CBSE Sample Paper – CBSE कडून 2022-23 परीक्षांचे सॅम्पल पेपर्स जाहीर;
CBSE 10th and 12th Class Sample Paper
CBSE 10th and 12th Exam Sample Paper: The Central Board of Secondary Education (CBSE) has issued sample question papers for Class X and XII Examination 2022. Tenth and twelfth grade students can go to the official website of CBSE Board and download sample question papers of all their subjects.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE ) नं चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 10 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी सॅम्पल पेपर्स जाहीर केले आहेत. CBSE इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं आणि वेळेत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी CBSE ना सॅम्पल पेपर्स जारी केले आहेत. तसंच CBSE बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्किंग स्कीमही जारी करण्यात आली आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वरून सॅम्पल पेपर्स तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत.
CBSE Board Exam 2022-2023 Sample Papers: असे करा डाउनलोड
- सीबीएससीच्या वेबसाइट www.cbse.gov.in वर जा.
- होमपेज वर, ‘अकॅडमिक वेबसाइट’ लिंक वर क्लिक करा.
- नवीन पेज उघडेल, मेन्यू मध्ये ‘Sample Question Paper’ सेक्शन वर जा.
- येथे ‘SQP 2022-2023’ आणि दहावी, बारावी इयत्तांची निवड करा.
- नव्या पेज वर, विषयवार सॅम्पल पेपर्स आणि मार्किंग स्कीम लिंक दिसेल.
- आपल्या विषयाच्या लिंकवर क्लिक करा, पीडीएफ उघडेल.
- नमुना प्रश्नपत्रिक डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी साठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.
असं असेल CBSE 12वीचं पेपर पॅटर्न- CBSE 12th Exam Pattern
- इयत्ता 12वी मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात 35-35 प्रश्न विचारले जातील. 18 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येकी दोन गुणांचे सात प्रश्न विचारले जातील.
- जीवशास्त्र विषयात सत्तर गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्यात 33 प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या 16 असेल आणि दोन गुणांच्या प्रश्नांची संख्या पाच असेल. 12वी मध्ये गणित विषयात 40 प्रश्न विचारले जातील. 80 गुणांच्या परीक्षेत एक गुणाचे 18 प्रश्न आणि दोन गुणांचे पाच प्रश्न असतील.
असं असेल CBSE 10वीचं पेपर पॅटर्न- CBSE 10th Exam Pattern
- यावेळी दहावीतील प्रश्नांची संख्या बारावीपेक्षा जास्त असेल. विज्ञान विषयात 39 तर सामाजिक शास्त्रात 37 प्रश्न विचारले जातील.
- मंडळानुसार गणिताचे 37 प्रश्न विचारले जातील आणि इंग्रजीचे तीस प्रश्न विचारले जातील.
- यावेळी संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासून तयारी करता यावी यासाठी बोर्डाने नमुना पेपर जाहीर केला आहे.