MAH BEd CET 2021 Result: बीएड, सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

MAHA B.Ed. CET 2021 Results

The results of the CET examination for admission to B.Ed courses in the state have been announced. The results of B.Ed General and Special, as well as B.Ed CET ELCT examinations have been announced.

राज्यात बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला. बी.एड जनरल आणि स्पेशल, तसेच बीएड सीईटी ईएलसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बी.एड प्रवेशासाठी ही परीक्षा ६ आणि ७ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. बी.एड (जनरल ॲण्ड स्पेशल) सीईटी परीक्षेसाठी ५२ हजार २१३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ हजार १३२ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परीक्षा दिलेले सर्वच्या सर्व म्हणजेच ४५ हजार १३२ उमेदवार प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

तर बी.एड सीईटी ईएलसीटी परीक्षेसाठी २३ हजार ३८६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १९ हजार ९९९ उमेदवारांनी परीक्षा दिली.  त्यातील १९ हजार ९९७ उमेदवार पात्र ठरले आहेत. बी.एड प्रवेशासाठी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी केलेल्या अर्जदारांच्या मेरिटनुसार उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.


MAH BEd CET 2020 Result: बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच

बीएड, इएलसीटी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत…

Maha BED CET 2020 Results:  महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरील अपडेटनुसार, हे निकाल ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. मात्र, सीईटी कक्षाने अद्याप निकालाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत सूचना उपलब्ध केलेली नाही.

निकाल जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा दिलेले उमेदवार mahacet.org वर भेट देऊ शकतील. पुढील पद्धतीने निकाल तपासता येऊ शकेल.

– निकाल जारी झाल्यानंतर उमेदवार सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा. – होमपेजवर MAH BEd CET 2020 Result या लिंकवर क्लिक करा.
– आता एक नवं पेज उघडेल. येथे उमेदवारांनी आपले क्रिडेन्शिअल भरा आणि सबमिट करा.
– आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटही काढून ठेव शकता.

निकाल जाहीर होतात उमेदवारांचे काऊन्सेलिंग सुरू होईल. या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिले जातील. बीएड कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० या परीक्षा २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० रोजी झाल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. बीएड सीईटीसाठी प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये होती. बीएड इएलसीटीसाठी केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका होती. बीएड सीईटीसाठी एकूण १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी होता. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नव्हते. तर बीएड इएलसीटीसाठी एकून ५० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण होता. रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ग्रामर, फोनेटिक्स, फिगर्स ऑफ स्पीच, सेंटेंस फॉर्मेशन आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

सोर्स  म. टा


Directorate of Higher Education, Maharashtra state has declared the B.Ed. CET 2018-19 results is now declared. Candidates can check this results using following official website link. To check the results candidates need to use the Enter Registration / Roll Number through following official website link. Check MAHA B.Ed. CET 2018 Results in following link:-

MAHA B.Ed. CET 2018 Results

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!