AIIMS PG वैद्यकीय प्रवेश परीक्षा एक महिन्यांनंतर

AIIMS Exam 2021

The Supreme Court has directed that the Institute of National Importance Combined Entrance Test (INICET 2021) for AIIMS PG courses should be conducted within a month.

AIIMS PG वैद्यकीय प्रवेश परीक्षा एक महिन्यांनंतर

PG Medical entrance test : AIIMS PG अभ्यासक्रमांसाठी होणारी इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (Institute of National Importance Combined Entrance Test, INICET 2021)एक महिन्याने करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही परीक्षा लांबणीवर टाकावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या परीक्षेसाठी सुमारे ८० हजार डॉक्टरांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. १६ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

न्यायमूर्ती इंदिरा बनर्जी आणि एम आर शाह यांच्या पीठाने याचिकेवर हे निर्देश दिले. याचिकेमध्ये १६ जून तारीख ठरवणाऱ्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले होते. परीक्षेमुळे उमेदवारांना होणारा त्रास आणि करोना ड्यूटीमुळे डॉक्टर परीक्षा केंद्रांपासून दूर असल्या कारणाने परीक्षा पुढे ढकलण्याची गरज असल्याचे पीठाने म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!