Postal Department Bharti – पोस्ट विभागात बंपर भरती
Indian Post Recruitment 2021
The application process for thousands of posts of Rural Postal Service (GDS) in Uttar Pradesh Postal Circle and Uttarakhand Postal Circle of Indian Postal Department has just started. Candidates who have passed 10th can apply for these posts. Interested candidates for these posts can also apply online through the official website of the post, appost.in. Meanwhile, the last date to apply is 22 September 2021.
पोस्टात 4845 पदांवर थेट भरती
India Post GDS Recruitment 2021 : उत्तर प्रदेश पोस्टल सर्कल आणि भारतीय पोस्टल विभागाच्या उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS) हजारो पदांकरिता भरतीसाठी अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झालीय. दहावीतील उत्तीर्ण उमेदवार, या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांकरिता इच्छुक उमेदवार पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटव्दारेही appost.in ऑनलाइन अर्ज भरु शकतात. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 आहे.
कोणत्या पोस्टल सर्कलमध्ये किती जागा?- Indian Postal Department Vacancy Details
- उत्तर प्रदेश पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या – 4264
- उत्तराखंड पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या – 581
- दोन्ही राज्यांमध्ये एकूण पदांची संख्या – 4845
GDS Vacancy 2021- Eligibility Criteria : शैक्षणिक पात्रता-
टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही, परंतु 10 वीच्या गुणांच्या आधारे त्यांची निवड केली जाईल.
Postal Circle GDS Recruitment 2021 : वयोमर्यादा
पोस्ट विभागात जीडीएसच्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय पदांनुसार 40 वर्षे आहे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार शिथिलता दिली जाईल.
GDS Vacancy 2021 : अर्ज शुल्क- Application Fees
या पदांवर अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी / एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
अर्ज कसा करावा?
भारतीय पोस्टल विभागाच्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सर्कलमध्ये GDS च्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला appost.in भेट द्यावी लागेल. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 आहे.
Huge opportunity for candidates who have passed 10th and 12th. Department invited application form for Multi Tasking Staff, Lower Division Clerk, Postal Assistant, Sorting Assistant, Postman / Mail Guard. The last date for submission of application form is 24th Sept 2021.
India Post recruitment 2021 : सरकारी नोकरी शोधताय? मग, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता टपाल विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून 2357 च्या मेगा भरतीनंतर पुन्हा ‘भारतीय टपाल विभागा’कडून तेलंगणा सर्कलमधील (Telangana Circle) क्लर्क (Clerk) आणि पोस्टमन (Postman) यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण, 55 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. पोस्ट विभागाने मल्टी टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन क्लर्क, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड या पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार असल्याचे पोस्ट अधिकाऱ्यांनी जाहिरातीव्दारे स्पष्ट केले आहे.
India Post recruitment 2021 : रिक्त जागा- Indian Posts Vacancy Details
- पोस्टल असिस्टंट – 11 पदे
- सॉर्टिंग असिस्टंट – 08 पदे
- पोस्टमन – 26 पदे
- एमटीएस – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : – Eligibility Criteria
- पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- ‘पोस्टमन’ या पदाकरिता उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, शिवाय उमेदवारानं 10 वीच्या वर्गात तेलगू भाषेचा अभ्यास केलेला असावा. तसेच, तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा परवाना देखील गरजेचा आहे.
- ‘एमटीएस’ या पदाकरिता 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून उमेदवाराला तेलगू भाषा येणं गरजेचं आहे.
- या पदांसाठी वयोमर्यादा : 18 ते 27 वयवर्षे असलेल्या ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, तर एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्षे यात सूट देण्यात आलीय. त्याचबरोबर, एमटीएस पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
पोस्टात भरती होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असून यासाठी पोस्ट विभागाच्या https://tsposts.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा
Mail Motor Service Chandigarh Invites Offline Applications From Eligible Candidates For The Post of Staff Car Driver Vacancies. There Are 11 Vacancies that will be filled by Organization. The Educational Qualification For Recruitment is 10th Pass Eligible, and Interested candidates can apply through the official website Before Its Last Date 20.09.2021.
