BharatPeटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये भरती; शंभरहून अधिक पदं भरणार

BharatPe Recruitment 2021

Financial technology company BharatPe has joined the technology team this financial year. One hundred vacancies will be filled by the company. The company will bring a number of products in the Commerce and Consumer section.

BharatPeटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये भरती; शंभरहून अधिक पदं भरणार

BharatPe Recruitment2021: फायनान्शिअल टेक्नोलॉजी कंपनी BharatPeने या आर्थिक वर्षात टेक्नोलॉजी टीममध्ये भरती निघाली आहे. कंपनीनतर्फे शंभर जागा भरल्या जाणार आहेत. कॉमर्स अॅण्ड कंझ्युमर सेक्शनमध्ये कंपनीन अनेक उत्पादने आणणार आहे. टेक्नोलॉजी टीम तिप्पट केली जाणार असून यामध्ये शंभर पदं भरली जातील असे सांगण्यात आले आहे.

भारत पे कंपनीने पगारामध्ये बदल करण्याच्या हेतून टेक्नोलॉजी टीममधील सदस्यांच्या मूल्यमापनाचे काम आठ महिने आधीच केले आहे. कंपनीने आपल्या टीमला इन्क्रीमेंट रुपात ७५ टक्के वाढ दिली आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार आहे. यामध्ये सीटीसी आणि कर्मचारी शेअर स्वामित्व योजनेच्या अंतर्गत वाढलेले शेअर्स देखील आहेत.

सध्या टेक्नॉलॉजी टीममध्ये ६० कर्मचारी

भारतपे चे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशनीर ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टेक्नॉलॉजीला पुढे नेणारी आर्थिक सेवा औद्योगिक संघटना आहे. कंपनी भारतात नव्या पिढीची बॅंकीग यंत्रणा बनवत आहे. आम्ही बाजारामध्ये उत्तम दर्जाचे उत्पादन करु इच्छितो आणि कौशल्य शिक्षण असलेल्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितो असे ते म्हणाले.

सध्या भारत पे हे सर्व UPI एप्ससाठी सिंगल इंटरफेस देते आणि व्यापाऱ्यांना भारत पे क्यूआर च्या माध्यमातून UPI सुविधा मोफत देण्यात येते. यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करणे सोपे जाते.

गेल्या सहा महिन्यात कंपनीने १० कोटीहून अधिक सदस्यांसहीत देशातील सर्वात मोठी मल्टी-ब्रांड लॉयल्टी प्रोग्राम कंपनी, पेबॅक इंडियाची घोषणा केली.

1 Comment
  1. Dadasaheb says

    Muzhe job chahiye iske liye kya karna hoga

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!