MSRTC Bharti – एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेतील इतके चालक नोकरीच्या प्रतीक्षेत

ST Mahamandal Recruitment 2022

ST Mahamandal Bharti 2022

MSRTC Bharti 2022 : As per the latest news, The ST Mahamandal has hired 800 contract drivers from a manpower company to protect the rural population. However, about 2,200 Drivers and Conductor who have been selected in the ST Corporation’s 2019 recruitment process and are on the waiting list are waiting for jobs. However, as the corporation is ignoring this, the management of ST corporation is being questioned.

गेल्या अडीच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील जनतेची गैरसाेय राेखण्यासाठी महामंडळाने मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून ८०० कंत्राटी चालकांना घेतले आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या २०१९ मधील भरती प्रक्रियेत निवड झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवर असेलेले सुमारे २ हजार २०० चालक तथा वाहक यांना नोकरीचा प्रतीक्षेत आहे. मात्र, याकडे महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने एसटी महामंडळाचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.

 • गेल्या ८६ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने अनेक प्रयत्न करूनही केवळ २७ हजार कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. यामध्ये चालक- वाहकांची संख्या अत्यल्प म्हणजे केवळ १० टक्के आहे. त्यामुळे एसटीची १० टक्के वाहतूक सुरू आहे.
 • एसटी प्रशासनाच्या मते २३५ आगार अंशतः सुरू झाले आहेत. वस्तुतः त्यापैकी १०० आगारातून केवळ १-२ एसटी बसेस धावतात. ग्रामीण भागातील जनतेची गैरसाेय राेखण्यासाठी महामंडळाने मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून ८०० कंत्राटी चालकांना घेतले आहे.
 • त्यानंतर महामंडळातील यांत्रिकी कर्मचारी, सहायक वाहतूक निरिक्षकांना चालक तर वाहतूक नियंत्रकांना वाहकाचे काम देण्यात येणार आहे. महामंडळात यांत्रिकि कर्मचारी १३ हजार ५००, वाहतूक सहायक ३५० आणि वाहतूक नियंत्रक दाेन हजार ४४० आहेत. यापैकी बहुतेक कर्मचारी आता सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे हे कर्मचारी चालक-वाहक पदावर काम करण्यासाठी उत्सुक नसल्याचे समजते. त्यातच आतापर्यत सेवानिवृत्त झालेल्या ४१७ कर्मचाऱ्यांनी चालक पदासाठी अर्ज केला आहे.
 • तर ८०० कंत्राटी चालक महामंडळाने सध्या घेतले आहेत. संपाचा परिस्थितीत महामंडळाच्या सन २०१९ च्या भरती प्रक्रियेतील प्रशिक्षण पूर्ण झालेले एक हजार उमेदवार व किरकोळ चाचण्या बाकी असलेले सुमारे १२०० उमेदवार तातडीने उपलब्ध होऊ शकतात. मात्र एसटी महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 • एसटी महामंडळाच्या सन २०१९ च्या भरती प्रक्रियेतील प्रशिक्षण पूर्ण झालेले एक हजार उमेदवार व किरकोळ चाचण्या बाकी असलेले सुमारे १२०० उमेदवार तातडीने उपलब्ध होऊ शकतात. या उमेदवारांकडे चालक व वाहकाचा दुहेरी वैध परवाना आहे. त्यामुळे ते दोन्ही कामे करू शकतात. या उमेदवारांच्या भरतीमुळे एसटीला दिवसभरात ५ हजार पेक्षा जास्त बसेस प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर उतरवणे शक्य आहे.
 • त्यामुळे येणाऱ्या काळात प्रवाशांची गैरसोय दुर करण्यासाठी सन २०१९ च्या भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या व प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या सुमारे २२०० उमेदवारांना तत्काळ संधी द्यावी, अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.
 • याबाबद एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले, सध्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय झाला नाही. मात्र जर एसटी महामंडळाला जर भरतीची आवश्यकता असेल तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी संचालक मंडळाची भूमिका आहे.

