नव्या वर्षात मिळणार नोकरभरतीला चालना

New Job Opportunities in 2021

There are strong signs of improvement in the Indian corporate world. A survey has further strengthened this. According to the survey, in the first quarter of the new year 2021, ie January to March, companies are expected to hire more than in the previous quarter.

नव्या वर्षात मिळणार नोकरभरतीला चालना;

जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता….

भारतीय कॉर्पोरेट जगतात सुधारणा होण्याचे मजबूत संकेत दिसत आहेत. एका सर्वेक्षणामुळे याला आणखी बळ मिळालं आहे. या सर्वेक्षणानुसार, नवीन वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान कंपन्यांनी आधीच्या तिमाहीच्या तुलनेत अधिक नियुक्त्यांची शक्यता वर्तवली आहे.

दहावीनंतर हे डिप्लोमा कोर्स करा; महिन्यात लाखो रुपये कमवा, जाणून घ्या

मॅनपॉवर ग्रुपच्या रोजगार सर्वेक्षणात देशभरातील १,५१८ कंपनी मालकांचे विचार घेतले गेले. सर्वेक्षणात असं म्हटलंय की २०२१ च्या पहिल्या तिमाहीत रोजगाराचे चित्र चांगले राहील. पहिल्या तिमाहीत वित्त, विमा, रिअल इस्टेट किंवा खाण, बांधकाम क्षेत्रांमुळे रोजगाराच्या शक्यता वाढणार आहेत. मात्र अन्य सर्व क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढणार नाहीत, असं हा सर्व्हे सांगतो

खुशखबर!केंद्रामध्ये नोकरीची संधी

मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे समूह प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप गुलाटी म्हणाले, ‘कॉर्पोरेट भारतात मजबूत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत आणि मार्केटमधील एकूण चित्र सकारात्मक आहे.’ सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि धोरणांकडे लक्ष दिल्याने खासगी क्षेत्रालादेखील प्रोत्साहन मिळत आहे. आत्मनिर्भर भारत अभियान क्षेत्रालादेखील प्रोत्साहन दिले जात आहे, असेही ते म्हणाले.

तब्बल ८० हजार तरुणांना रोजगाराची संधी

सणासुदींच्या वातावरणानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. कंपन्या पुढील सहा ते नऊ महिन्यांमध्ये काम देण्यासंदर्भात आशावादी दृष्टिकोन दाखवत आहेत.

आयआयटींमध्ये ऑनलाइन प्लेसमेंटला सुरुवात; कोट्यवधींचे पॅकेज

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!