JEE Mains, Advanced परीक्षांबाबत मोठा बदल; आयोजनासाठी आता नवीन बोर्ड

JEE Main And Advanced Exams

The Union Ministry of Education has set up a new board of 19 members for JEE Mains and JEE Advanced examinations. According to the Ministry of Education, the JEE Board has been set up to streamline the process of JEE Mains and JEE Advance examinations. The JEE Mains exams will be held in two different phases between June and July. The first phase of JEE Mains examination will start from June 20

JEE Mains, Advanced परीक्षांबाबत मोठा बदल; आयोजनासाठी आता नवीन बोर्ड

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘जेईई मेन्स’ (JEE Mains) आणि ‘जेईई अॅडव्हान्स’ (JEE Advanced) परीक्षांसाठी १९ सदस्यांचे नवे बोर्ड स्थापन केले आहे. ‘आयआयटी’ (IIT) आणि इंजिनीअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘जेईई’ परीक्षा या बोर्डामार्फत घेतल्या जाणार आहेत. ‘आयआयटी, मद्रास’चे माजी संचालक प्रा. भास्कर राममूर्ती बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

  • शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन्स’ आणि ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षांची प्रक्रिया अधिक चांगली आणि पारदर्शक करण्यासाठी जेईई बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक या बोर्डाचे सदस्य सचिव असतील. या वेळीदेखील जेईईच्या या बोर्डामध्ये विविध आयआयटी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. या बोर्डामध्ये ‘आयआयटी, मुंबई’, ‘आयआयटी, गुवाहाटी’ आणि ‘आयआयटी, खरगपूर’च्या संचालकांचा समावेश आहे. ‘सीबीएसई’च्या अध्यक्षांचाही या बोर्डात समावेश करण्यात आला आहे.
  • शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकारीदेखील बोर्डात सदस्य असतील. याशिवाय ‘एनआयटी’ व ट्रिपल आयटीचे संचालक; तसेच गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि बिहारच्या प्रतिनिधींनाही या बोर्डात स्थान देण्यात आले आहे.
  • जून आणि जुलैच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या टप्प्यांत जेईई मेन्स परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. जेईई मेन्सची पहिल्या टप्प्यातील परीक्षा २० जूनपासून सुरू होणार आहे
  • . या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जाणार आहेत. या दोन्ही परीक्षांतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टमध्ये अॅडव्हान्स परीक्षा घेतली जाईल.
  • शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेईईसाठी स्थापन करण्यात आलेले नवीन बोर्ड यापूर्वीच्या जेईई बोर्डाची जागा घेईल. जेईईच्या जुन्या बोर्डाचा कार्यकाळ ३१ मार्चला संपुष्टात आला आहे.
  • पूर्वीच्या बोर्डाच्या तुलनेत नवे बोर्ड अधिक व्यापक असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. नवीन जेईई बोर्डाचे सचिवालयदेखील असेल; तसेच त्यामार्फत जेईई परीक्षांबाबत पूर्णवेळ काम पाहिले जाणार आहे.

यंदापासूनच कार्यभार नव्या बोर्डाकडे

जेईई परीक्षांसाठीचे १९ सदस्यीय बोर्ड २०२२ आणि २०२३मधील परीक्षांसाठीची व्यवस्था करील. परीक्षेशी संबंधित धोरण, नियम आणि व्यवस्था या बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात असतील. जेईईशी संबंधित प्रशासकीय विषय, वित्तीय निर्णय आणि न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारीदेखील या बोर्डाकडे असेल. जेईई व इतर स्पर्धा परीक्षांचे प्रत्यक्ष आयोजन करण्याची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे असते. बोर्ड नियम, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका निश्चित करते, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षेचे प्रत्यक्ष आयोजन करीत असते. जेईईच्या नवीन बोर्डातही नॅशनल टेस्टिंग एजन्सीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!