MSRTC Pune Bharti -एसटी महामंडळात २४०० चालकांची पदे अद्याप रिक्त
ST Mahamandal Pune Bharti 2022
MSRTC Pune Bharti 2022: Latest updates regading MRTC Pune Bharti 2022 is that In Maharashtra State Road Transport Corporation Pune there is a total 2400 vacancies are vacant. The recruitment of 2,400 drivers who passed the exam in 2019 is still pending. Read More details regarding MSRTC Pune Bharti 2022/ MSRTC Pune Recruitment 2022 are given below.
एसटी महामंडळातर्फे २४०० चालककांची पदे अद्याप रिक्त
पुणे एसटी महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्यभरात ४४१६ जागांसाठी भरती निघाली होती. यानंतर उमेदवारांची नियमाप्रमाणे लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय तपासणीदेखील झाली. मात्र, त्यानंतर आलेला कोरोना आणि सत्तांतर यामुळे २४०० पात्र चालक-वाहक अद्याप वेटिंगवर आहेत.
तीन वर्षानंतरदेखील पुढे काहीच होत नसल्याने पात्र उमेदवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यातच नव्याने कंत्राटी पद्धतीवर ५ हजार एसटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा यावर्षी केली आहे. २०१९ च्या उमेदवारांचाच अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना, पुढील उमेदवारांचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
२४०० चालकवाहकांची भरती लटकली
२०१९ मध्ये परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४०० चालकवाहकांची भरती अजूनही रखडली आहे. त्यातदेखील पात्र उमेदवार वैद्यकीय चाचणी झाल्याचे सांगतात, तर एसटी प्रशासन अद्यापही वैद्यकीय चाचणी झालेली नसल्याचे सांगत असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून उत्तीर्ण होऊनहीं नोकरी लागत नसल्याने लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यासंबंधीचे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाहीत. मध्यवर्ती कार्यालयातून जोवर आदेश येत नाही, तोपर्यंत यावर आम्ही भाष्य करु शकत नाही. त्यांच्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया होईल.
– रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, एसटी विभाग, पुणे