देशात मेडिकलच्या दोन हजार चारशे जागा रिक्त

Medical Admission

There are still 2,463 vacancies in the MBBS and BDS courses this year due to the Corona epidemic, free marks in exams, students’ decision to drop out, and the desire to go abroad for up-to-date education. All the remaining seats will be given non-donation admission, which will give a good career opportunity to many deserving students who are financially strapped.

देशात मेडिकलच्या दोन हजार चारशे जागा रिक्त

 Two thousand four hundred medical posts are vacant in the country – कोरोना महामारीमुळे परीक्षेत मुक्त हस्ते दिलेले गुण, ईअर ड्रॉपचा विद्यार्थ्यांनी घेतलेला निर्णय यासह परदेशात जाऊन अद्ययावत शिक्षण घेण्याची आस यामुळे यंदा एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमात २,४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्व जागांवर विनाडोनेशन प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तम करिअरची संधी मिळणार आहे.

महागडा आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर समजला जाणारा एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. देशात २२४ महाविद्यालयांत तब्बल २ हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता निव्वळ शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतेच देशभरातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या रिक्त जागांबाबत माहिती प्रसारित केली आहे. महाराष्ट्रातील १९ महाविद्यालयांत बीडीएस आणि एमबीबीएसच्या ३३२ जागा अद्यापही रिक्त आहेत. यात एमबीबीएससाठी सांगली, मुंबई, कोल्हापूर, लोणी, कऱ्हाड, वर्धा, पुणे येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये एमबीबीएसच्या एनआरआय कोट्यामधील जागांचा समावेश सर्वाधिक आहे. यातील काही जागा एआयआयएमएस व जेआयपीएमईआरसारख्या केंद्रीय संस्थांमध्येही आहेत.

१. मर्सी फॅक्टर रिझल्ट

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवायला मर्यादा होत्या. परिणामी उत्तरपत्रिका तपासताना सढळ हाताने गुण देण्यात आले. यालाच शैक्षणिक क्षेत्रात मर्सी फॅक्टर रिझल्ट असे म्हणतात. या निकालामुळे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांना जाण्याची संधी उपलब्ध झाली. कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अवकाश अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असल्याचे दिसते.

२. परदेशात जाण्याकडे कल

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भारतात आठ वर्षे अभ्यास पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन पुन्हा लाखो रुपये खर्च करून दोन वर्षे अभ्यास करावा लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता यंदा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ईअर ड्रॉप घेऊन उत्तम गुण मिळवून परदेशात प्रवेश घेण्याची तयारी दर्शविली आहे.

सोर्स : लोकमत

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!