आरटीओ’अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त!

Nagpur RTO Bharti 2020

आरटीओ’अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त!

करोनामुळे राज्य आर्थिक संकटात असल्याने सर्वच विभागाकडून आता महसूल वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, परंतु राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) निम्मी पदे रिक्त असल्याने या विभागात महसूल वाढण्यासह येथील कामात सुसूत्रता येणार कशी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

वाहन परवाना व इतर सर्व कामे राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत होतात. त्यासाठी राज्यात १५ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि ५५ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (एआरटीओ) पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात आरटीओची सात पदे रिक्त असून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही १० ते १२ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये नागपूर (ग्रामीण), औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, पनवेल, मुंबई (सेंट्रल), परिवहन आयुक्त कार्यालयातील प्रत्येकी एक अशा सात पदांचा समावेश आहे.टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असल्याने रस्त्यांवरील जड वाहतूकही वाढली आहे. परिणामी, आरटीओवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे ही पदे केव्हा भरली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. सध्या या कार्यालयांचे काम अधिकाऱ्याकडे अतिरिक्त जबाबदारी देऊन पुढे ढकलले जात आहे.

पदोन्नतीच्या प्रस्तावाचे काय झाले?

परिवहन आयुक्त कार्यालयाने मध्यंतरी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नतीने प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी नियुक्त करण्यासाठी राज्यभरातील कार्यालयांतील सेवाज्येष्ठता असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती, परंतु करोनाचे संकट आल्यावर हे काम रखडले. आता शासनाकडून सर्वच कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतरही पदोन्नती होत नसल्याने या विभागातील अधिकाऱ्यांत नाराजीचा सूर दिसत आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयातील काही वरिष्ठ संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. त्यानंतर लगेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडवला जाईल. सध्या इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. याबाबत कुणाची  तक्रार नाही.

सोर्स: लोकसत्ता

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!