Pepsico Jobs 2023-PepsiCo भारतात करणार १२०० कर्मचाऱ्यांची भरती
Pepsico Jobs 2023
Pepsico Career: PepsiCo is marking a huge market in India. For this PepsiCo plans to expand its business in Hyderabad and recruit 1,200 employees in the next year and a half. Read More details are given below.
अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदीचे सावट आहे. यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांत नोकरकपात सुरु आहे. अमेरिकन बहुराष्ट्रीय फूड कंपनी पेप्सिको (PepsiCo) त्याच्या उत्तर अमेरिकन स्नॅक्स आणि शीतपेयांच्या वर्टिकलच्या मुख्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे वृत्त याआधी समोर आले होते. पेप्सिको अमेरिकेत नोकरकपात करत असली तरी भारतात मात्र त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणार आहे. पेप्सिकोला भारतीतील मोठी बाजारपेठ खुणावत आहे. यासाठी पेप्सिकोने हैदराबादमध्ये त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि पुढच्या दीड वर्षात १,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे.
PepsiCo भारतात करणार १२०० कर्मचाऱ्यांची भरती
PepsiCo चे ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस सेंटर हैदराबादमध्ये २०१९ मध्ये सुरु झाले होते. त्यावेळी तेथे २५० कर्मचारी होते. सध्या येथे २८०० कर्मचारी काम करतात. येथील कर्मचारी संख्या आणखी १२०० ने वाढविल्यास एकूण संख्या ४ हजार होणार आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान कंपनीने ही घोषणा केली.
पेप्सिकोचे EVP कॉर्पोरेट अफेयर्स रोबेर्टो अझेवेदो यांनी नुकतीच तेलंगणा पॅव्हेलियन येथे तेलंगणाच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री यांची भेट घेतली आणि कंपनीच्या हैदराबादमधील विस्तार योजनांबाबत चर्चा केली. दरम्यान, तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटीआर यांनी हैदराबादमधील पेप्सिकोच्या ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस सेंटरच्या जलद विस्ताराबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि कंपनीच्या भविष्यातील सर्व गुंतवणुकीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या बैठकीदरम्यान, तेलंगणामधील पेप्सिको खाद्य उत्पादनांच्या संधींवरही चर्चा करण्यात आली.
Comments are closed.