TATA Motors Jobs-महत्त्वाची बातमी; टाटा मोटर्स मध्ये रोजगाराची संधी
TATA Motors Bharti 2023
TATA Motors Bharti 2023
TATA Motors Recruitment 2023- The central government implements skill schemes to create skilled workers. It also provides employment to workers. Now Tata Motors is giving employment opportunities to students who have passed 12th and are studying in ITI under this scheme. Now Tata Motors is giving jobs to the students who are studying in ITI i.e. Industrial Training Institute
TATA Motors Bharti 2023: टाटा मोटर्स ही देशातली अग्रगण्य मोटार कंपनी आहे. आता टाटा मोटर्स आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देत आहे. बारावी पास, तसंच आयटीआयमध्ये शिकत असलेल्यांना आता थेट नोकरी मिळणार आहे. टाटा मोटर्स कंपनी कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी ठेवत होती. परंतु, आता कंपनीने आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे.
केंद्र सरकार कुशल कामगार घडवण्यासाठी कौशल्य योजना राबवते. त्यातून कामगारांना रोजगारही उपलब्ध होतो. आता टाटा मोटर्स या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण आणि आयटीआयमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी देतंय. यामुळे विद्यार्थ्यांना शिकत असतानाच नोकरीची संधी मिळणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कामाचा चांगला अनुभव मिळू शकेल.
फॅक्टरीत आठ हजारांहून अधिक आयटीआयचे विद्यार्थी
सरकारच्या कौशल्य योजनेअंतर्गत दुर्गम व मागासलेल्या भागातल्या बारावी उत्तीर्ण आणि आयटीआयमध्ये शिकलेल्यांना नोकरीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना नोकरी करताना प्रशिक्षण दिलं जाईल. त्यासोबतच नोकरी सांभाळून अभ्यास करणंही शक्य होईल, असं टाटा मोटर्सच्या एचआर डिपार्टमेंटचे अधिकारी रवींद्र कुमार यांनी म्हटलंय.
टाटा मोटर्स गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवतंय. याअंतर्गत कर्मचार्यांना लेटेस्ट डिजिटल स्किलचं प्रशिक्षण दिलं जातंय. भारतात टाटा मोटर्सच्या सात फॅक्टरीज आहेत. त्यात 14 हजार कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर काम करतात. या 14 हजारांपैकी 8 हजार कर्मचारी आयटीआय आणि 12 वीत शिकणारे आहेत.
‘ऑटो प्लांटमध्ये सर्वसाधारणपणे कर्मचारी सात ते नऊ महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. करोना महामारीच्या काळात तात्पुरत्या कालावधीसाठी कर्मचार्यांना कामावर घेण्याची सुरूवात झाली.’ असं टाटा मोटर्सचे सीएचआर अधिकार्यांनी मिंटशी बोलताना सांगितलं. ते पुढे म्हणाले, ‘कोविड-19 च्या काळात एक वेळ अशीही होती की, तात्पुरत्या कालावधीसाठी कर्मचारी मिळणं अवघड झालं होतं. कारण यातले अनेक जण परराज्यांतले असल्याने ते आपल्या घरी निघून गेले होते.’
नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन योजना आणि नॅशनल अप्रेंटिस टेस्टिंग योजना या योजनांचा हेतू कुशल कामगार घडवणं आणि त्यांना रोजगार मिळवून देणं हा आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या तरुणांना नियमितपणे किमान वेतन किंवा मासिक वेतनाचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत कुशल होण्यासाठी तयार होऊ इच्छिणाऱ्या 550 लाख गरीब ग्रामीण तरुणांना लाभ मिळेल. त्या तरुणांना प्रशिक्षणातून कायमस्वरूपी रोजगार मिळणं शक्य होईल.
Comments are closed.