ITI च्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग-जाणून घ्या!

ITI Job Training

Goods news for ITI candidates as per the latest news On-the-job training will be available to about 10,000 trainees studying in 126 Government Industrial Training Institutes (ITIs) in 10 districts of the state. The project will be implemented in 10 districts of the state namely Aurangabad, Kolhapur, Mumbai, Nagpur, Nashik, Palghar, Pune, Raigad and Thane.

ITI च्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग-जाणून घ्या!

राज्यातील १० जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ उपलब्ध होणार आहे. कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या १० जिल्ह्यांतील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम व उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कुशल संधाता (वेल्डर) यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  थायसेनकृप इंडस्ट्रीजच्या सहयोगातून उभारण्यात येत असलेल्या वेल्डींग वर्कशॉपच्या माध्यमातून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होईल, असे मंत्री श्री मलिक यांनी सांगितले.

3 Comments
  1. Majid Saudagar says

    Saudagar majid

  2. Shriram D Mali says

    Nice

  3. NAVED ANWAZ says

    I am interested a government job..👍🏻👍🏻👍🏻

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!