जर तुम्ही टपाल विभागातील ड्रायव्हर पदी भरतीच्या संधींची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. टपाल विभागाने मेल मोटर सर्व्हिस युनिट चंदीगडमध्ये कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागविले आहेत. टपाल विभागाने शनिवार, 21 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार मेल मोटर सर्व्हिस युनिटमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य केंद्रीय सेवा, गट सी, नॉन-मिनिस्ट्रियल, नॉन -गॅझेटेड) पदासाठी थेट भरतीची एकूण 11 पदे आहेत. या पदांवर नियुक्त उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्स स्तर -2 (19,900 ते 63,200 रुपये) नुसार वेतन दिले जाईल.
जाणून घ्या पात्रता- Eligibility Criteria
- पोस्ट विभागाने जारी केलेल्या स्टाफ कार ड्रायव्हर भरती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच वैध LMV आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजेच 20 सप्टेंबर 2021 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- आरक्षित प्रवर्गांसाठी (एससी, ओबीसी आणि इतर) वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे. अधिक तपशिलासाठी भरती अधिसूचना पाहा.
असा करा अर्ज- How to Apply For Indian Post Vacancy 2021
- इच्छुक उमेदवार भरती अधिसूचना आणि अर्ज फॉर्म पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या indiapost.gov.in या लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
- उमेदवारांनी हा फॉर्म पूर्ण भरून आणि आवश्यक कागदपत्रे पत्त्यावर संलग्न करून 20 सप्टेंबर 2021 पर्यंत व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस युनिट, जीपीओ बिल्डिंग, सेक्टर – 17, चंदीगड – 160017 या पत्त्यावर सादर करावा.
- उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की त्यांना त्यांचा अर्ज फक्त नोंदणीकृत पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठवावा लागेल. सामान्य पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
Indian Post Recruitment 2020: Unemployed and self-employed eligible youth who have passed Class X will be appointed as agents for the Western Division of the city and the Rural Postal Life Insurance Scheme. The last date for sending applications is January 11, 2021
दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार आणि स्वयंरोजगार असलेल्या पात्र तरुण-तरुणींना शहरातील पश्चिम विभाग आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.
बेरोजगार, स्वयंरोजगारीत तरुण, सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्या, सेवानिवृत्त शिक्षक बचत गट प्रतिनिधी आणि वरील अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्ती यांची नेमणूक मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
इच्छुकांनी येत्या 11 जानेवारीपर्यंत चार फोटो, दहावी अथवा समतुल्य परीक्षेची मार्कलिस्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड झेरॉक्ससह कागदपत्रे येथील कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावेत. अथवा येत्या 11 जानेवारीपर्यंत लोकमान्य नगर, पोस्ट कार्यालय, शास्त्री रस्ता, दांडेकर पुलाजवळ, पुणे -411030 या पत्त्यावरील पोस्ट कार्यालयात कागदपत्रे प्राप्त होतील असे पाठवावेत. मुलाखतीस येताना उमेदवारांनी संबंधित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे शहर पश्चिम विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
Eligibility Criteria-पात्रता :
– उमेदवार इयत्ता दहावी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
– उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे.
– संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असावे.
– इतर कोणत्याही कंपनीचा आयुर्विमा व्यवसाय करीत नसावा.
– उत्तीर्ण उमेदवारास पाच हजार रुपये सिक्युरीटी डिपॉजिट ठेवणे बंधनकारक
– उमेदवारास अतिरिक्त प्रशिक्षण दिल्यानंतर परवाना मिळण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य
भारतीय टपाल खात्याद्वारे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये मोठी भरती केली जाणार आहे. पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मेल गार्ड पदांसाठी ही भरती होत आहे. सोमवार ५ ऑक्टोबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे.