MSRTC Driver Bharti 2022 updates

MSRTC Driver Bharti 2022 updates : MSRTC has been taking a big decision regarding the Driver and Conductor Posts Recruitment process. Due to the strike from last two month Drivers posts are vacant in ST Mahamandal. So that ST Mahamandal will now appoint mechanical personnel as ‘Drivers’ and transport controllers as ‘Conductor’. This decision is being taken by MSRTC as an alternative to this. For this, these employees will also be given training in that depot. According to the decision of the MSRTC, the employees who were promoted from the post of driver to the post of carrier examiner and assistant traffic inspector in the first phase during the strike period will be given two days review training and will be used as drivers on passenger vehicles. For this, these employees will also be given training in that depot. Therefore, the ST service should continue smoothly, so this decision has been taken by the ST Corporation.

एसटी महामंडळ वाहक पदभरती मोठा निर्णय !

 • गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्यामध्ये चालक आणि वाहक मोठ्या संख्येने आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एसटी महामंडळ आता यांत्रिक कर्मचा-यांना ‘चालक’ आणि वाहतूक नियंत्रकांना ‘वाहक’ म्हणून नेमणार आहे. यावर पर्याय म्हणून हा निर्णय एसटी महामंडळ घेत आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
 • एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे एसटी सेवा सुरळीत सुरु राहावी, म्हणून एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • प्रोत्साहन भत्ता दिला जाणार – एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली. त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. ज्यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे, अशा कर्मचा-यांची विभागीय पातळीवर माहिती गोळा करुन त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज करुन प्रवासी वाहन बिल्ला काढायचा आहे. या कर्मचा-यांना प्रतिदिन 300 रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्याचीही तरतूद करण्याची सूचना महामंडळाने आपल्या आदेशात केली आहे.

MSRTC Bharti 2022- As ST drivers were reluctant to return, the corporation decided to hire retired or voluntary drivers on a contract basis. Drivers are also being hired on a contract basis by private manpower companies. 389 retired drivers had applied to the corporation. Of these, only 136 drivers are eligible. ST Corporation has decided to hire another 400 contract drivers from private companies. As many as 61,000 workers are still on strike and the ST strike has not ended even after more than two months.

 विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाची कोंडी झाली आहे. अद्यापही एसटीचे कर्मचारी परतण्यास अनुत्सुक असून ५० हजार चालक, वाहक संपात आहेत.  एसटी पूर्ववत करण्यासाठी महामंडळाने सेवानिवृत्त चालक करारपद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु महामंडळाकडे ३८९ अर्ज आले आहेत.

त्यामुळे एसटी महामंडळाने आणखी ४०० कंत्राटी चालक खासगी कंपन्यांकडून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  अद्यापही ६१ हजार कर्मचारी संपावर असून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही एसटीचा संप मिटलेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतरही प्रतिसाद कमीच मिळत आहे. एसटी महामंडळातील एकूण कर्मचारी संख्या ८७ हजार ७०५ आहे. यातील ६१ हजार ६७७ कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत. यामध्ये  चालक, वाहकांचीच संख्या अधिक आहे. २७ हजार ६८६ चालक आणि २२ हजार ८४६ वाहक अद्यापही कामावर नाहीत. तर उर्वरित अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यशाळा व अन्य कार्यालयीन कर्मचारी आहेत. फक्त २६ हजार २८ कर्मचारीच उपस्थित असून यामध्ये चालक, वाहकांची संख्या कमी आहे.

दरम्यान, एसटीचे चालक, वाहक परतण्यास अनुत्सुक असल्याने महामंडळाने करारपद्धतीने सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. कंत्राटी पद्धतीने चालकही मनुष्यबळ पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून घेतले जात आहेत. सेवानिवृत्त ३८९ चालकांनी महामंडळाकडे अर्ज केले होते. त्यातील १३६ चालकच पात्र ठरले आहेत.


