GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

MPSC Exam new update regarding age limit

MPSC Exam new update regarding age limit

MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द

MPSC Exam 2020 update : Due to the Corona Virus and Lockdown various MPSC Examine and walk in interview has been extended. As per the news It will be a great relief that the Uday Samant’s chief minister, Uddhav Thackeray, decides to extend the age limit of the students who take the competitive exams by 1 year. This year the students whose age is ending. If they are not extended for 1 year, it will be unfair to them. So I am going to talk to Chief Minister Uddhav Thackeray and give him a decision to extend them for 1 year, “he said.

MPSC Exam 2020 update

यंदाच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांना जर 1 वर्ष वाढवून दिलं नाही तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. म्हणून मी त्यांना 1 वर्ष वाढवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकण्यात आली आहे. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी ज्यांच्या वयाची मुदत संपणार आहे, त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. मात्र त्यांना 1 वर्ष वाढवून देण्याचा शब्द उ्च्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता यावी यासाठी त्यांची वयोमर्यादा 1 वर्ष वाढवून देणं आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करेल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उदय सामंत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 1 वर्ष वाढ करण्याचा निर्णय झाल्यास हा मोठा दिलासा असणार आहे.

 

सौर्स : डेली हंट

Leave A Reply

Your email address will not be published.