GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Pune Mahanagarpalika Hospital Bharti 2020

Pune Mahanagarpalika Hospital Bharti 2020

पुणे महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांतील आरोग्य विभागात तात्पुरती भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2020 : Mahanagarpalika published a news regarding the temporary recruitment in Health Department (Arogya Vibhag). As per the news published in esakal their were 750 vacancies is still vacant in Pune Mahanagarpalika General Hospital and Clinics. Due to the shortage of manpower for all the hospitals and dispensaries of the municipality, there are difficulties in providing all the services. It was proposed that the Women’s Child Welfare Committee should fill up the vacant posts immediately. On this, the administration has temporarily suggested that it fill the vacant posts in a contractual basis. The proposal was approved by the Women’s Child Welfare Committee on Wednesday.

Pune Mahanagarpalika Bharti 2020

पुणे – महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांत सुमारे साडेसातशे पदे रिक्त आहेत. पदांच्या भरतीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे. परंतु, ती अद्याप मिळालेली नाही. मंजुरी मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांकरिता मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सर्व सेवा देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, असा प्रस्ताव महिला बालकल्याण समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्यावर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरणार असल्याचा अभिप्राय दिला. अभिप्रायासह प्रस्तावास बुधवारी महिला बालकल्याण समितीने मंजुरी दिली.
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा महागल्याने ती सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना महापालिकेच्या दवाखान्यांत उपचार मिळत नाहीत; तर काही दवाखान्यांमध्ये काही प्रमाणात सोयीसुविधा असल्या, तरी उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचीच कमतरता असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या बऱ्याच रुग्णालयांचा मेकओव्हर करण्यात आला असून, खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सेवेचा विस्तार करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नव्याने काही प्रसतिगृहे, दवाखाने, ई-हेल्थ सेंटरचा विचार सुरू आहे. मात्र, आहे त्याच रुग्णालयांमध्ये डॉक्‍टर, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
आरोग्य विभागात आजमितीला एक हजार ८७८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७५० पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये सर्वाधिक पदे डॉक्‍टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विशेषज्ञांची पदे आहेत. त्यात न्यूरोसर्जन, हृदयरोग तज्ज्ञ, छातीरोग तज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील फिजिशियन, निवासी फिजिशियन, शल्यविशारद यांच्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांचा समावेश आहे.

सौर्स : सकाळ

Leave A Reply

Your email address will not be published.