MSRTC Bharti 2022: Maharashtra State Road Transport Corporation is invited application form from Retried Person for the posts of Driver. There is a total of the various post to be filled under ST Mahamandal Recruitment 2022 Eligible and Interested candidates may submit their application form to the address before the last date. The last date for submission of the application form is 7th Jan 2022. More details about MSRTC Mumbai Bharti 2022/ST Mahamandal Vacancy 2022like application and application address are given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  चालक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

 • शेवटची  तारीख : 7 जानेवारी 2022
 • पद नाव:  चालक
 • अधिकृत वेबसाइट : www.msrtc.gov.in
 • पत्ता:  सेवानिवृत्त झाले त्या संबंधित विभागात

MSRTC Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Road Transport Corporation
⚠️ Recruitment Name
MSRTC Driver Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.msrtc.gov.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

ST Mahamandal Driver Bharti 2022

1 Driver 

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Driver 
 • A minimum period of 6 months or more is required to complete 62 years.
 • Retired Driver

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  7th Jan 2022

Important Link of MSRTC Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

Other Important Recruitment  

म्हाडा भरती २०२१  -भरती संदर्भात नवीन अपडेट्स 
 मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा   
आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा 
एसटी महामंडळ ६८१ रिक्त पदांच्या खात्यांतर्गत बढती परीक्षेचा निकाल

Police Bharti 2022 – राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच

SRPF Bharti – नोकरीची उत्तम संधी । महाराष्ट्र SRPF मध्ये मेगा भरती

MSRTC Bharti 2022 Update

एसटी महामंडळ अंतर्गत 681 भरती परीक्षेचा निकाल लवकरच

MSRTC Bharti 2022 latest updates : MSRTC was conducted for examine for various posts like Traffic Controller, Assistant Transport Inspector, Senior Clerk etc. The ST Mahamandal conducted the exam simultaneously at 28 centers across the Maharashtra state on Sunday. The results of the exam will be announced soon. Read the complete details here.

MSRTC Bharti 2022: राज्यात एसटी महामंडळाच्या  (ST) कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) संपत नसल्याचे  चित्र आहे. सरकार संप संपवण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील आहे. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यातच एसटी महामंडळाच्या सुमारे 681 रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा सुरळीत पार पडली आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) मार्फत सदर परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. परंतू परीक्षा रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दर्शवला होता. याउलट ज्या संपकरी कर्मचाऱ्यांना बढती परीक्षेला बसायचे आहे. त्यांनी रुजू अहवाल सादर करुन परीक्षेस उपस्थित रहावे असे आदेश दिले.

यानंतर रविवारी राज्यभरात तब्बल 28 केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली. एसटी महामंडळाच्या वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे 681 जागांसाठीच्या पदांसाठी 4 हजार उमेदवारांना पात्र करण्यात आले होते. त्यापैकी परीक्षेला प्रत्यक्ष 1 हजार 464 इतके कर्मचारी उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करण्यात येईल, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


The transport department has approved the new format of 4,350 posts. In view of the growing population and number of vehicles in the state, various staff unions in the transport department are demanding new posts including filling up of vacancies. At present, 5 thousand 100 posts are sanctioned here. Of these, 36 percent are vacant. With the increasing number of vehicles every year, the work stress here is increasing. Therefore, there is a demand from the employees’ unions to fill the vacancies and increase the number of new posts.

