Maha Board Exam – इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 SSC HSC Exam 2022

SSC HSC Exam Time Table: The schedule of written examinations for classes X and XII was announced a few days back. Now the board has issued the schedule of practical examinations for the 10th and 12th. The practical examination for class XII will start from 14th February and will continue till 3rd March. The 10th exam will be held from February 25 to March 14. With the announcement of written and practical exam schedules, students will have ample time to prepare for the exam.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे  वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे.

लेखी आणि तोंडी परीक्षा कधी होणार ?

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा  15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.

परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन ?

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. बोर्डाकडून याकरिता तयारीदेखील सुरु करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.

24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार 

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्याल लाटेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे शाळां तसेच महावद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता  येत्या 24 जानेवारीपासून राज्याती इयत्ता पहिली ते इयत्ता  बारावी अशा सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोन प्रतिबंधक नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.


School Education Minister Varsha Gaikwad today said that the written examinations for Class X of the State Board of Education will be held offline and there will be no immediate change in it. Read More details as given bleow.

10th, 12th Class Exam : राज्य शिक्षण मंडळाच्या  दहावीच्या  लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, त्यात कोणताही तुर्तास बदल होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  यांनी आज दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं शाळा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यानं शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. राज्यातील इतर वर्ग जरी बंद करण्यात आले होते, तरी दहावी-बारावीचे वर्ग भरवले जात होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दहावी-बारावीची परीक्षा कशाप्रकारे घेतल्या जातील याविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते.

राज्यातील काही विथ्यार्थी आणि पालक संघटनांकडून दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता गायकवाड म्हणाल्या की, कोरेोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असल्याने लवकरच शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन त्यासाठीची तयारी करता यावी म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गांच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.


HSC Exam 2022 -Time Table

The schedule of Ardhamagadhi (16) of the 12th standard examination has been changed. The schedule of 12th examination conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has been partially changed. A circular in this regard has been issued by the Board. The 12th standard examination will be held offline from March 4, 2022 to March 30, 2022.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

बारावीच्या परीक्षेतीली अर्धमागधी (१६) या विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अर्धमागधी (१६) विषयाची परीक्षा ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार होती. हा पेपर आता सुधारित वेळेनुसार, ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे.

बारावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

अधिकृत नोटीस करिता येथे क्लिक करा 

HSC/SSC MAR 20222 PRIVATE CANDIDATE EXTENDED DATE

HSC SSC MAR 2022 ABOUT EDIT OPTION 

१० वी व १२ वी मार्च/एप्रिल २०२२ आवेदनपत्र विलंब शुल्काबाबत 

SSC Exam March-2022 Divyang candidates work education subject time table. 

Circular regarding HSC/SSC March-April 2022 Exam. time table

SSC March-April 2022 Exam. time table 


SSC and HSC Exam 2022

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Examinations (MSHBHSE) is preparing for the offline exams as it is not possible to take the exams of 10th (SSC) and 12th (HSC) students online. The Board has given an extension to the students who have applied for number 17 for the 10th and 12th examinations.

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणं अशक्य असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची (MSHBHSE) ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या दहावी बारावीच्या परीक्षासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु

माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय बोर्डाला कळालेला नाही. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं बोर्डाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.

7 नंबरच्या फॉर्मसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

17 नंबरचा फॉर्म भरुन 12 वी आणि 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 12 जानेवारी पर्यत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :
– दहावी :- http://form17.mh-ssc.ac.in
– बारावी :- http://form17.mh-hsc.ac.in



SSC HSC Board Exams 2022– Good News For SSC and HSC Candidates You will get 30 minutes or half an hour more to solve the paper in the 10th-12th examination to be held in March-April 2022 by the Board of Secondary and Higher Secondary Education. The paper for the three-hour examination in class X-XII will be three and a half hours this year.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज; लेखी परीक्षा साठी वाढीव वेळ

तुम्ही दहावी-बारावी बोर्डाच्या (SSC HSC Board) परीक्षेची तयारी करत आहात का? ऑनलाइन शिक्षणामुळे (Online Education) लिखाणाचा सराव कमी पडतोय का? परीक्षेच्या तीन तासांच्या वेळेत पेपर पूर्ण होणार का? असे प्रश्न तुम्हाला पडले असल्यास जरा इकडे लक्ष द्या! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत तुम्हाला पेपर सोडविण्यासाठी ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तास अधिकचा मिळणार आहे.

