या: बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगारीची संधी!

वयोमर्यादा
व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे आहे. त्याच वेळी, वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ३७ वर्षे आहे. राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत असेल.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जांना सुरुवात – ८ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन अर्ज
करण्याची अंतिम तारीख – २९ सप्टेंबर २०२०
अर्जात सुधारणा करण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
अर्ज प्रिंट करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर २०२०

शुल्क
एससी, एसटी आणि दिव्यांगसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. इतर सर्वांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया

या पदांवर पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये लेखी परीक्षा अपेक्षित आहे.

PNB Manager/SO vacancy notification 2020 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!