परिवहन खात्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून राज्यात वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या बघता रिक्त पदे भरण्यासह नवीन पदांची मागणी होत असतानाच परिवहन खात्याने ४,३५० पदांच्या नवीन आकृतिबंधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पूर्वी मंजूर पदांतील १५ टक्के म्हणजेच ७५० पदांना कात्री लागणार असल्याने कर्मचारी संघटना व परिवहन खात्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राज्यात परिवहन खात्याच्या अखत्यारित परिवहन आयुक्त कार्यालय, १५ प्रादेशिक परिवहन कार्यालय, काही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांसह इतरही काही कार्यालये येतात.  सध्या येथे ५ हजार १०० पदे मंजूर आहेत. यापैकी ३६ टक्के पदे रिक्त आहेत. प्रत्येक वर्षी  वाहनांची वाढती संख्या बघता येथील कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांकडून सातत्याने रिक्त पदे भरण्यासह नवीन पदे वाढवण्याची मागणी होते.

ही पदे वाढवण्याऐवजी परिवहन खात्याने माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने बरीच कामे करायला आता कर्मचाऱ्यांची गरज नसल्याचे सांगत पूर्वीच्या मंजूर पदांपैकी १५ टक्के पदांना कात्री लावत ४ हजार ३५० पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी दिली आहे. या आकृतिबंधात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह इतरही वरिष्ठ पदे वाढवली गेली असली तरी लिपिकासह वर्ग तीन व चारची बरीच पदे कमी केली गेली आहेत. या आकृतिबंधाला हाय पावर कमेटीची मंजुरी मिळाली असून त्यावरील इतर प्रक्रिया सुरू आहे.

परिवहन खात्याने राज्यभरातील आरटीओ कार्यालयातील दलाल संस्कृती संपवण्यासह येथील नागरिकांची कामे सुलभ व पारदर्शी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. त्यामुळेच नागरिकांना आता वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना व नवीन वाहनांच्या नोंदणीसह इतरही  कामे घरबसल्या करता येत आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने गरजेनुसार ४,३५० पदांचा सुधारीत आकृतीबंद तयार केला आहे.कोरोनामुळे रखडलेल्या ३५०० एसटी कर्मचाऱ्याच्या भरतीचा मार्ग मोकळा

ST Mahamandal Bharti 2021 updates :Minister of Transport Anil Parab Said today that the ST Employees who are in Waiting list of ST Mahamandal Bharti 2017 they will be recruitment soon . Consideration of the option of hiring the candidates on the waiting list for the recruitment of ST employees, the warning of the Minister of Transport to the ST employees –

आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब  यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले. भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे सपष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

More Details of ST Mahamandal Bharti 2021

MSRTC Bharti 2021 Paper Syllabus, Pattern

How to Apply for MSRTC Bharti 2022


MSRTC Bharti 2021: Maharashtra State Road Transport Corporation is inviting online application form for Apprentice – Mechanic Diesel. There is a total of 50 vacancies to be filled under MSRTC Thane Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. More details about MSRTC Mumbai Bharti 2021 like application and application address are given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

 •  रिक्त पदे: 50 पदे
 • पद नाव: अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल
 • नोकरी ठिकाण: रत्नागिरी
 • अधिकृत वेबसाइट : www.msrtc.gov.in

MSRTC Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Road Transport Corporation
⚠️ Recruitment Name
MSRTC Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Online/Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.msrtc.gov.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Apprentice – Mechanic Diesel
50

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Apprentice – Mechanic Diesel .
10th Class Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 

MSRTC Bharti 2021: Maharashtra State Road Transport Corporation is inviting online application form for Welder (Gas & Electric). There is a total of 03 vacancies to be filled under MSRTC Thane Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. More details about MSRTC Mumbai Bharti 2021 like application and application address are given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

 •  रिक्त पदे: 03 पदे
 • पद नाव: वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक
 • नोकरी ठिकाण: भंडारा
 • अधिकृत वेबसाइट : www.msrtc.gov.in

MSRTC Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Road Transport Corporation
⚠️ Recruitment Name
MSRTC Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Online/Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.msrtc.gov.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Welder (Gas & Electric).
03

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Welder (Gas & Electric).
8th Class Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 

Important Link of MSRTC Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

-एसटी’मध्ये खात्याअंतर्गत बढतीसाठी परीक्षा होणार

ST Mahamandal Bharti 2022 updates

The corporation will conduct the examination. The proposed examination is for the employees in the categories of Senior Clerk, Assistant Transport Inspector, Traffic Controller, Mechanical Multitrade Assistant Craftsman, Craftsman C, Head Craftsman. Corona made the exam a bit longer, but now the exam is coming soon.