होय, परीक्षेदरम्यान पेपर सोडविण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना जादा वेळ मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे. त्यामुळे दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडेतीन तासांचा असेल. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा हा निर्णय घेतला आहे.

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ७० आणि त्यापेक्षा अधिक गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे आणि ७० पेक्षा कमी गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे अधिकचे मिळणार आहेत, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार ८० गुणाच्या पेपरला ३० मिनिटे आणि ४० गुणांच्या पेपरला १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

SSC and HSC Exam 2022 Time Table

Other Important Recruitment 

Bhumi Abhilekh – भूमि अभिलेख विभागात 1013 पदाच्या भरतीला सुरुवात-अर्ज करा  
म्हाडा भरती २०२१  -भरती संदर्भात नवीन अपडेट्स 
 मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा   
आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा 

दहावी परीक्षा अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

SSC HSC Board Exams 2022 -The State Board of Secondary and Higher Secondary Education has released important updates regarding the application process for Class X examinations. Students appearing for the exam have been given an extension to submit online applications. Therefore, students can now apply online till December 26, 2021 with regular fees. The previous deadline was Thursday, December 20, 2021.

SSC HSC Board Exams 2022

  • राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता नियमित शुल्कासह २६ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यापूर्वीची मुदत गुरुवार २० डिसेंबर २०२१ रोजी संपत होती.
  • ही मुदतवाढ नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणारे आदी सर्वांना लागू राहील. याआधी उमेदवारांना १२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत आणि विलंब शुल्कासह २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. पण एसएससी बोर्डाने याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.
  • अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. नव्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह २६ डिसेंबर २०२१ पर्यंत तर विलंब शुल्कासह २७ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
  • माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. यानंतर ६ जानेवारी २०२२ पर्यंत शाळा चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे.
  • विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

SSC and HSC Exam 2022 Time Table

Other Important Recruitment 

Bhumi Abhilekh – भूमि अभिलेख विभागात 1013 पदाच्या भरतीला सुरुवात-अर्ज करा  
म्हाडा भरती २०२१  -भरती संदर्भात नवीन अपडेट्स 
 मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा   
आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा 

Maharashtra Board has announced the exam date for 10th and 12th Exam. The 10th written examination will be held from March 15 to April 18. The 12th written test will be held from March 4 to April 7. Also, the result of the 12th is likely to be available by the second week of June. The 10th result is expected by the second week of July.

१०वी, १२वीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर

राज्यातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. १०वीची  लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल यादरम्यान होणार आहेत.  तर १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे. तसेच १२वीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर १०वीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

१०वी लेखी परीक्षांच्या तारखा

SSC Exam 2021 Schedule

12वी लेखी परीक्षांच्या तारखा


Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has announced important updates regarding the 12th standard examinations to be held in the year 2022. Students who want to appear for the matriculation examination have been given an extension in the application process for the examination. This information was given by the school’s education department. Students will be able to apply till December 11. You can apply till December 20 with a late fee.

HSC Exam 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर २० डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

बारावी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन http://mahahsscboard.in अर्ज करायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून २ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार होती. त्यानंतर १३ डिसेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. पण आता नव्या अपडेटनुसार ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर विलंब शुल्कासह १३ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसायिक अभ्यासक्रम (vocational Course) शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनरपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी खासगी आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २० डिसेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

तसेच उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करु शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.


HSC and SSC Exam 2021

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Examinations is currently in the process of submitting applications for the 12th and 10th examinations online. The 10th and 12th exams are expected to be held in February and March. Sources said that the examination is also likely to be conducted through offline mode as the corona infection has decreased. From 18th November, on the website of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, the facility to submit the examination application for Class X has been made available.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करुन घेण्याचं काम सुरु आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानं परीक्षा देखील ऑफलाईन मोडद्वारे होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दहावीसाठी परीक्षा अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय.

दहावीचे अर्ज दाखल करुन घेण्यास सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र 18 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यास सुरुवात झालीय.

परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी माध्यमिक शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करुन घेण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यानच्या कालावधीमध्ये परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाईल, असं भोसले म्हणाले होते. 18 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून नियमित शुल्कासह अर्ज भरायला सुरुवात होणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

दहावीची परीक्षा कशी होणार?

