Kaushal Vikas Rojgar-आदिवासी उमेदवारांना पूर्व स्पर्धापरीक्षा मोफत प्रशिक्षण

Maharashtra New Rojgar 2022 Free Training Program

Kaushal Vikas Rojgar Free Training for “Adiwasi” Candidates – Skill Development Employment and Entrepreneurship Information and Guidance Center will conduct a free training session for the preparation of the UPSC (Competitive Examination) for the (Adiwasi) Ttribal candidates. Candidates are given competitive exam training for three and a half months. Meanwhile, this training is full time and subjects like Mathematics, English, Clerical Aptitude Test, General Knowledge are taught. Candidates are guided with self employment information. Candidates will be given tuition fee of Rs.1000 during the training period. Read the information below for more information.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागातर्फे आदिवासी उमेदवारांना पूर्व स्पर्धापरीक्षा मोफत प्रशिक्षण

  1. “राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती सोमवारी (ता.२५ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता होणार आहेत.”अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सां.ब मोहिते यांनी दिली.
  2. ते म्हणाले. “प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणाचे हे १०४ वे सत्र आहे. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो.
  3. १८ ते ३८ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची उमेदवारांना स्वतः व्यवस्था करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9766434141 / 9325888322 येथे संपर्क साधावा.
  4. “कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर येथील पोस्ट ऑफिसजवळ आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार ७६६ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी एक हजार २०९ उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळालेला आहे. आदिवासी युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा.”
  5. -दीपक ताथवडकर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी, मंचर (ता.आंबेगाव)

Maharashtra New Rojgar 2022

PMKVY: The Prime Minister’s Skill Development Scheme is a new scheme of the Government of India. This special scheme is designed to provide employment skills to those who are less educated or have dropped out of formal education. Various training schemes are being implemented under the Skill Development Department.

PM Kaushal Vikas Yojana ‘पंतप्रधान कौशल्य विकास योजना’ भारत सरकारची एक नवीन योजना आहे. कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्या लोकांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्ये मिळवून देण्यासाठी ही खास योजना आयोजित करण्यात आली आहे. तसेच, या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांचे रजिस्ट्रेशन असते.

या योजनेअंतर्गत कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एक सर्टीफिकेट दिलं जातं जे संपूर्ण देशभरासाठी वैध असतं. पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत 2022 पर्यंत देशातील जवळपास 40 कोटी लोकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:च्या रोजगारासाठी कर्ज मिळवण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता सुरु झाला आहे.


The government has various schemes to provide employment to the unemployed. These include Pramod Mahajan Skill Development Scheme, Minimum Skill Development Program, Pradhan Mantri Skill Development Scheme.. Various training schemes are being implemented under the Skill Development, Employment and Entrepreneurship Department. Last year, 1316 youths have been provided employment.

  1. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत प्रशिक्षणाबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. गत वर्षात १३१६ युवकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.
  2. बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास कार्यक़्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा समावेश आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये एकूण २ हजार ४१६ युवकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. सदरील प्रशिक्षण प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व ट्रेनिंग सेंटर आदीमार्फत देण्यात येणार आहे.
  3. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, ऑनलाईन वेबिनार, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. २०२० मध्ये १ हजार ३१६ युवकांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ डिसेंबर ते २० डिसेंबर यादरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागांसाठी सात उद्योजक कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
  4. २२१ लाभार्थ्यांची रक्कम मंजूर – विभागांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना राबविण्यात येते. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज योजना राबविली जाते. महामंडळाकडून आजपर्यंत २२१ लाभार्थ्यांना १३ कोटी ८० लाख १५ हजार २१ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. २२१ पैकी २०७ लाभार्थींना व्याज परतावा मिळाला आहे. व्याज परताव्याची एकत्रित रक्कम ९० लाख ३५ हजार २७१ एवढी आहे.
  5. -प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय

सोर्स : लोकमत


Tenth, twelfth and graduated but can’t get a job. The main reason is lack of skill training. Most of the youth will be provided free training through various skill development schemes to overcome this problem. After this training, employment will be available to the youth along with the certificate. In addition, an online job fair has also been organized.

 नोकरी मिळत नाही, तर मग कौशल्य विकासाबरोबरच मिळवा रोजगारही

 पुणे – दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेतले परंतु नोकरी मिळत नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे कौशल्य प्रशिक्षणाचा अभाव. बहुतांश तरुण-तरुणींना येणारी ही अडचण दूर करण्यासाठी विविध कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर तरुण-तरुणींना प्रमाणपत्रासोबत लगेचच रोजगारही उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त ऑनलाइन रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

Course Details

हे असतील कोर्सेस – टेलर, एम्ब्रॉयडरी, शिवणकला मशिन ऑपरेटर, हेअर स्टाईलिस्ट, मोबाईल फोन हार्डवेअर टेक्निशियन, टेक्निशियन कॉम्प्युटिंग, नेटवर्किंग ॲंड स्टोअरेज टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, स्नॅक मेकर, बेकर, डोमेस्टिक आयटी हेल्पडेस्क असिस्टंट, ज्युनिअर स%Aफ्टवेअर इंजिनिअर, डेटा एंट्री ऑपरेटर, डॉक्युमेंटेशन असिस्टंट, रिटेल ट्रेनी असोसिएट, असिस्टंट हेअर स्टाइल, एलईडी लाइट टेक्निशियन, सोलर पीव्ही इन्स्टॉल, सांडपाणी प्रक्रिया टेक्निशियन, मशिन ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ऑफिस असोसिएट, हाउसकीपिंग अटेंडंट, ट्रॅव्हल कन्सल्टंट, प्लंबर, वर्कशॉप मॅनेजर, टेक्निशियन फूड प्रोसेसिंग.

