पदवीधरांसाठी ECGC मध्ये सरकारी नोकरीची संधी;
ECGC Recruitment 2021
ECGC Recruitment 2021: ECGC Limited, a company providing export insurance assistance to Indian exporters, has started the recruitment process. The company comes under the Ministry of Commerce, Government of India. The recruitment advertisement was recently published on December 29, 2020, by ECGC, a public sector undertaking. Accordingly, the company has to fill 63 posts of Executive Officer (Probationary Officer). The last date for submission of the application form is 31st January 2021.
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ECGC मध्ये भरती
ECGC PO Recruitment 2021: भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी ईसीजीसी लिमिटेडने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या ईसीजीसीद्वारे अलीकडेच २९ डिसेंबर २०२० रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (प्रोबेशनरी ऑफिसर) ची 63 पदे भरायची आहेत.
या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ecgc.in हे कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ आहे. शिवाय, या वृत्ताच्या अखेरीसही अर्ज करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार ३१ जानेवारीपर्यंत आपला ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.
ECGC PO Recruitment 2021 Qualification Details – पात्रता
ईसीजीसी पीओ नोटिफिकेशन २०२१ नुसार, ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पू्र्ण केले आहे, असे उमेदवार अर्ज करू शकतील.
Age Limit – वयोमर्यादा
१ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षांहून कमी आणि कमाल ३० वर्षांहून अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वीचा किंवा १ जानेवारी २०२० नंतरचा नसावा.
How to Apply : अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसी लिमिटेडच्या करिअर सेक्शनमध्ये दिलेल्या पीओ अॅप्लिकेशन लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जावे. येथे उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल. लॉगइनसाठी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे.
Application Fees – शुल्क
अर्जांचे शुल्क ७०० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गाती विद्यार्थ्यांसाठी शुल्क १२५ रुपये आहे.