राज्यात मार्च २०२० मध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठी एकही लेखी परीक्षा व व्यवसाय चाचणी घेतली नाही. परंतु आता करोनाचा प्रभाव ओसरू लागल्याने महामंडळाने ही परीक्षा घेण्याबाबतचे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे मोठय़ा संख्येने कर्मचाऱ्यांना बढतीसाठीच्या परीक्षा देता येणार आहे.

‘‘एसटी महामंडळाने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत बढतीचा लाभ व्हावा म्हणून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे  रिक्त होणाऱ्या जागा विचारात घेऊन जागा निश्चित करण्याची सूचना केली आहे. करोनामुळे परीक्षा थोडी लांबली, परंतु आता लवकरच परीक्षा होणार आहे

करोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. परंतु करोनाचा प्रभाव ओसरू लागल्याने हळूहळू एसटीची राज्यभरातील प्रवासी वाहतूक रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामंडळाकडे सध्या  विविध सेवा देणारे सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. सेवेवरील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना महामंडळात बढतीसाठी परीक्षा देता येते. महामंडळाकडून खात्याअंतर्गत बढतीसाठी शेवटची परीक्षा डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर करोनामुळे परीक्षाच झाली नाही. परंतु आता महामंडळ पुन्हा परीक्षा घेणार आहे. प्रस्तावित परीक्षा महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिक पदाच्या बहुव्यवसायिक (मल्टीट्रेड) सहाय्यक कारागीर, कारागीर क, प्रमुख कारागीर या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. १५ जुलै २०२१ पर्यंत नियमितपणे ३ वर्षे महामंडळाची सेवा पूर्ण करणारेच  या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. येथील रिक्त पदाच्या संख्येनुसार ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने या पदांवर बढती मिळेल. या परीक्षेसाठी तातडीने कारवाई करण्यासाठी राज्यातील एसटीच्या सर्व विभाग नियंत्रक कार्यालय, कार्यशाळा व्यवस्थापकासह इतरही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील विविध संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागण्यात आली आहे. ही माहिती २६ जुलै २०२१ पर्यंत महामंडळाकडे पोहोचणार आहे.


MSRTC Bharti 2021: Maharashtra State Road Transport Corporation is inviting online application form for Apprentice, Engineering Graduate Apprentice Posts. The job Location for these posts in Thane. There is a total of 109 vacancies to be filled under MSRTC Thane Recruitment 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link or  address before the last date. The last date for submission of the application form is 10th July 2021. More details about MSRTC Mumbai Bharti 2021 like application and application address are given below.

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

 • शेवटची  तारीख : 10 जुलै 2021
 •  रिक्त पदे: 109 पदे
 • पद नाव: अपरेंटिस, इंजीनियरिंग ग्रेजुएट अपरेंटिस
 • नोकरी ठिकाण: ठाणे
 • अधिकृत वेबसाइट : www.msrtc.gov.in

ST Mahamandal Bharti 2022 updates

MSRTC Bharti 2021 udpates – After a lot of criticism on the ST Mahamandal (MSRTC), a circular was issued on Saturday (31st May 2021) regarding giving jobs to the heirs (Waras) on compassionate basis. According to the circular, if an employee dies due to other reasons or coronation while in service, the job will be given to one of the heirs (Waras) of that employee. Read the complete details carefully given below and keep visit us for further updates.

एस टी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय

करोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी वारसांकडून नोकरीसाठी एसटीकडे हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे महामंडळावर बरीच टीका झाल्यानंतर वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात शनिवारी परिपत्रक जारी केले.

