CBSE 11th Admission-विद्यार्थ्यांना मोठा दिलासा-जाणून घ्या!
CBSE 11th Admission
The Central Board of Secondary Education (CBSE) has given a great relief to its millions of students. The board has relaxed some of the rules for those students whose CBSE 10th result 2021 is coming this year and they are preparing for the 11th admission (CBSE 11th admission 2021). What is the decision of CBSE regarding admission in class XI
CBSE 11th Admission-विद्यार्थ्यांना मोठा दिलासा-जाणून घ्या!
विद्यार्थ्यांना मिळाल्या दोन मोठ्या सवलती. CBSE 11th class admission 2021: सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालासोबत अकरावी प्रवेशांच्या बाबतीतली माहितीही दिली आहे. बोर्डाने यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अपडेट जाणून घ्या…
CBSE 11th admission 2021: ही आहे सवलत
कोविड-19 (Covid-19) मुळे सीबीएसईने २०२० मध्ये पहिल्यांदा हा निर्णय घेतला होता की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत बेसिक गणित घेतले आहे, ते देखील अकरावीत गणित विषय घेऊ शकतात. त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. करोनामुळे यंदाही हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
यंदा दहावीचा निकाल बोर्ड परीक्षेविनाच तयार होत आहे. शालेय स्तरावरील चाचण्या आणि प्री-बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे. जर या निकषांद्वारे मूल्यमापन करताना कोणी विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, तरी तो अकरावीत प्रवेश घेऊ शकतो. सीबीएसईने याची परवानगी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट म्हणजेच पुरवणी परीक्षा होणार आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचा कंपार्टमेंटचा निकाल येत नाही, तोपर्यंत ते आपला अकरावीचा अभ्यास सुरू ठेवू शकतात.