2022 ची परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची या संदर्भात म्हणणं माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं राज्य सरकारला कळवलं असल्याची माहिती अशोक भोसले यांनी दिली. राज्य सरकारकडून या संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असं अशोक भोसले यांनी म्हटलं आहे.


This is important news for SSC and HSC students. Tenth and twelfth examinations were not held in the last academic year. Therefore, the examination fees paid by 10th and 12th class students will now be refunded. For this, the details of the students will be provided by the secondary school and junior college on 12 November 2021 from 11 am onwards for the class 10th and 12th mahasscboard.in Registration is required through the link https://feerefund.mh-hsc.ac.in.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. मंडळाने याबाबत परिपत्रक काढून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. काय म्हटलंय परिपत्रकात..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन 2021 मधील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे) रद्द करण्यात आली होती. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन 2021 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.

यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 पासून मंडळाचे 1) इयत्ता 10वी आणि 12वी साठी mahasscboard.in 2) इयत्ता 10वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in 3) इयत्ता 12वीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन लिंकद्वारे नोंदविणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.

तर उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.


HSC Exam 2021

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the timetable for filing applications for the Higher Secondary Certificate Examination i.e. Class XII (Class XII) examination to be held in the year 2022. Applications for the exam will be accepted from November 12. School Education Minister Varsha Gaikwad has appealed to the 12th standard students to fill up the application form online at www.mahahsscboard.in.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे १२ नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने mahahsscboard.in येथे घेतले जातील. तपशील खालीलप्रमाणे

नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचं आवाहन

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वेगळ्या तारखा जाहीर

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.



SSC HSS Exam

Tenth, twelfth exams will be offline- The state government had postponed several board exams in the wake of Corona and canceled many, but the education department is testing to conduct the 10th and 12th written exams offline (SSC And HSC written text).

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या होत्या तर अनेक रद्द केल्या, मात्र दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने (SSC And HSC written text) घेण्यासाठी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. यासाठी राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात मत जाणून घेण्यात एक बैठक पार पडली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडली.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली, मात्र कोरोनास्थिती अशीच राहिली किंवा तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्यास दहावी, बारीवीच्या परीक्षांत काही बदल करता येईल का? लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्यासाठी कोणकोणत्या खबरदारी घ्याव्या लागतील? अथवा त्यासाठी वेगळे पर्याय देता येतील?अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा अंतर्गत मूल्यमापनासाठी सज्ज असतील. यासाठी नियोजन कसा करता येईल य़ावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्य़ेमुळे मागील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या निकालातून गुणांची टक्केवारी वाढली तरी प्रत्यक्ष गुणवत्ते संदर्भात प्रश्नचिन्हा उपस्थित होऊ लागल्याने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी शिक्षक आणि शाळा, महाविद्यालय संस्थाचालकांच्या प्रतिनिधीनींनी केली.

त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण विभागाकडून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा निर्णय जाहीर करणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु सुरु करण्यात आले आहेत. मात्र परीक्षेसाठी किती तयारी झाली यावर शिक्षण विभागाने चर्चा केली. या चर्चेत दहावी, बारावीच्या परीक्षा कधी व कशा पध्दतीने घेता येतील? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का? लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी तयार आहेत का? अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर मत जाणून घेण्यात आली.

SSC HSC Exam Update

The State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for private registration in Class X and XII examinations to be held in the year 2022. In order to sit for the exam in private, application number 17 has to be filled. This application process can be done online from 13th October 2021 to 27th October 2021 with regular fee.

Maharashtra HSC SSC Exm 2021: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये खासगीरित्या नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगीरित्या परीक्षेला बसण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरावा लागतो, या अर्ज प्रक्रियेस नियमित शुल्कासह १३ ऑक्टोबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

  • अर्ज प्रक्रिया कशी?

    खासगीरित्या दहावी, बारावी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १३ ते २७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने १७ क्रमांकाचा अर्ज भरायचा आहे.
  • १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज आणि शुल्क जा केल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहेत.
  • संपर्क केंद्रांनी हे अर्ज २ नोव्हेंबर रोजी विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत.

बारावी परीक्षेसाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

शुल्क किती?

  • दहावीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क आहे
  •  बारावीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज भरण्यास कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत ०२०-२५७०५२०७ /२५७०५२०८/ २५७०५२७१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.


12th Exam 2021 Canceled

The decision to cancel the Class XII examination conducted by the State Board of Education was taken at a meeting of the state cabinet on Wednesday in the wake of the corona outbreak.

 राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा निर्णय उच्च न्यायालयास कळविण्यात येणार आहे.

काय असेल फॉर्म्युला?

 परीक्षा न घेता बारावी परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभाग निश्चित करेल. इयत्ता नववी, दहावी व अकरावीच्या गुणांची सरासरी काढून निकाल देणे, हा एक पर्याय असला तरी गेल्यावर्षी अकरावीची परीक्षा झालेली नव्हती, ही अडचण आहे. तसेच पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो .


 10वी परीक्षेबाबत एक-दोन दिवसांत निर्णय घेणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेता अन्य पर्यायांचा विचार करायला हवा, अशी भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी मांडली, तसेच  परीक्षांबाबत एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांबाबत रविवारी केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. मंत्री  यांनी या बैठकीत महाराष्ट्राची भूमिका मांडली. जर सीबीएसईची परीक्षा पुढील महिन्यात घ्यायची असेल, तर पुढील महिन्यातील कोरोना परिस्थिती पाहूनच राज्यांना परीक्षेबाबत विचार करावा लागेल. शिवाय, दीड वर्षापासून बारावीचे विद्यार्थी अभ्यास करत असून, त्यांची मानसिकता विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. कोविड महामारीच्या काळात पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश;परीक्षेद्वारेच प्रवेश दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेपेक्षा मूल्यांकनाची अन्य पद्धत वापरता येईल, अशी भूमिका तज्ज्ञ मांडत आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत स्पष्ट केले. सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांसह संबंधित कर्मचारीवर्गाच्या लसीकरणाची आवश्यकताही गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.

. दहावीच्या मुलांचे नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. असाधारण परिस्थितीत न्यायालयसुद्धा या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी भावनाही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. आठवडाभरात सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.


HSC Exam Question Bank

Maharashtra State Council for Educational Research and Training (SCERT) has made available Question Bank for students appearing for Class XII examinations. Students can download these question papers from the official website of the council.

CBSE Board Exam- बारावी परीक्षेसाठी क्वेश्चन बँक जारी

Maharashtra Board 12th Exam Question Bank: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय प्रश्नपेढी (Question Bank) उपलब्ध केली आहे. विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.

जे विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी ही क्वेश्चन बँक खूपच उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (SCERT) ची वेबसाइट https://maa.ac.in वर जाऊन हे प्रश्न डाऊनलोड करता येतील. ही क्वेश्चन बँक इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये आहे.


Maharashtra SSC Exam Canceled

Maharashtra SSC Exam Canceled: Health Minister Rajesh Tope has informed that the Class X examination has been canceled due to the Corona crisis. Tope also informed that the 12th standard examination will be held. An important meeting of the state cabinet was held due to the increasing prevalence of corona. In this meeting, the decision has been taken unanimously in the news of the examination.

 Maharashtra Board Exams-दहावीच्या परीक्षा रद्द, 12वीच्या परीक्षा होणार- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी या वेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत परीक्षेच्या बातमीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.

दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


sSC HSC Exam 2021

Education Minister Varsha Gaikwad has recently informed that the 10th and 12th exams have been postponed. Education Minister Varsha Gaikwad has announced that the Class X examination will be held in early June and the Class XII examination will be held at the end of May.

 दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवड यांनी नुकतीच दिली आहे. दहावीची परीक्षा ही जूनच्या सुरूवातीला होणार आहे तसेच बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवड यांनी केली आहे.


SSC HSC Exams 2021

SSC HSC Board Exams 2022 -Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’s 10th-12th examinations will now be able to fill up the registration form online with extra late fee between Friday (9th) and Sunday (11th) April 2021.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने शुक्रवार (ता. ९) ते रविवार (ता. ११) दरम्यान भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

 राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. आता रविवारपर्यंत अतिविलंब शुल्कासह खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

  • दहावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा http://form17.mh-ssc.ac.in
  • बारावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा : http://form17.mh-hsc.ac.in

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is preparing to conduct written exams for Class X and XII offline. Similarly, till Saturday 30th April, only one paper of 12th class is coming; Officials also said that efforts are being made by the state board to conduct the exams as per the scheduled schedule as the state government has exempted the candidates from the restrictions.

 दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य मंडळाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली असल्यामुळे या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचीच तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत शनिवारी बारावीचा केवळ एकच पेपर येत आहे; तसेच राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली असल्यामुळे या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


HSC, SSC Exam Final Time Table

HSC SSC Exam 2021 Time Table: Revised final schedule of written and practical examinations for Class X-XII to be conducted in the month of April-May by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education; Guidelines have also been issued.

दहावी-बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे सुधारित अंतिम वेळापत्रक; तसेच मार्गदर्शक सूचना बोर्डाने जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे सुधारित अंतिम वेळापत्रक; तसेच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ, लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक कार्य, परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा, परीक्षा देताना घ्यावयाची दक्षता आदी महत्त्वाचे बदल करण्यात आले असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

PDF जाहिरात

वेळापत्रक


HSC, SSC Exam 2021

SSC HSC Exam 2021: Students will have half an hour more time for the board exam. Student writing practice has decreased. Therefore, they have been given an extension of half an hour. So the exam will now be three and a half hours. Exams will be conducted offline. School Education Minister Varsha Gaikwad gave this information in a press conference on Saturday.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


SSC HSC Exam 2021 Offline

SSC HSC Board Exams 2022 -School Education Minister Varsha Gaikwad clarified in the assembly that the Class X and XII examinations will be held offline in the state.

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन

राज्यात इयत्ता दहावी व बारावी ची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत मुद्दा उपस्थिती केला होता. त्यावर गायकवाड यांनीसांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून विभागा मार्फत चर्चा केली जात आहे.


SSC HSC Exam 2021 Extension For Applications

SSC HSC Exam 2021: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has extended the deadline for online registration of students appearing for the 10th and 12th written examinations to be held in April.

दहावी-बारावी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मुदत वाढवून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सोमवार २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन दहावी साठी http://form17.mh-ssc.ac.in या लिंकवर, तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. मात्र त्यानंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्जही ऑनलाइन पद्धतीने नियमित व विलंब शुल्कासह स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांमार्फत भरावे. माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांतील प्राचार्य यांनी ऑनलाइन अर्ज भरताना कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सरकारने व विशेषतः आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.


10 वी, 12 वी च्या परिक्षा आॅनलाईन की आॅफलाईन? बोर्डाने केले स्पष्ट

SSC HSC Board Exams 2022 :The written test for 10th and 12th standard conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be held offline. The main reason for this is that the board is not conducive to taking the exam online

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

 ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत असं बैठकीतील चर्चेत समोर आलं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे.


Good News For 10 Th Graders Extension To Submit Art Points Proposal

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will conduct the 10th written examination in May this year. Accordingly, the students who have excelled in classical arts, painting and folk art have been given an extension till February 27 to submit proposals to the school for concessional marks.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गुणांसदर्भात दिलासादायक निर्णय

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीची लेखी परीक्षा ही यंदा मे महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेत सहभागी होवून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांसाठी शाळेकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 यापुर्वी कला गुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती. परंतु देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे विविध स्तरातून विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्यात अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कलागुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली होती.

 या मागणीची दखल घेत राज्यमंडळाने परीक्षा उशीरा होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत पुर्वी १५ जानेवारीपर्यंत होती. अशी माहिती राज्यमंडळाच्या सचिव पोपटराव महाजन यांनी पत्राद्वारे दिली आहे.

 ललितकला, चित्रकला लोककला खेळ यातील विशेष प्राविण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच ते २५ गुण देण्यात येतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी या अतिरिक्त गुणांचा फायदा घेतात. कला आणि क्रिडा क्षेत्रात प्राविण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांना यंदा मुकावे लागण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदा एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा, क्रिडास्पर्धा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे.


एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आराखडा कायम

Tenth Twelfth Grade Plan Maintained

Although there was a slight reduction in the syllabus of both the exams, there was no change in the score structure. The schedule of the practical examination will be announced soon. These exams will be the same as before.

