केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CRPF) १ लाख पदे रिक्त

CRPF Recruitment 2020

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १ लाख पदे रिक्त

सेवा भरती नियमाला अनुसरूनच या जागा भरण्यात येतील.

 सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.

तरुणांनो, लागा तयारीला! पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदं भरणार

राय म्हणाले, सीएपीएफमधील रिक्त जागा भरण्याची एक प्रक्रिया थेट भरती, बढती आणि प्रतिनियुक्ती अशी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत व ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या कॉन्स्टेबल्सच्या ६०,२१०, उपनिरीक्षकांच्या २,५३४ जागा भरण्याचे काम कर्मचारी निवड आयोगामार्फत आणि ३३० सहायक कमांडंटस्च्या जागा भरण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे.


CRPF मध्ये विविध पदांवर भरती; पगार १.४२ लाखांपर्यंत

CRPF Bharti 2020: The Central Reserve Police Force is recruiting a large number of paramedical staff and other posts. Learn when and how to apply …

The Central Reserve Police Force (CRPF) has started the recruitment process for hundreds of posts including paramedical staff. For this, notification has been issued on the official website crpf.gov.in. Candidates selected for recruitment will get a salary of up to Rs 1.42 lakh per month.

केंद्रीय राखीव पोलीस दलात पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. अर्ज कधी आणि कसा करायचा जाणून घ्या…

केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पॅरामेडिकल स्टाफसह विविध शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १.४२ लाखापर्यंत पगार मिळेल.

राज्य पोलीस दलात १० हजार पोलिसांची भरती होणार

कोणती पदे भरली जाणार आहेत? अर्ज करण्याची मुदत काय? ही सर्व माहिती या बातमीत आपल्याला पुढे देण्यात आली आहे. तसेच रिक्त जागांसाठी अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही देत आहोत.

पदांची माहिती

 • निरीक्षक (डाएटिशियन) – १ पद
 • उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) – १७५ पदे
 • उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – ८ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) – ८४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) – ५ पदे
 • सहाय्यक सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) – ४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब टेक्निशियन) – ६४ पदे
 • सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / वैद्यक) – ८८ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ – ३ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) – ८ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे सहायक) – ८४ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – ५ पदे
 • हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल – ४ पदे
 • कॉन्स्टेबल (कुक) – ११६ पदे
 • कॉन्स्टेबल (धोबी) – ५ पदे
 • कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल (टेबल बॉय) ) – १ पद
 • हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – ३ पदे
 • कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१ पदे
 • एकूण पदांची संख्या – ७८९

अर्जाची माहिती

या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २० जुलै २०२० पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे.

CRPF Recruitment 2020

या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

पुढील शहरांमध्ये होईल परीक्षा –

नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम

आवश्यक पात्रता

या भरतीत बरीच पदे आहेत. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादादेखील विविध पदांसाठी स्वतंत्रपणे मागितली गेली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपणांस नोटिफिकेशनद्वारे मिळू शकते.

2 Comments
 1. Mayur somnath mulik says

  Police bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!