LIC Admit Card -LIC AAO परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

LIC Admit Card 2021

Life Insurance Corporation of India has issued Hall ticket for the post of Assistant Administrative Officer and Assistant Engineer. Candidates who had applied for this examination can download the admission form by visiting the official website- licindia.in.

LIC AAO परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्यावतीनं सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता पदासाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. या परीक्षांची उमेदवारांकडून बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता ते अधिकृत वेबसाइट- licindia.in ला भेट देऊन प्रवेशपत्र  डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे- Download the LIC AAO Admit Card

  • स्टेप 1: प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइट, licindia.in ला भेट द्या.
  • स्टेप 2: वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या करिअर टॅबवर क्लिक करा
  • स्टेप 3: सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (विशेषज्ञ) – 2020 च्या भरती येथे क्लिक करा.
  • स्टेप 4: परीक्षा सुरु होण्याच्यात तारखांच्या तपशिलावर क्लिक करा
  • स्टेप 5: लॉगीन डिटेल्स, नोंदणी क्रमांक सबमिट करा.
  • स्टेप 6: सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र ओपन होईल.
  • स्टेप 7: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

परीक्षा 28 ऑगस्टला

एलआयसीच्या वतीनं सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झाली होती. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2020 होती. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा होऊ शकली नाही. आता प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. या भरतीद्वारे एकूण 218 पदं भरली जाणार असून 28 ऑगस्ट 2021 रोजी घेतली जाणार आहे.

LIC AAO परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करा 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!