मुलांनो लागा तयारीला ; एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आराखडा कायम

 कोरोनामुळे गेल्या वर्षी दहावी- बारावीच्या परीक्षेचे गणित विस्कळित झाले होते. लॉकडाउनच्या काळात पेपर तपासणी करताना राज्य मंडळाला मोठी कसरत करावी लागली होती. दोन्ही परीक्षेच्या अभ्याक्रमात थोडी कपात झाली तरी गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल झालेला नाही. प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. या परीक्षाही पूर्वीप्रमाणेच होतील.

प्रारंभी ऑनलाईन, नंतर ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. बारावीची परीक्षा दर वर्षी फेब्रुवारीत होते. मार्चमध्ये दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होतो. या वर्षी दोन्ही परीक्षा पुढे गेल्या आहेत. दरवर्षी डिसेंबरमध्ये दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्ण होतो.

 मात्र  एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल होणार नसल्याचे विभागीय मंडळाच्या सूत्रांनी आज “सकाळ’ला सांगितले. लेखी परीक्षा 100 गुणांचीच होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

 यावर्षी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये उशिरा सुरू झाली. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविताना ज्या भागात मोबाईला रेंज नव्हती, तेथे अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुणांकन कमी होईल का, अशी शंका होती. बारावीच्या परीक्षेस 23 एप्रिलपासून, तर दहावीच्या परीक्षेस 29 एप्रिलपासून सुरवात होत आहे. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्यावर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर सध्या शिक्षक व प्राध्यापकांचा भर आहे. कोल्हापूर विभागातून दहावीच्या परीक्षेस सुमारे दीड लाख विद्यार्थी दरवर्षी सामोरे जातात.

 कोणताही बदल नाही; परीक्षा 100 गुणांचीच होणार 

दहावी, बारावीच्या गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणे 100 गुणांची परीक्षा होईल. एकूण अभ्यासक्रमातील 25 टक्के आशय कमी होईल. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होईल.

देवीदास कुलाळ, प्रभारी सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ


दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत? मग ही बातमी वाचाच

  SSC HSC Board Exams 2022 -दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहेत. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच, अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.

 तसेच, त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्‍नोत्तरातून संवाद साधला;जाणार आहे. त्यासाठी ५९६ शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Maharashtra SSC  HSC Board Exam And Result Date 2021:

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Maharashtra Ssc Hsc Board Exam And Result Date 2021: The Department of School Education has decided to conduct the SSC (10th) Board Examination from April 29 to May 31, 2021.The written examination for Higher Secondary Certificate 12th will be held from 23rd April 2021 to 29th May 2021. The results of the 12th exam will be announced in the last week of July 2021. The written examination for the certificate examination in secondary schools will be held from April 29, 2021 to May 31, 2021 and the results of the 10th examination will be announced in the last week of August 2021

Ssc, Hsc ExamDate 2021 : एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय.

कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होतंय. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. (Maharashtra Ssc Hsc Board Exam And Result Date 2021 )

आता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केलीय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.


SSC HSC Exams 2021: दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड

SSC HSC Board Exams 2021 Will Not Be Held Before May 2021

SSC HSC Exams 2021: दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड

पुढील वर्षी २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली….

SSC HSC Exams 2021: दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच – वर्षा गायकवाड
SSC HSC Exams 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षा मे २०२१ पूर्वी होणार नाहीत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. करोना व्हायरस महामारी स्थितीमुळे परीक्षा मे महिन्याच्या आधी होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होते. २०२० मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या. मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीला उशीर लागून निकाल विलंबाने लागले. दरम्यान, इयत्ता दहावी, बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वर्ग करोना महामारी स्थितीमुळे ऑनलाइनच सुरू आहेत. परिणामी या परीक्षा कधी होणार, होणार की नाही याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती.

परीक्षांविषयी माहिती देताना गायकवाड म्हणाल्या, ‘करोना विषाणू संसर्गाची सध्याची स्थिती पाहता ही परिस्थिती आणखी काही काळ राहील, असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आदी मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य मंडळाला मे २०२१ पू्र्वी दहावी, बारावीच्या परीक्षा घेता येणार नाहीत. आम्ही २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.’

दरम्यान, दिवाळीनंतर २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

1 Comment
  1. , Omkar langote says

    12 वी चा वेळापत्रक

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!