Dr. Kalam Fellowship : युवा संशोधकांसाठी ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Dr. APJ Abdul Kalam Young Research Fellowship 2022-2023
Dr. APJ Abdul Kalam Young Research Fellowship 2022-2023
Dr. APJ Abdul Kalam Young Research Fellowship 2022-2023- In reverential memory of late President and Scientist Dr. A.P.J Abdul Kalam, TERRE Policy Centre, instituted the scheme for Dr. A.P.J Abdul Kalam Young Research Fellowship with the aim of distinguishing young Researchers from India with extraordinary promise and creativity who have made notable research contributions in the field of Environment protection. However, this fellowship has been solely managed and funded by TERRE
‘तेर पोलिसी सेंटर’च्या वतीने आयोजित करण्यात (Dr. Kalam Fellowship) आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ. ए. पी. जे. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’साठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. युवा संशोधकांना येत्या 16 जानेवारी पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे,अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
Dr. Kalam Fellowship : युवा संशोधकांसाठी ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी व युवकांच्या कल्पकतेला वाव देत तरुण, नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘डॉ. ए. पी. जे. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’सुरु करण्यात (Dr. Kalam Fellowship) आली असून यंदा शिष्यवृत्तीचे 6 वे वर्ष आहे. यातील सर्वोत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 25 हजार व प्रमाणपत्र अशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीविषयी अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी “http://www.drkalamfellowship.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे . या शिष्यवृत्तीसाठी वय वर्ष 18 ते 25 या वयोगटातील युवक अर्ज भरू शकतात.
याविषयी आपटे म्हणाल्या, “डॉ. कलाम हे देशातील प्रत्येकाचेच लाडके व्यक्तिमत्व आहेत. नवोदित संशोधक, महाविद्यालयीन तरुण यांना नवीन काहीतरी करून पाहण्याची इच्छा असते मात्र त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नाही. अशा संशोधन क्षेत्राला आश्वासक ठरणाऱ्या (Dr. Kalam Fellowship) तरुणांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून मदत करण्यासाठी या शिष्यवृत्तीची आम्ही सुरुवात केली आहे. डॉ. कलाम यांच्या नावाच्या या शिष्यवृत्तीने त्यांना प्रेरणा मिळावी हाच त्यामागील उद्देश आहे.”