Thane Mahanagarpalika Recruitment Process Postponed
Thane Mahanagarpalika Recruitment Process Postponed
पालिकेने कंत्राटी भरती पुढे ढकलली
In the water supply department of the Thane Municipality, temporary engineers will be recruited for Junior Engineers, site supervision and water payment collection on a fixed honorarium for 179 days. Interviews were held on November 26 for this recruitment. However, the administration has informed that the recruitment has been postponed due to technical reasons. But the municipality did not say what exactly was the technical reason. The revised schedule of interviews for these posts will be announced on the official website of the Thane Municipal Corporation. As such, candidates are paying close attention to when the interview date is fixed. It is equally important to see how many candidates respond to this recruitment.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने १७९ दिवसांसाठी ठोक मानधनावर कनिष्ठ अभियंता, स्थळ पर्यवेक्ष आणि पाणी देयक वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी २६ नोव्हेंबर रोजी मुलाखती ठेवण्यात आली होती. मात्र, ही भरती तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनांकडून देण्यात आली आहे. परंतु नेमके काय तांत्रिक कारण आहे याबाबत पालिकेने सांगितले नाही. या पदांच्या मुलाखतीचे सुधारित वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुलाखतीची तारीख कधी निश्चित होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या भरतीला उमेदवारांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
सौर्स : म. टा.