पदवीधर उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी

High Court Recruitment 2020

पदवीधर उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी

High Court Recruitment 2020 : Govt Jobs: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; फक्त ग्रॅज्युएशनची अट, पगार 66 हजार

जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुमच्यासाठी उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. राजस्थानउच्च न्यायालयात (HCRAJ) मध्ये क्लार्क आणि असिस्टंटच्या पदांवर भरती निघाली आहे. केवळ एक परिक्षा देऊन सरकारी नोकरी मिळविता येऊ शकते. यासाठी hcraj.nic.in वर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

Rajasthan High Court Recruitment 2020: ही भरती प्रक्रिया मार्च 2020 मध्येच सुरु केली जाणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ती स्थगित करण्यात आली. आता 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्य़ात आली आहे.

रिक्त पदे:

 • जूनियर ज्यूडिशियल असिस्टंट – 268 पदे
 • क्लार्क ग्रेड 2 – 08 पदे
 • जूनियर असिस्टंट – 18 पदे
 • क्लार्क ग्रेड 2 (डिस्ट्रिक्ट कोर्ट – नॉन टीएसपी) – 1056 पदे
 • क्लार्क ग्रेड 2 (डिस्ट्रिक्ट कोर्ट – टीएसपी) – 61 पदे
 • जूनियर असिस्टंट (नॉन टीएसपी) – 333 पदे
 • जूनियर असिस्टंट (टीएसपी) – 16 पदे
 • एकूण पदे – 1760

शैक्षणिक योग्यता काय?

या पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. याशिवाय त्याचे वय 18 ते 40 वर्षे या वयोगटात असावे. आरक्षित वर्गासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. वय 1 जानेवारी 2021 पर्यंतचे गृहित धरले जाणार आहे.

पे स्केल – 20,800 रुपये प्रति महिना ते 65,900 रुपये प्रति महिना

अर्ज कसा कराल?

उच्चन्यायालयातील भरतीसाठी राजस्थान उच्चन्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे.

 • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : 1 ऑक्टोबर 2020
 • अर्ज प्रक्रियेची शेवटची मुदत : 1 नोव्हेंबर 2020
 • अर्ज शुल्क अंतिम तारिख – 2 नोव्हेंबर 2020

शुल्क किती?

जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 500 रुपये. राजस्थानच्या एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 350 रुपये.

लिंक्स

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!