Government Jobs- केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये भरती,७ हजारहून अधिक पदांची भरती

Central Government Jobs 2022

If you are looking for good opportunities in various departments related to the Central Government, then this is the news for you. More than 7,000 vacancies will be filled in various Union Ministries and Departments. The notification has been announced on March 22 and candidates can apply till April 30. Interested and eligible candidates for this post can apply for the vacant post by visiting the official website

Central Government Bharti 2022

केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये ७ हजारहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.

SSC MTS 3603 पदांची भरती जाहिरात प्रकाशित- 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी 

 • विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (Multi tasking Staff, MTS) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि सीमाशुल्क (Central Board of Indirect Taxes and Customs, CBIC) आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स (Central Bureau of Narcotics, CBN) मध्ये हवालदार पदांच्या ७,३०१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
 • यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून ३० एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • या पदांसाठी भरती कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission, SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Task, MTS) आणि हवालदार परीक्षा २०२१ (Constable examination 2021) च्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
 • यासंदर्भात २२ मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर करुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

 How to Apply? 

 • इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससी वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.
 • अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
 • नंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करून त्यांचा अर्ज सबमिट करावा लागेल.
 • एसएससीने परीक्षेसाठी अर्ज शुल्क देखील निर्धारित केले असून ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
 • उमेदवार ४ मे पर्यंत बँक चलनाद्वारे ऑफलाइन माध्यमातून शुल्क जमा करू शकतील.

Central Government Recruitment Eligible Criteria 

 • या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
 • तसेच १ जानेवारी २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त (काही पदांसाठी २७ वर्षे) नसावे.
 • एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

ऑनलाईन अर्ज लिंक  –

संपूर्ण जाहिरात येथे पहा –

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!