परिपत्रकानुसार, सेवेत असताना अन्य कारणांमुळे किंवा करोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला नोकरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. रिक्त जागेची उपलब्धता पाहता महामंडळाने याबाबत निर्णय घेतला व त्याचे अनुपालन करावे, अशा सूचना राज्यातील एसटीचे सर्व विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक यांना दिल्या आहेत. एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सेवेत असताना करोना किं वा अन्य कारणांमुळे जरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपातत्त्वावर नोकरी दिली जाईलच. हे आधीही स्पष्ट केले होते. रिक्त जागा पाहता आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक जारी केल्याचे सांगितले. दरम्यान, आतापर्यंत करोनामुळे एसटीतील एकू ण ८ हजार ५८७ कर्मचारी करोनाबाधित झाले असून २६५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ६७८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.


एसटी महामंडळात नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने प्रस्ताव

ST Mahamandal Bharti 2021 updates : A meeting will be held of the District Collectors of all the districts should be convened immediately to expedite the plan to set up hostels for the students of the Maratha community in each district. Also, the process of giving jobs in ST Corporation to the heirs of those who died in the agitation should be completed by June 15, such instructions were given by the state government to the Maratha Samaj sub-committee.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारण्याच्या योजनेला गती देण्यासाठी तातडीने सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. तसेच आंदोलनात मृत्यू पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याची प्रक्रिया 15 जूनपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना राज्य शासनाने मराठा समाज उपसमितीने केल्या.

MSRTC Bharti 2021: The State Road Transport Corporation had called for applications for the posts of Driver and Carrier in 2019 without inviting applications from independent candidates. women trainees will not be able to come to the service even in 2021 due to the short-term closure of training due to COVID. The trainees were waiting for the resumption of training as the training was stopped. Now that the head office has issued an order in this regard, the training of women drivers and carriers will be completed.

महिला एस. टी. चालक प्रशिक्षण पुन्हा होणार

राज्य मार्ग परिवहन महामंहळाने २०१९मध्ये चालक आणि वाहक या पदांसाठी स्वतंत्र उमेदवारांकडून अर्ज न मागविता चालक कम वाहक असे अर्ज मागविले होते. त्यामध्ये महिलांचेही चालक आणि वाहक अशा दोन्ही पदांसाठी अर्ज घेण्यात आले. त्यानुसार पात्र ठरलेल्या महिला चालकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात सुरू झाले होते. परंतु कोरोनामुळे वर्षभर बंद असलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू केले जात आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी नाशिक विभागीय मंडळाला महिला चालक मिळणार आहेत.

नाशिक विाभागातून अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांपैकी १० महिला कर्मचाऱ्यांचे चालक आणि वाहक पदाचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले होते. मात्र, काेरोनामुळे अल्पावधीच प्रशिक्षण अर्ध्यावर बंद करण्यात आल्यामुळे २०२१मध्येही या महिला प्रशिक्षणार्थींना सेवेत येता आलेले नाही. प्रशिक्षण बंद करण्यात आल्यामुळे पुन्हा कधी प्रशिक्षण सुरू होते, याची प्रशिक्षणार्थींना प्रतीक्षा होती. आता मुख्य कार्यालयाने याबाबतचे आदेश काढल्यामुळे महिला चालक, वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकणार आहे. हे प्रशिक्षण पुढील वर्षभर सुरू राहाणार असल्याचे समजते. मात्र, प्रशिक्षण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याबाबतचा विचारविनीमय सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

नाशिक विभागात सध्या ४५०पेक्षा अधिक महिला वाहक आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे. मात्र, चालक नसल्याने या प्रशिक्षणातू महिला चालकांची कमतरता भरून निघणार होती. आता नाशिकला यासाठी काहीवेळ प्रतीक्षा कारावी लागणार आहे.

