CBSE 10th Result 2021-मूल्यांकन प्रक्रिया जाणून घ्या..

CBSE 10th Evaluation Process 2021:

Many CBSE board X students could not appear for the pre-board exams or in-school exams this year. How will such students be assessed? The Central Board of Secondary Education (CBSE) Class X Result (CBSE 10th Result 2021) is being prepared on the basis of internal assessment and pre-board examination.

CBSE 10th Evaluation Process 2021: सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना यंदा प्री-बोर्ड परीक्षा किंवा शालांतर्गत परीक्षा देता आली नव्हती. अशा विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जाणार आहे? जाणून घ्या..

CBSE 10th board assessment process 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल (CBSE 10th Result 2021) इंटरनल असेसमेंट आणि प्री-बोर्ड परीक्षेच्या आधारे तयार केला जात आहे. पण अनेक शाळांमध्ये अशी अडचण येत आहे की अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत घेतलेली चाचणी परीक्षा किंवा प्रिलिम्स दिल्या नव्हत्या. अनेक शाळांमध्ये सर्व विषयांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन (CBSE 10th evaluation 2021) कसे केले जावे, याबाबतचे निर्देशही सीबीएसई बोर्डाने जारी केले आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सर्व संलग्न शाळांना त्यांची निकाल समिती तयार करण्यास सांगितले आहे. इंटरनल असेसमेंट न झालेली असल्यास किंवा कुठल्या चाचणीत विद्यार्थी सहभागी झाले नसतील तर अशा वेळी ही समिती त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी फॉर्म्युले आणि मापदंड तयार करेल. त्यांचे मूल्यांकन एकूण ८० गुणांसाठी करण्यात येईल.

जे विद्यार्थी संपूर्ण वर्षात जर एखाद्या विषयाची एकही परीक्षा देऊ शकले नसतील तर त्यांचे मूल्यांकन फोन कॉल वर केले जाईल. सोबतच शाळांना मूल्यांकन करताना बोर्डाला संबंधित कागदपत्रे सप्रमाण सादर करावयाची आहेत.


CBSE Board Exam Results

The CBSE board has started preparations for the 10th result. The board has activated a link on the e-exam portal. Each school has been instructed to appoint a seven-member results committee.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालाची तयारी सुरू केली आहे. बोर्डाने ई-परीक्षा पोर्टलवर एक लिंक अॅक्टिव्ह केली आहे. निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डांतर्गत येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यामध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल (CBSE 10th Result 2021) जाहीर करण्यात येणार आहेत. या निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये झालेल्या विविध ऑनलाइन परीक्षा प्रकारांसाठी विशिष्ट गुण नमूद करण्यात आले आहेत.

सीबीएसईचा मूल्यमापन आराखडा दृष्टिक्षेपात

  • १. निकालासाठी प्रत्येक शाळेची सात शिक्षकांची समिती
  • २. सातपैकी दोन शिक्षक इतर शाळांमधील असणे बंधनकारक
  • ३. मू्ल्यमापन करताना चाचणीला १०, सहामाहीला ३० तर पूर्व परीक्षेला ४० मार्कांचा अधिकतम दर्जा
  • ४. एकूण ८० गुणांचे मूल्यमापन

The Central Board of Secondary Education (CBSE) has announced that the results will be announced after an internal evaluation of the 10th standard students. The results will be announced by June 20 after the completion of the assessment in May.

CBSE दहावीच्या परीक्षेचा निकाल या तारखेला होणार जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने निकष जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत अंतर्गत मूल्यांकन करून त्या आधारावर दहावीचे निकाल दिले जाणार आहेत.

20 जूनपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे नियोजन CBSE कडून करण्यात आले आहे. देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मे महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 20 जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे शाळेत मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन केली जाणार असून त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

असे असेल 80 गुणांचे विभाजन

  • चाचणी परीक्षा- 10 गुण
  • सहामाही परीक्षा- 30 गुण
  • सराव परीक्षा- 40 गुण

CBSE Board 10th, 12th Exam 2020

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा शनिवारपासून

CBSE Exam 2020 : CBSE Board 10th Exam 2020 and CBSE Board 12th Exam 2020 will be started from 15th February 2020 and CBSE Board 10th Exam 2020 will be ended on 20th February 2020. and CBSE Board 12th Exam 2020 will be ended on 30th March 2020. Complete details regarding CBSE Examin 2020 are given same time table of CBSE examine 10th and 12th are also given below:

CBSE Exam 2020 :

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा शनिवारी १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. दहावीची परीक्षा २० मार्च तर बारावीची परीक्षा ३० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षीपासून मुलांच्या निकालावर Fail किंवा कंपार्टमेंट हा शब्द न लिहिण्यावर विचार सुरू आहे. जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होतात, त्यांना कंपार्टमेंटल परीक्षा द्यावी लागते. पण यापुढे निकालावर तसे नमूद करण्याचा विचार बोर्ड करत आहे. दरम्यान, शनिवारी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ते पाहा…

परीक्षेला जाण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या :

> हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड विसरू नका.

> परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेआधी ३० ते ४० मिनिटे अगोदर पोहोचा.

> परीक्षा केंद्रावर आपल्या जागेवर बसण्यापूर्वी आजूबाजूला कोणता कागदाचा तुकडा वगैरे तर नाही ना पडला हे नीट तपासून घ्या.

> इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

> हॉल तिकिटाची एक फोटोकॉपी घरी जरूर ठेवा.
————

सीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावुक पत्र

मागील वर्षी कसा होता निकाल?

सीबीएसई दहावी – २०१९ मध्ये सीबीएसई दहावीत ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

एकूण १८,२७,४७२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

सीबीएसई बारावी – २०१९ मध्ये सीबीएसई बारावीत ८३.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक : CBSE Time Table 2020

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक येथे पाहा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या शनिवारपासून १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत आहे. तथापि, त्यापूर्वी सकाळी १० ते रात्री १०:१५ या वेळेत परीक्षार्थिंना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. तर, सकाळी १०.१५ ते १०:३० दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. दहा वाजण्यापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे.

  1. सीबीएसई बारावीचं वेळापत्रक येथे पहा CBSE 12th Time table
  2. सीबीएसई दहावी परीक्षेचं वेळापत्रक येथे पहा CBSE 10th Time Table

दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा शनिवार १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई दहावीचा शेवटचा पेपर सामाजिक शास्त्र असून तो १८ मार्चला आहे. बारावीचा शेवटचा पेपर सोशलॉजी विषयाचा असून तो ३० मार्चला आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड (हॉल तिकीट) देण्यात आले आहेत. त्यांनी अधिक परीक्षेसंदर्भातली अधिक माहितीसाठी शाळांना संपर्क करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!