MAH MCA CET 2021 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात- २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज

Maharashtra MCA CET 2021

The Maharashtra State Common Entrance Examination Cell (CET CELL) has started the process of online application for the CET Exam (MAH MCA CET 2021) for admission to the MCA course. Accordingly, the students who are interested for admission are requested to apply online till July 23.

MAH MCA CET 2021 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात- २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी (MAH MCA CET 2021) ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर परिपत्रक सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. यंदाची सीईटी राज्यात आणि राज्याबाहेरील काही काही परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सध्या नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, राज्यातील करोनाची परिस्थिती निवळल्यावर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला १००० रुपये शुल्क आहे; तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याला ८०० रुपये शुल्क आहे. सीईटीची माहिती पुस्तिका आणि परीक्षेबाबत अधिक माहिती https://mca2021.mahacet.org/ या लिंकवर उपलब्ध आहे.

Apply Online

Notification


 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!