Mahaswayam Rojgar Portal

वेबपोर्टलवर रोजगार मेळावा

कोरोनाच्या संकटानंतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे.

 होमपेजवरील जॉब सीकर लॉगीनमधून युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदाची निवड करावी. ऑनलाइन पसंतीक्रमानुसार उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ दूरध्वनी, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

  •  रोजगारासाठी १०० दिवस कामाचे; अतिरिक्त दहा हजार मजुरांना मिळणार काम
  •  १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी

 कौशल्य विकास अंतर्गत पहिल्या बॅचमध्ये ७४५ इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी मान्यताप्राप्त संस्थांची निवड करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत प्रशिक्षण सुरू होइल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संस्थेला संबंधित उमेदवारास रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.


Maharashtra New Rojgar 2022 – कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राने हजारो कोटींची गुंतवणूक खेचली असून, त्यातील सर्वाधिक गुंतवणूक कोकण विभागाने आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. एकूण गुंतवणुकीच्या ४७ हजार ४५ कोटी (७७ टक्के) गुंतवणूक एकट्या कोकण विभागात झाली आहे.

नोकरीच्या मोठ्या संधी- पुण्यात ३० हजार, औरंगाबादेत १० हजार रोजगार

खालोखाल औरंगाबाद आणि पुणे विभागात गुंतवणुकीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, यातील एकही उद्योग विदर्भात आलेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देशातील २५ उद्योगसमूहांनी ६१ हजार ४२ कोटी ५३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीबाबत परस्पर सामंजस्य करार केले आहेत. त्यात सर्वाधिक प्रतिसाद कोकणासाठी मिळालेला आहे.

अशी होणार गुंतवणूक 

राज्यभरातील गुंतवणुकीची माहिती; वाचा कोणते प्रकल्प कोणत्या विभागात?

पुणे विभाग 
– गोयलगंगा आयटी पार्क हिंजवडी फेज-४- १ हजार कोटी, रोजगार-१० हजार
– जीजी मेट्रोपोलीस आयटी पार्क-वाघोली- दीड हजार कोटी, रोजगार -१५ हजार
– ग्रॅविस फूड प्रोसेसिंग-केसुर्डी- ७५ कोटी, रोजगार १००
– बजाज ऑटो-चाकण- ६५० कोटी, रोजगार-अडीच हजार)
– ॲम्पस फार्मटेक्स अभियांत्रिकी-बारामती- १०४ कोटी, रोजगार २२०
– क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी, रसायन- कुरकुंभ- १३२.४ कोटी, रोजगार ७५०
– सोनाई इटेबल्स-खाद्यतेल रिफायनरी-इंदापूर- १८९.५७ कोटी, रोजगार ३००

सातारा विभाग 
– एक्साइड इंडस्ट्रीज-बॅटरी, फलटण- ५०० कोटी, रोजगार १०००
– कोल्हापूर : सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, विकसक – हातकणंगले- ११० कोटी, रोजगार ५००

अमरावती विभाग 
– श्रीधर कॉटसाइन-वस्त्रोद्योग, अमरावती- ३६९ कोटी, रोजगार ५२०
– हरमन फिनोकेम-रसायन, अमरावती- ५३६.५ कोटी, रोजगार दीड हजार

औरंगाबाद विभाग 
– इन्स्पिरा इन्फ्रा, शेंद्रा-अ‍ौरंगाबाद- ७५०० कोटी, रोजगार १० हजार

कोकण विभाग  

– जुबिलंट फूड्स- अन्नप्रक्रिया- पाताळगंगा, रायगड- १५० कोटी, रोजगार ४००
– जेएसडब्लू स्टील-डोलवी रायगड- २० हजार कोटी, रोजगार ३०००
– सेंच्युअर फार्मा, अ‍ौषध निर्मिती- अंबरनाथ, ठाणे- ३०० कोटी, रोजगार १५००
– के रहेजा, आयटी- टीटीएल ठाणे- ७५०० कोटी, रोजगार ७० हजार
– इंडियन कॉर्पो- लॉजिस्टिक- भिवंडी ठाणे- ११०४९.५ कोटी, रोजगार ७५ हजार
– कीर्तीकुमार स्टील उद्योग, वाडा, पालघर- ७५०० कोटी, रोजगार ६० हजार
– मलक स्पेशालिटी-रसायन, महाड, रायगड- ४५.५६ कोटी, रोजगार ६०
– रेन्युसिस इंडिया, अपारंपरिक ऊर्जा, पाताळगंगा-५०० कोटी, रोजगार दीड हजार

नाशिक विभाग 
– सुमेरू पॉलिएस्टर-टेक्स्टाइल, नवापूर-धुळे- ४२५ कोटी, रोजगार ५००
– नवापूर इंडस्ट्रीयल पार्क- इंडस्ट्रियल इन्फ्रा- नवापूर-धुळे- २०० कोटी, रोजगार १००
– जेनक्रेस्ट बायो-वस्त्रोद्योग – भुसावळ-जळगाव-५०० कोटी, रोजगार ५००
– अंबर एंटरप्राइजेस-उत्पादन, सुपा-अहमदनगर- १०० कोटी, रोजगार २२०
– ग्रँड हॅण्डलूम-वस्त्रोद्योग – नरडाणा-१०६ कोटी, रोजगार २१०


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Monika Rankhamb says

    I need a job..

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!