RBI मध्ये असिस्टंट भरती, अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे पात्रता निकष आणि भरती प्रक्रिया जाणून घ्या-RBI Assistant 2023
RBI Assistant 2023 Notification PDF, Eligibility, Exam Date
RBI Assistant 2023 Notification PDF, Eligibility, Exam Date
Reserve Bank of India (RBI) Assistant Recruitment 2023 notification is likely to be released soon. The link to download RBI Assistant 2023 PDF will be available after the recruitment process starts. Assistant Exam is conducted by RBI every year for the recruitment of eligible candidates for Reserve Bank of India Assistant post. Many candidates are eagerly waiting for this exam. Because many people want to work in banking sector. That’s why we are going to give you some important information related to RBI Assistant 2023. Which includes course exam date, salary, eligibility, application fee, selection process, etc. RBI Assistant 2023 Notification- RBI Assistant 2023 Notification PDF is expected to be released in March 2023. Moreover, students need to have all the information related to this exam. For this, some information about what RBI Assistant 2023 will be like is given below.
नोकरीची संधी- RBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती
लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती, अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे पात्रता निकष आणि भरती प्रक्रिया जाणून घ्या
भारतीय रिझव्र्ह बँक (RBI) असिस्टंट भरती २०२३ ची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. आरबीआय असिस्टेंट २०२३ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठीची लिंक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतीय रिझव्र्ह बँक असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी दरवर्षी आरबीआयकडून असिस्टंट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहात असतात. कारण अनेकांना त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असते. यासाठीच आम्ही तुम्हाला RBI असिस्टंट २०२३ शी निगडीत काही महत्वाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अभ्यासक्रम परीक्षा तारीख, पगार, पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, इत्यादीचा समावेश आहे. RBI सहाय्यक २०२३ अधिसूचना- आरबीआय असिस्टंट २०२३ अधिसूचना PDF मार्च २०२३ मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय विद्यार्थ्यांना या परीक्षे संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. यासाठी आरबीआय असिस्टंट २०२३ नेमकी कशी असेल याबाबतची काही माहिती पुढीलप्रमाणे.
RBI Assistant Recruitment 2023 Notification
- परीक्षेचे नाव – RBI परीक्षा २०२२
- पोस्ट – असिस्टंट
- रिक्त जागा – अद्याप जाहीर केलेल्या नाहीत
- श्रेणी – बँक नोकरी
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही
- भत्ता – भत्ते महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, विशेष भत्ता, वाहतूक भत्ता.
- परीक्षेची भाषा – इंग्रजी आणि हिंदी
- निवड प्रक्रिया – Prelims and Mains
- अर्जाची पद्धत – ऑनलाइन
- अधिकृत वेबसाइट – http://www.rbi.org.in
How to apply for RBI Assistant 2023
RBI असिस्टंट २०२३ ऑनलाइन अर्ज – RBI असिस्टंट ऑनलाइन अर्ज लिंक मार्च 2023 मध्ये सक्रिय होईल. असिस्टंट पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन नोंदनी करणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याआधी, उमेदवारांना ते अर्ज करण्यास पात्र आहेत का नाही याची खात्री करुन घेण्यासाठी याबाबतचा सर्व तपशील काळजीपुर्वक पाहणं गरजेचं आहे. शिवाय ऑनलाइन अर्ज ते वेळेवर करणं आवश्यक आहे.
- अर्ज शुल्क – (मागील वर्षाच्या अधिसुचनेनुसार)
- सामान्य/ओबीसी वर्गासाठी ४५० रुपये
- SC/ST/PWD/EXS श्रेणीसाठी ५० रुपये
Educational Qualification for RBI Assistant शैक्षणिक पात्रता –
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी किंवा समतुल्य पदवी प्राप्त केलेली असावी.
- SC/ST/PWD मधील उमेदवारांसाठी, एकूण उत्तीर्ण गुण आवश्यक आहेत.
- वयोमर्यादा – किमान २० वर्षे तर कमाल २८ वर्षे
- शिवाय या भरतीसाठीच्या प्र्त्येक अपडेटसाठी तुम्ही बॅंकेच्या या http://www.rbi.org.in अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.
RBI Has Scheduled Interviews
Reserve Bank of India announces interview dates for Grade B DR General and Grade B DR DEPR-DSIM posts. The written test for the Reserve Bank Grade B exam 2021 was held in March. Paper 1 was taken on March 6. Papers 2 and 3 were taken on March 31, 2021.
RBI Grade B Recruitment 2021: रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India, RBI)ने विविध पदांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याची मुलाखत प्रक्रिया २ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहे. यानुसार ग्रेड बी डीआर जनरल पदासाठी मुलाखत २ ऑगस्टला होणार आहे. तसेच ग्रेड बी डीआर DEPR-DSIM पदासाठी ३० ऑगस्टला मुलाखत आयोजित केली जाणार आहे. अशावेळी लेखी परीक्षेत निवड झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन मुलाखतीचे वेळापत्रक पाहू शकता.
आरबीआय ग्रेड बी परीक्षेबद्दल
रिझर्व्ह बँक ग्रेड बी परीक्षा २०२१ ची लेखी परीक्षा मार्च महिन्यात झाली होती. याचा पेपर १ हा ६ मार्च रोजी घेण्यात आला. तर पेपेर २ आणि ३ हे ३१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आले. ही परीक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या भरतीतील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी अशा तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात येते.
आरबीआय ग्रेड बी परीक्षेच्या लिंकवर थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
RBI Exam 2021: The candidates had demanded to take the central level examination in Marathi. Taking note of this demand, the Marathi department of the state government had requested to conduct the examination in Marathi. This exam will be conducted in 16 other languages including Marathi.
परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे.
मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले.
RBI Recruitment 2021: RBI-Reserve Bank Of India is inviting applications from eligible ex-servicemen candidates for the recruitment of Security Guards in various offices of the Bank. Application invited to fill 241 vacant post. More details are given below.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी
Reserve Bank of India Recruitment 2021 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुन्हा एकदा एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल २४१ जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेत सिक्युरिटी गार्ड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२१ ही आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार असून ती फेब्रुवरी अथवा मार्च महिन्यात घेण्यात येईल. देशातील
१८ शहरांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसंच उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. २४१ पैकी ३२ जागा या एससी, ३३ जागा एसटी आणि ४५ जागा ओबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ईडब्ल्यूएससाठी १८ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ११३ जागा असतील.
१८ ते २५ या वयोगटातील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच ओबीसी वर्गासाठी तीन वर्षांची तर एससी, एसटी वर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांना यासाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करणारा उमेदवाराचं १ जानेवारी २०२१ पर्यंत पदवीपेक्षा कमी शिक्षण असणं आवश्यक आहे.
सर्वप्रथम उमेदवारांची निवड ही ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणी केवळ उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्याचे गुण मेरिटमध्ये घेतले जाणार नाहीत. अंतिम यादी ही ऑनलाईन लेखी परीक्षेच्या आधारेच तयार केली जाणार आहे. लेखी परीक्षेत, रिजनिंग, जनरल इंग्लिश, न्यूमरिकल एबिलिटीशी निगडीत प्रश्न विचारले जातील.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
बँकिंग क्षेत्रात अनुपालन आणि जोखीम व्यवस्थापन संस्कृतीत एकरूपता आणण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह शुक्रवारी बँकांमध्ये मुख्य अनुपालन अधिकारी (CCO- Chief Compliance Officer) नियुक्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सीसीओला किमान तीन वर्षांसाठी महाव्यवस्थापक (General Manager) रँकच्या पदावर नियुक्त करावे लागेल. जरी हे पद महाव्यवस्थापक पदाच्या रँकचे नसले तरी ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या 2 रँकपेक्षा कमी दर्जाचे नसावे, असे या संदर्भातील आरबीआयच्या परिपत्रकानुसार म्हटले आहे. तसेच,;स्वतंत्र अनुपालन प्रक्रिया सीसीओच्या अंतर्गतच पूर्ण करावी लागेल, ज्यांची निवड योग्य प्रक्रियेअंतर्गत होईल. बँकेत अनुपालन जोखीम अचूकपणे करता यावे, यासाठी फिट आणि योग्य मूल्यांकनाच्या आधारे नियुक्ती जाईल. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की, बँकांचे पालन त्यांच्या स्वत: च्या अनुसार केले जाते. परंतु त्यात नवीन एकरूपता सुनिश्चित करण्यात येईल.
मार्गदर्शक सूचनांनुसार, सीसीओचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली किंवा हटविले जाऊ शकते. परंतु अपवादात्मक परिस्थितीत बँक बोर्डाची मान्यता आणि पारदर्शकपणे शोधणे अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेच्या अंतर्गत असेल. सीसीओ हे बँकेचे वरिष्ठ कार्यकारी असतील, ज्यांचे पद महाव्यवस्थापकाचे असेल. ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या खाली दोनपेक्षा जास्त नसावेत. मार्केटद्वारे सीसीओची नेमणूक देखील करता येते, असे म्हटले आहे.
सीसीओला अशी कोणतीही जबाबदारी द्यावी लागणार नाही. ज्यामुळे हितसंबंधाची परिस्थिती उद्भवेल. विशेष म्हणजे व्यवसायांसंबंधी कोणत्याही भूमिकेवरून असे होऊ नये. बँकांना अशी भूमिका दिली जाऊ शकते ज्यामध्ये हितसंबंध संघर्षाचा कोणताही धोका नाही. जसे की, अँटी-मनी लॉन्ड्रिंग अधिकारी पद. अशा पदांवर बँक आकार, जटिलता, जोखीम व्यवस्थापन रणनीती यासाठी मदत दिली जाऊ शकते, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
सोर्स: लोकमत
RBI Recruitment 2020: The Reserve Bank of India (RBI Recruitment 2020), which is the economic backbone of the country, has provided job opportunities to the youth. RBI has conducted recruitment for a total of 39 posts including Data Analyst, Consultant, Account Specialist. The important thing is that the candidate is selected only through an interview.
Applications for these RBI posts have started from August 3. As per RBI Recruitment 2020, a total of 39 vacancies will be filled. The last day to apply for these positions is August 22 at 6 p.m.
RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी
देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिझर्व्ह बँकेने (RBI Recruitment 2020) तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. RBI मध्ये डेटा अॅनालिस्ट, कन्सल्टंट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांवर भरती आयोजित केली आहे. महत्वाचे म्हणजे केवळ मुलाखतीद्वारे उमेदवार निवडला जाणारा आहे.
आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. RBI Recruitment 2020 य़ा नुसार एकूण 39 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस 22 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या पदांसाठी उमेदवारांचे शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड करण्याचे ठरविले आहे. या नुसार पदांची भरती केली जाणार आहे. अकाऊंट स्पेशालिस्टसाठी उमेदवाराकडे सीएची पदवी असणे गरजेचे आहे. या सर्व पदांनुसार उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे असावे.
आरबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. RBI मध्ये या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना निवडले जाणार आहे.
भरतीच्या माहितीसाठी इथे क्लिक करावे.
RBI Assistant 2023 Notification PDF, Eligibility, Exam Date
Ex sarvise myan ko kaha aaplya kare