 • १३ जिल्ह्यातील आगार
 • २१०० बसचालक
 • १९०० बसवाहक
 • ४५० महिला बसवाहक

विभागातून १० चालकांची निवड

नाशिक विाभागातून दहा महिलांची चालक वाहक पदासाठी नवड करण्यात आली आहे. त्यानुसार या महिला चालकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील केंद्रात सुरू करण्यात आले आहे. नाशिक आणि औरंगाबाद अशा दोन्ही डिव्हीजनचे प्रशिक्षण हे औरंगाबादमध्ये चालते. त्यामुळे नाशिकचे प्रशिक्षणार्थीही औरंबादालाच प्रशिक्षण घेतात. नाशिकमध्ये अद्याप एकही महिला चालक नाही. मात्र, जवळपास ४५० वाहक आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यांपासून बंद करण्यात आलेले कर्मचारी प्रशिक्षण पुन्हा सुरू केले जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत पुढील वर्षी आणखी काही कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. सध्या औरंगाबाद येथे ३२ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील १० नाशिक विभागाचे, तर उर्वरित औरंगाबाद विाभागील सेवेत रूजू होतील. महामंडळातील ५० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाणार असल्याने अनेक पदे रिक्त होणार आहेत.

–इन्फो–

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अट शिथील

एस. टी. महामंडळात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव, अशी अट यापूर्वी होती. आता महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिलांच्या हाती स्टेअरिंग देताना अगोदर कमी अंतरावरील मार्गावर पाठविले जाईल. या अनुभवानंतर त्यांना लांब पल्ल्याचीही ड्युटी दिली जाणार आहे. अर्थात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे.

सोर्स : लोकमत

एसटीच्या ३११६ उमेदवारांच्या प्रशिक्षणावरील स्थगिती उठवली

ST Mahamandal Bharti 2021: In the wake of the Corona epidemic, some candidates were selected for the purpose of financial austerity and adequate use of available staff. Accordingly, the training of about 3116 trainee candidates in various cadres was canceled. But now the process will be resumed

एसटीच्या ३११६ उमेदवारांच्या प्रशिक्षणावरील स्थगिती उठवली

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने काही उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण खंडित करण्यात आले होती. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालवा या उद्देशाने 2016-17 व 2019 अंतर्गत काही उमेदवारांची निवड झाली होती.

या निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण आणि अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये 2846 पुरुष, 161 महिला, 2 पर्यवेक्षक आणि 107 अधिकाऱ्याचा समावेश होता.

सद्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी/अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते. त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या या  निर्णयाचे स्वागत प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.

सोर्स: लोकमत


As per the news regarding ST Mahamandal did not even have the facility to pay the employees. Salaries were paid after the government paid. Efforts need to be made to increase revenue once the transport system is streamlined. But many officials are not serious about this. Many bus services are canceled from some depots. Many posts are being filled in the Yavatmal division of Maharashtra State Road Transport Corporation. ST is also suffering financial loss. Many tasks are being delayed as the person in charge is not fulfilling his responsibilities. It is said that the staff also suffered due to this.

एस.टी. महामंडळातील अनेक पदे प्रभारावर

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात अनेक पदांचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. या सर्व प्रकारात नियोजनाचा बोजवारा उडत असतानाच एस.टी.चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रभारी व्यक्ती जीव ओतून जबाबदारी पार पडत नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे. यामुळे कर्मचारीवर्गही त्रस्त झाला असल्याचे सांगितले जाते.

महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

राळेगाव, वणी याठिकाणी आगार प्रमुख नाही. हे दोनही आगार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. दिवस ढकलण्यापुरता कामगिरी करणारे अधिकारी काही ठिकाणी आहे. बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त आहेत. वरिष्ठांसाठी असलेल्या पदांवर कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी काम करत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक बाजू आणखी दुबळी होत चालली आहे.

वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा दणका लालपरीला बसला. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सोयही महामंडळाकडे नव्हती. सरकारने पैसा दिल्यानंतर पगार झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु याविषयात अनेक अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचे दिसून येते. काही आगारातून अनेक बसफेऱ्या रद्द होतात. अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरात एकाच मार्गावर चार ते पाच बसेस धावतात. आठ-दहा प्रवासी घेऊन आगारातून निघालेल्या या बसेसला शेवटच्या थांब्यापर्यंतही पूर्ण प्रवासी मिळत नाही. यात नियोजनाचा अभाव दिसून येतो.


MSRTC Bharti 2021 – New GR is published by ST Mahamandal For the 4500 vacancies recruitment process. This GR is Good news for all candidates waiting for this joining process of the MSRTC Department as a Driver or Conductor. More Details are given below.

पुढील वर्षी एप्रिलनंतरच भरती

24 Nov अपडेट – मित्रांनो, डिसेंबर २०२० पर्यंत २१ आदिवासी महिला, त्यानंतर टप्प्याटप्प्यांत ऊर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या. आता पुढील वर्षी एप्रिल नंतरचाच मुहूर्त मिळणार असून पुरुष चालक—वाहकही थेट नव्या वर्षांतच सेवेत येतील.

करोनाकाळात खबरदारी म्हणून नव्याने येणाऱ्या चालक-वाहकांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याचा विचार महामंडळ करत आहे.

-शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

 

एसटी महामंडळात चालक-वाहक  (ड्रायव्हर-कम-कन्डक्टर) पदाच्या भरतीसाठी सुरू केलेले तीन  हजार इच्छूक उमेदवारांचे प्रशिक्षण  गेल्या आठ महिन्यांपासून बंदच आहे. परिणामी हे उमेदवार अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत असून  त्याबाबत अद्यापही महामंडळाने निर्णय घेतलेला नाही.

मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागताच एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यात एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. एसटीच्या भरती प्रक्रियेवरही याचा मोठा परिणाम झाला. महामंडळाने तीन हजार चालक-वाहकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून यात २१३ महिलांचाही समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. करोनाकाळात हे प्रशिक्षण पूर्णपणे थांबले आणि नोकर भरतीची पुढील प्रक्रियाही रखडली.

गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या  उपस्थितीत २३ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्र मात महिला चालक-वाहकांच्या प्रशिक्षणाला आरंभ झाला होता. अशा २१३ महिला चालक—वाहक सेवेत आणण्यासाठी एसटीने तयारी के ली. यामध्ये २१ आदिवासी महिलाही आहेत. त्यांच्याकडे हलक्या वाहनांचा परवाना असल्याने त्यांना तात्पुरता अवजड वाहन परवाना देऊन  प्रशिक्षणास सुरुवात झाली होती.  करोनाकाळात त्यांच्याही नोकरभरतीला फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलांच्या प्रशिक्षणाच्या कालावधी एक वर्षांचा आहे. यातील आठ महिने वाया गेले असून पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे. प्रशिक्षणानंतर या महिलांना कायमस्वरुपी वाहन परवाना देऊन सेवेत आणले जाणार आहे. परंतु ही प्रक्रि या लांबल्याचे सांगण्यात आले.


MSRTC Bharti  : ST Mahamandal MSRTC New update is available for the candidates who are waiting for joining the MSRTC Department as a Driver or Conductor. As per this New GR Bharti will be resume soon. So its really a great New about MSRTC bharti Process.

MSRTC राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

करोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.

दरम्यान, करोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही लाट एसटी महामंडळातही येऊन धडकली होती. एसटीचं उत्पन्न थांबल्याने कर्मचारी कपातीकडे एसटीची वाटचाल सुरू होती. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवण्याचा मोठा निर्णय झाल्याने व एसटीला आधीच जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्याने लवकरच एसटी सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.


1 Comment
 1. Ritesh Rajabhau Raut says

  Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!