J P Morgan जेपी मॉर्गन ’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या
J P Morgan Company Jobs
According to information provided by JPMorgan, a large number of recruits will be recruited for the tech center in Bangalore. About 4,000 experienced technologists in India will be associated with the company.
जेपी मॉर्गन ’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या
कोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक वृत्त असून मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे. भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.
अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) यंदाच्या वर्षी हजारो जणांना नोकरी देण्याची योजना असून, भारतात जवळपास ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टना कंपनीसोबत जोडले जाणार आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनकडून देण्यात आली आहे.
जेपी मॉर्गन कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील टेक सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी २ मिलियन देण्याची घोषणा केली आहे. जेपी मॉर्गन चेस ने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मदतीचे आवाहन केले आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी दिली आहे.