या भरती प्रक्रियेसंदर्भातील नोटिफिकेशन निघाले आहे. इच्छुक उमेदवराल ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करू शकतात. कोणती पदे, किती पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा आदी सर्व इत्यंभूत माहिती या वृत्तात देत आहोत. शिवाय नोटिफिकेशनची लिंकदेखील अखेरीस देण्यात येत आहे.
कोणती आणि किती पदे?
पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
मेल गार्ड (MG) – १५ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे
एकूण पदे – १,३७१
वयोमर्यादा
पोस्टमन आणि मेल गार्ड पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्याता १८ ते २५ वर्षे आहे. SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे. याबाबतची अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे.
शैक्षणिक पात्रता
– मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
– मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून हवे.
– संगणकाचे ज्ञान आवश्यक. पेपर ३ हा संगणकावर डेटा एन्ट्रीचे कौशल्य पाहणारा पेपर असेल, तो पात्र असणे आवश्यक.
– पोस्टमन पदांसाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक. परवाना नसल्यास दोन वर्षे मुदतीत तो मिळवण्याची अट. दिव्यांगांना सवलत.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट असणार आहे. पेपर १ हा १०० गुणांचा तर पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुणांचे असतील. पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची परीक्षा असले. पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. सिलॅबसबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. (पान क्र. ११ ते १३). उमेदवारांनी अर्ज भरतानाच परीक्षा केंद्राचा कोडही नमूद करायचा आहे. राज्यात एकूण २५ परीक्षा केंद्रे असून त्यांचे कोड नोटिफिकेशनमध्ये (पान क्र. २४) देण्यात आले आहेत.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवारांनी https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/ या रजिस्ट्रेशन पोर्टलवर अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
शुल्क
शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. प्रति पोस्ट १०० रुपये ऑनलाइन अर्जासाठी आणि ४०० रुपये परीक्षा शुल्क असे एकूण ५०० रुपये शुल्क आहे. आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.
वेतन श्रेणी
पोस्टमन / मेल गार्ड – वेतनश्रेणी – ३ (२१,७०० ते ६९,१०० रुपये.)
मल्टी टास्किंग स्टाफ – वेतनश्रेणी – १ (१८,००० ते ५६,९००)
भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Indian Post Recruitment 2020
The Postal Department has once again started the application process for the post of Gramin Dak Sevak (GDS) in Haryana Postal Circle. The postal staff of the Indian Post Office will be recruited and the posts of Branch Post Master and Assistant Branch Post Master will be filled. Let’s learn important Indian information
१०वी पास असलेल्यांना पोस्टात संधी; परीक्षेशिवाय मिळतेय नोकरी
भरतीअंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर अशी पदे भरली जाणार आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
हरियाणा पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांवर भरतीसाठी टपाल विभागाने पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील डाक सेवकांची भरती करण्यात येणार असून, भरतीअंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर अशी पदे भरली जाणार आहे. भारतीय महत्त्वाची माहिती जाणून घेऊया
पदांची संख्या
हरियाणा पोस्टल सर्कल भरतीअंतर्गत ग्रामीण डाक सेवे (GDS)च्या 608 पदांची भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
हरियाणा पोस्टल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे. भारतीय पोस्ट डाक विभाग २०२० अंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे
निवड कशी होईल?
या भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, परंतु ऑनलाईन अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल
तुम्हाला किती पगार मिळेल?
हरियाणा पोस्टल विभागात BPMच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,000 रुपये ते 14,500 रुपये पगार मिळेल. एबीपीएम /डाक सेवक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 12,000 रुपये पगार देण्यात येईल
अर्ज कसा करावा?
या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक व पात्र उमेदवार १२ ऑगस्ट २०२० पर्यंत https://haryanapost.gov.in/ वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2020 होती. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना पाहू शकता.
kya mts se post man ki ho sakate hai kya?
MTS
L. I. G. 2 sec. 2E Room number G11 kalamboli, navi Mumbai